दौलतनगर दि. 09:- दौलतनगर,ता.पाटण
येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकूलातील मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित
श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स अँड कॉमर्स ज्यूनिअर कॉलेज दौलतनगर या ज्यूनिअर कॉलेजचा
इयत्ता 12 वीचा सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील निकाल नुकताच जाहिर झाला. दौलतनगर,ता.पाटण
येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकूलाने याही वर्षी आपली निकालाची यशस्वी
परंपरा कायम ठेवली असून शास्त्र शाखेचा 94.23 टक्के तर वाणिज्य शाखेचा 89.28 टक्के
निकाल लागला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा
नेते यशराज देसाई यांनी अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना हार्दीक
शुभेच्छा दिल्या.
लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकुलामध्ये दौलतनगर,ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स अँड कॉमर्स ज्यूनिअर कॉलेज दौलतनगर या ज्यूनिअर कॉलेजमध्ये सुसज्ज इमारतींसह उच्चशिक्षित वर्ग असून या कॉलेजमध्ये विभागातील अनेक गावांतील विद्यार्थी विद्यार्थीनी शैक्षणिक सुविधांचा लाभ घेत आहेत.तसेच या कॉलेजमध्ये चांगल्या शैक्षणिक सुविधा पुरविल्या जात असल्याने कॉलेजने शैक्षणिक दर्जा चांगला राखला असल्याने श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स अँड कॉमर्स ज्यूनिअर ज्यूनिअर कॉलेजचा सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 12 वीचा निकाल नुकताच जाहिर झाला. यामध्ये शास्त्र शाखेचा 94.23 टक्के तर वाणिज्य शाखेचा 89.28 टक्के निकाल लागला असून शास्त्र व वाणिज्य शाखेचा एकत्रित मिळून 91.17 टक्के कॉलेजचा निकाल लागला आहे. श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स अँड कॉमर्स ज्यूनिअर कॉलेजमधील शास्त्र शाखेमध्ये प्रथम क्रमांक प्रथमेश राजू मोरे 64.47 टक्के, व्दितीय क्रमांक ऋतुजा रमेश सत्रे 59.17 टक्के,तृतीय क्रमांक अंजली सर्जेराव कुंभार व रचना कृष्णत थोरात 58.83 टक्के तर वाणिज्य शाखेमध्ये प्रथम क्रमांक सोनल शिवाजी पोतदार,साक्षी बापूराव शेजवळ 85.50 टक्के,व्दितीय क्रमांक 75.17 टक्के, तृतीय क्रमांक 73.17 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.इयत्ता 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींचे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment