Sunday 12 June 2022

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाचे पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि. 14 जून रोजी दौलतनगर येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती.

 


 

दौलतनगर दि. 12:- महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री व कै.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेल प्रमुख ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे होऊ घातलेल्या सन 2022 ते 2027 संचालक मंडळाचे पंचवार्षिक निवडणुकीचे पार्श्वभूमीवर ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कै.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेलमधून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवार दि.14 जून 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 04 या वेळेत ना.शंभूराज देसाई यांचे निवासस्थान दौलतनगर, ता.पाटण येथे घेण्यात येणार असल्याची माहिती कै.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेलच्यावतीने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

           प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाचे पंचवार्षिक निवडणुकीचे पार्श्वभूमीवर कै.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेल मधून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याकरीता महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री व कै.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेल प्रमुख ना.शंभूराज देसाई यांनी कार्यकारी समिती स्थापन केली आहे. या कार्यकारी समितीमध्ये युवा नेते यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, मा.चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, चेअरमन अशोकराव पाटील ॲङडी.पी.जाधव यांचा समावेश असून या कार्यकारी समितीसमोर कै.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेल मधून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवार दि.14 जून 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 04 या वेळेत ना.शंभूराज देसाई यांचे निवासस्थान दौलतनगर,ता.पाटण येथे ठिकाणी घेण्यात येणार आहेत.तसेच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर या मुलाखतींचा एकत्रित अहवाल कार्यकारी समितीमार्फत गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. तरी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाचे पंचवार्षिक निवडणुकीत कै.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेल मधून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी मुलाखातीकरीता उपस्थित रहावे,असे आवाहन कै.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेलच्यावतीने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

No comments:

Post a Comment