दौलतनगर दि.03
:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक
चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे
दि. 12 जुलै,2021
रोजीचे पुण्यतिथी दिवशी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई
यांचे मार्गदर्शनाखाली शिवशाही सरंपच संघ पाटण विधानसभा या सरपंच संघाची स्थापना
करण्यात आली.यंदा दि. 12 जुलै,2022 रोजी शिवशाही सरपंच संघाचा प्रथम वर्धापन दिन असून या वर्धापन
दिनानिमित्त गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली युवा नेते
यशराज देसाई यांचे संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघातील
सर्व पातळीवर चांगले काम करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना स्व.शिवाजीराव देसाई शिवशाही आदर्श ग्राम पुरस्कार व पहिल्या तीन
सरपंचांना "स्व.शिवाजीराव देसाई शिवशाही आदर्श सरपंच पुरस्कार" स्व.शिवजीराव देसाई (आबासाहेब) यांचे दि. 12 जुलै रोजीचे पुण्यतिथी व शिवशाही सरपंच
संघाच्या वर्धापन दिन कार्यक्रमप्रसंगी गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे
शुभहस्ते देण्यात येणार असल्याची माहिती शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे
यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे
म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली
गतवर्षी दि. 12 जुलै रोजी स्व.शिवाजीराव
देसाई (आबासाहेब) यांचे पुण्यतिथीनिमित्त शिवशाही
सरपंच संघ पाटण विधानसभा या सरपंच संघाची स्थापना करण्यात येऊन या संघाचे
कार्यकारीणीची निवड करत संघाच्या कामकाजाची रुपरेषा ठरविण्यात आली होती.पाटण विधानसभा मतदार संघात
नव्याने स्थापन झालेल्या या सरपंच संघाचे माध्यमातून राज्य शासनाच्या विविध
चांगल्या योजना राबविण्यासाठी सर्व सरपंच यांनी एका छता खाली येऊन गावांना
विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न एक वर्षाच्या कालावधीत करण्यात
आला. दरम्यान गत आठवडयामध्ये ना.शंभूराज देसाई यांच्या
मार्गदर्शनाखाली शिवशाही सरपंच संघाचे पदाधिकारी व नवीन नेमणूक झालेल्या शिवशाही
सरपंच संघाचे संपर्क प्रमूखांचा मेळावा यूवा नेते यशराज देसाई (दादा) यांच्या
उपस्थितीमध्ये दौलतनगर याठिकाणी पार पडला. यावेळी शिवशाही सरपंच संघाने अल्पावधीच
संपूर्ण तालूक्यामध्ये आपल्या कामांचा ठसा उमटवला असून शिवशाहीच्या सर्व
पदाधिकाऱ्यांचे काम वाखाणन्या जोगे असल्याचे मत युवा नेते यशराज देसाई यांनी
व्यक्त केले.तर शिवशाही सरपंच संघाच्या चांगल्या कामाकरीता कायमच सहकार्य करण्याची
ग्वाही दिली. तसेच स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे दि. 12 जूलै रोजीचे
पुण्यतिथीचे औचित्यसाधून शिवशाही सरपंच संघाचे पहिल्या वर्धापन दिन
कार्यक्रमप्रसंगी ना.शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनांखाली युवा नेते यशराज
देसाई (दादा) यांच्या संकल्पनेतून त्यादिवशी पाटण विधानसभा क्षेत्रातील सर्व
पातळीवर चांगले काम करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना "स्व.शिवाजीराव
देसाई शिवशाही आदर्श ग्राम पुरस्कार" व सर्व पातळीवर चांगले काम करणाऱ्या
पहिल्या तीन सरपंचांना "स्व.शिवाजीराव देसाई शिवशाही आदर्श सरपंच पुरस्कार"
देणेचे जाहिर केले असून आदर्श ग्रामपंचायतींना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई
यांचेकडून गावातील आवश्यक अशा मुलभूत विकास कामासाठी प्रथम क्रमांक 20 लाख, द्वितीय क्रमांक15 लाख व
तृतीय क्रमांक 10 लाख याप्रमाणे निधी देण्यात येणार असल्याचे जाहिर केले.तसेच
आदर्श ग्रामस्पर्धेकरीता आदर्श ग्रामपंचायत व सरपंच यांचे निवडीकरीता अधिकाऱ्यांची
एक समिती नियुक्त करण्यात येऊन या निवड समितीकडून या पुरस्कारासाठी ग्रामपंचायत व
सरपंच यांची निवड करण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी पिण्याचे स्वच्छ
पाणी,सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य व शिक्षण व्यवस्था,स्वच्छ सुंदर
गावं,घरगुती व सार्वजनिक शौचालयाचा वापर,शासनाच्या योजनांची प्रभावी
अंमलबजावणी,गावामध्ये पायाभूत सुविधांचा विकास,ग्रामपंचायतीची
करवसूली,ग्रामसभा,महिला व बाल ग्रामसभा यांची अंमलबजावणी,वृक्ष लागवड व संवर्धन,ग्रामपंचायत
व गावामध्ये असणाऱ्या अत्याधुनिक सुविधा,सामाजिक दायित्व, समाज उपयोगी
उपक्रम,सामाजिक शांतता,एकता,धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी 100 गुण
देण्यात येणार असून पाटण विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त ग्रामपंचायत व सरपंच
यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन शिवशाही सरपंच संघाच्या तालुका कार्यकारीणीकडे
दिनांक 20 जुन 2022 अखेर आपले नावाची नोंद करावी,असे आवाहनही शिवशाही सरपंच संघाचे
अध्यक्ष विजय शिंदे यांनी शेवटी केले आहे.
No comments:
Post a Comment