दौलतनगर दि.01:- राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील 90 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट
काँक्रीटीकरणाच्या कामांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत
निधी मंजूर होण्यासाठी रोजगार हमी विभागाकडे शिफारस केली होती.ना.शंभूराज देसाई यांचे
शिफारशीनुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 90 गावांतील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे
कामांसाठी 22 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे
नियोजन विभाग (रोहयो) यांनी पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे
वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
प्रसिध्दींस
दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण या डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांतील
रस्त्यांची प्रतिवर्षी होणाऱ्या अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणांत नुकसान होत असते. त्यामुळे
या गावांतील ग्रामस्थांची दळण वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने अनेक गावांतील अंतर्गत
रस्त्यांच्या कामांना निधीची गरज होती. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा
मतदारसंघातील 90 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना निधी मंजूर
होण्यासाठी शिफारस केली होती. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शिफारशीनुसार पाटण
विधानसभा मतदारसंघातील तब्बल 90 विविध गावांतील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना प्रत्येक
गावनिहाय 25 लाख या प्रमाणे एकूण 22 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला
असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे नियोजन
विभाग (रोहयो) यांनी पारित केला आहे. मंजूर झालेल्या कामांमध्ये रामिष्टेवाडी,सलतेवाडी
वाझोली,डाकेवाडी वाझोली,कसणी,भरेवाडी काळगाव,लोहारवाडी काळगाव,शिद्रुकवाडी वरची खळे,
चाळकेवाडी निवडुंगे आळी,माटेकरवाडी नं.1,गुढे,पाचुपतेवाडी ग्रा.प.,जांभूळवाडी कुंभारगाव,शिद्रुकवाडी
ग्रा.प.,डूबलवाडी शिद्रुकवाडी,खळे,मानेगाव,गलमेवाडी,देवघर गोवारे,हेळवाक,गोषटवाडी,कडववाडी
नाणेगाव बु.,माथणेवाडी चाफळ भैरवनाथ मंदिर,बाटेवाडी पाठवडे,बोर्गेवाडी भैरेवाडी डेरवण,जितकरवाडी
जिंती,भोसगाव,काटकरवाडी मंद्रुळकोळे, उमरकांचन, कोळेकरवाडी, उधवणे,पाणेरी,उधवणे जोतिर्लिंग
मंदिर,सळवे,डांगीष्टेवाडी सुंदरनगर,पांढरवाडी तारळे,आंबेवाडी घोट,फडतरवाडी घोट,वेखंडवाडी,दुसाळे,तारळे,करमाळे
वजरोशी,जन्नेवाडी घोट,ढोरोशी,गर्जेवाडी कडवे,घाटेवाडी मालोशी,कडवे बुद्रुक,काढोली,
सुतारवस्ती कुसरुंड,कोळेकरवाडी कुसरुंड,पाचगणी केदारर्लिंग मंदिर,दिक्षी,मणेरी,कवरवाडी,नेरळे,डोंगरुबाचीवाडी
मुळगाव, आडदेव,बेलवडे खुर्द,विहे बौध्दवस्ती,ठोमसे,गणेवाडी ठोमसे,मल्हारपेठ,ऊरुल,बोडकेवाडी,सोनाईचीवाडी,आसवलेवाडी,बहुले,
पापर्डे,सोनवडे,बहुले,बोर्गेवाडी पुनर्वसन सांगवड,चोपदारवाडी,डफळवाडी मणदुरे,येराड,बनपेठ
येराड,लुगडेवाडी सोनगाव, पिंपळोशी बौध्दवस्ती,फुरसाई दिवशी खुर्द,मळयाचावाडा दिवशी
खुर्द,वाघाचीवाडी नायकवाडीवाडी दिवशी खुर्द,मराठवाडी दिवशी खुर्द,टोळेवाडी,दिवशी खुर्द
धोरश्वर मंदिर,मिसाळवाडी मरड,कुसवडे,खुडुपलेवाडी गावडेवाडी,धुईलवाडी गावडेवाडी,वस्ती
साकुर्डी,म्होप्रे,पाठरवाडी (गमेवाडी),आरेवाडी या गावांतील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे
कामांचा समावेश आहे.पाटण
विधानसभा मतदारसंघातील एकाच वेळी तब्बल 90 गावांतील अंतर्गत रस्त्यांची कामे तातडीने
मार्गी लागण्यासंदर्भात पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अधिकारी यांना सूचना केल्या
असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment