दौलतनगर दि.5: लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2023-24 चा गळीत हंगाम राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे
मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने यशस्वीपणे पार पाडत गळीतास आलेल्या
ऊसाच्या एफ.आर.पी.पोटी रु. 150/- प्र.मे.टन प्रमाणे होणारी रक्कम रु.336,62 लाख संबंधित
ऊस पुरवठादारांच्या बँक खाती आजरोजी वर्ग करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे
चेअरमन यशराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
पत्रकात
पुढे म्हंटले आहे की, आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन
2023-24 चे गळीत हंगामामध्ये 2,24,413.652
मे.टन ऊस गाळप करुन सरासरी 11.98 टक्के साखर उताऱ्याने 2,68,775 क्विंटल साखरेचे उत्पादन
केले आहे.कारखान्याची सन 2023-24 चे गळीत हंगामामध्ये पहिली उचल एफ.आर.पी.पोटी रु.2500/-
प्र.मे.टन प्रमाणे यापूर्वीच रु. 5610.34 लाख रक्कम ऊस पुरवठादारांना अदा केली आहे.
तसेच उर्वरित एफ.आर.पी.पोटी रक्कम रु. 150/- प्र.मे.टन प्रमाणे रु.336.62 लाख आज संबंधित
ऊस पुरवठादारांच्या बँक खाती 5 जुन 2024 रोजी वर्ग केली असून ऊस पुरवठादारांनी संबंधित
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेशी
संपर्क साधावा असे ही म्हंटले आहे. ते पुढे म्हणाले की,लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे राज्य
उत्पादन शुल्कमंत्री तसेच सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई
यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने आर्थिक नियोजन करुन सन 2024-25 च्या
गळीत हंगामाची तयारी सध्या सुरु केली असून ऊस तोडणी वाहतूकीचे कराराचे काम सुरु आहे. कारखान्याचे
आधुनिकीकरणासह विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले असून कारखान्यातील आँफ सिजन मेंटेनन्सचे कामकाज प्रगतीपथावर आहे.साखरेच्या
दरातील अस्थिरता व मोलॅसेसवर निर्यात बंदी केल्याने दरात झालेली घसरण यामुळे सर्व
साखर उद्योगाला अडचण निर्माण झाली असून त्यावर नियोजन करुन उर्वरित शिल्लक
एफ.आर.पी.पोटी देय रक्कम लवकरच अदा करण्याचा कारखाना व्यवस्थापनाचा प्रयत्न राहणार
आहे. तरी कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व
ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी आपला पिकविलेला सर्व ऊस आपले लोकनेते बाळासाहेब देसाई
सहकारी साखर कारखान्यास नोंद करुन सन 2024-25
चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही शेवटी चेअरमन यशराज देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकांत केले
आहे.
No comments:
Post a Comment