दौलतनगर दि.२३:-महाराष्ट्राचे
पोलादी पुरुष,पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते
बाळासाहेब देसाई यांच्या 42 व्या पुण्यतिथीनिमित्त पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे
प्रतिवर्षी साजऱ्या होणाऱ्या तीनदिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा यंदाच्या
वर्षी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी दिवशी तीन दिवसीय श्री ग्रंथराज
ज्ञानेश्वरी पारायणाच्या निमित्ताने भव्य दिव्य दिंडी सोहळयाने श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिमांची भव्य मिरवणूक
काढण्यात आली. तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते साहेब यांचे पुर्णाकृती
पुतळयावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करत पारायण सोहळयातील भाविक भक्तांच्या
उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांना विन्रम अभिवादन करण्यात आले.भव्यदिव्य दिंडी व रिंगण सोहळयाने दौलतनगरला सकाळपासून
भक्तीमय वातावरण होते.
दौलतनगर ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 42 व्या पुण्यतिथीनिमित्त गत पंधरा वर्षापासून सुरु असलेल्या श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे यंदाचे सोळावे वर्ष होते.या पारायण सोहळयामध्ये 783 वाचक सहभागी झाले होते.तर वारकरी साप्रंदयातील विविध मान्यवरांची प्रवचने,कीर्तने तसेच गावोगावच्या भजनांचे जागराचे कार्यक्रम
यानिमित्ताने आयोजीत करण्यात आले होते.या संपुर्ण पारायण सोहळयामध्ये श्रीमती विजयादेवी देसाई, पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन
यशराज देसाई (दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, सौ.स्मितादेवी देसाई, डॉ.सौ.वैष्णवीराजे देसाई,चि.जयराज देसाई,चि.आदित्यराज देसाई यांचा विशेष सहभाग होता. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी निमित्त आयोजित
पारायण सोहळा यशस्वी करण्यासाठी ह.भ.प.जयवंतराव शेलार
महाराज,
ह.भ.प.अनिल पाटील
महाराज पापर्डेकर, ह.भ.प.जगन्नाथ ठोंबरे महाराज ह.भ.प.दगडू माळी, नाना देसाई
पापर्डेकर,शैलेंद्र शेलार,भरत पाटील,सुरेश शिंदे,अमित लोहार यांच्यासह त्यांचे सहकारी
यांचाही सहभाग होता.
तीन दिवसीय श्री ग्रंथराज
ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन पुर्ण झालेनंतर लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे
पुण्यतिथी दिवशी फुलाने सजविलेल्या पालखीत श्री ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या
प्रतिमा ठेवून टाळ मृदुंगाच्या तालावर,डोक्यावर कलश,तुळशी वृंदावन
घेतलेल्या सुहासिनी महिला ढोल वाद्यांसमवेत श्री विठ्ठल नामाचा तसेच ज्ञानोबा
माऊली ज्ञानराज माऊली यांचे गजरात आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयघोषात
माऊलीच्या निघालेल्या भव्य दिंडीला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी
स्मारकापासून सुरुवात करण्यात आली.पारायण सोहळयाची भव्य दिंडी ही कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते यांचे
पुर्णाकृती पुतळयासमोर आलेनंतर नामदार शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून लोकनेते
बाळासाहेब देसाई यांच्या पुतळयावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच २१
तोफांची सलामी देण्यात आली.तसेच सातारा जिल्हा पोलीस दलाचेवतीने मान वंदना देण्यात
आली. तर पुतळयासमोर अभंग व आरती करुन लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा 42 वा पुण्यतिथी
सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर
पुतळ्यासमोर भव्य असा रंगलेला रिंगण सोहळा हे दृष्य अत्यंत मनमोहक होते. चौथ्या दिवशी काल्याच्या किर्तनाने उपस्थित सर्व भाविक
भक्तांना महाप्रसाद देवून या अखंड हरीनाम भव्य सोहळ्याची सांगता करण्यात आली.लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी दिवशी दौलतनगरला
प्रती पंढरपुर अवतरले होते. गत चौदा
वर्षापासून ह.भ.प.पुडंलिक महाराज कापसे आळंदीकर हे या पारायण सोहळ्यामध्ये
व्यासपीठ चालक म्हणून आपली सेवा बजावीत आहेत. यंदाचा सोहळयातही त्यांनी व्यासपीठ चालक म्हणून सेवा बजावली तर हा पारायण
सोहळा यशस्वी करण्याकरीता मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ.प.जयवंतराव शेलार महाराज,ह.भ.प.अनिल पाटील महाराज,ह.भ.प.जगन्नाथ ठोंबरे महाराज यांच्यासह त्यांचे सहकारी यांचेसोबत
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील अधिकारी व कर्मचारी
यांनी कष्ट घेतले. या सोहळ्यास
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील सर्व प्रमुख पदाधिकारी व
कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
चौकट-रिंगण सोहळा ठरला भाविकांसाठी आकर्षण.
लोकनेते
बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी निमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे
पुतळ्यास अभिवादन केलेनंतर पुतळ्यासमोर प्रतिवर्षी साजरा करण्यात येणारा रिंगण
सोहळा हा या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असते, या रिंगण सोहळ्यामध्ये अबाल वृध्दासंह लहानथोर सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी
होत असतात. यंदाच्या वर्षी लोकनेते साहेबयांचे
पुण्यतिथी सोहळयानिमित्त रिंगण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या रिंगण सोहळयामध्ये मा.ना.श्री.शंभूराज देसाई यांचेसह सौ.स्मितादेवी देसाई, मा.यशराज देसाई, मा.रविराजदेसाई, डॉ.सौ. वैष्णवीराजे देसाई,चि.जयराज देसाई,चि.आदित्यराज देसाई यांचे उपस्थितीमुळे हा रिंगण सोहळा उपस्थित
सर्व भक्त,भाविकांसाठी आकर्षण ठरले.तसेच हा रिंगण सोहळा पाहून उपस्थित भाविक भक्त
भारावून गेले.