दौलतनगर दि.03:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 42 व्या पुण्यतिथी
सोहळयानिमित्त दौलतनगर, ता.पाटण याठिकाणी
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने श्री ग्रंथराज
ज्ञानेश्वरी तीन दिवसीय पारायण सोहळयाचे आयोजन रविवार दि.२० एप्रिल ते बुधवार दि. २३ एप्रिल,२०२5 पर्यंत
कारखाना कार्यस्थळ दौलतनगर ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई
शताब्दी स्मारकामध्ये आयोजित करण्यात आले आहे. तत्पुर्वी शनिवार दि.१9 एप्रिल,२०२5 रोजी लोकनेते
बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे
जीवन चरीत्राची तसेच कार्याची विविधांगी माहिती देणारे व लोकनेते साहेब यांचे
स्वप्नातील तालुका या संबंधीचे चित्ररथ व गौरव यात्रेची मिरवणूक पाटण तालुक्यात
काढण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण
समुह तसेच पाटण तालुका वारकरी संघाच्यावतीने प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
लोकनेते बाळासाहेब
देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाटण तालुक्यात प्रथमच भव्य स्वरुपात तीन
दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. सन २०१० पासून प्रतिवर्षी हा पारायण सोहळा आयोजीत करण्यात
येतो. यंदाच्या वर्षी दि.२३ एप्रिल,२०२5 रोजी लोकनेते बाळासाहेब
देसाईसाहेब यांच्या 42 व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने दि.२० ते २३ एप्रिल,२०२5 पर्यंत
तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयाचे आयोजन महाराष्ट्र
दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये करण्यात आले आहे. रविवार दि.२० एप्रिल रोजी पारायण सोहळयाचा शुभारंभ व श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन
पाटण तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प.जयवंतराव शेलार यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र
राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री
मा.ना. श्री.शंभूराज
देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दिप प्रजल्वन करुन करण्यात येणार आहे.
हा पारायण सोहळा
कारखाना कार्यस्थळावर साजरा होत असताना शनिवार दि.१9 एप्रिल रोजी सकाळी ०8.०० वा.लोकनेते बाळासाहेब देसाई संहकारी उद्योग व शिक्षण समुहात कार्यान्वित असणाऱ्या
विविध संस्थांचे तसेच विविध शासकीय विभागांच्या वतीने लोकनेते बाळासाहेब देसाई
यांनी राज्य शासनाच्या विविध खात्यांचे कर्तबगार मंत्री आणि महाराष्ट्राचे पोलादी
पुरुष म्हणून केलेल्या अतुलनीय कार्याचे व त्यांच्या जीवनचरित्रावरील काही
महत्वाच्या घटनांचे दर्शन घडविणारे तसेच लोकनेते साहेब यांचे स्वप्नातील तालुका या
संबंधित चित्ररथ व गौरव यात्रेचे नियोजन करण्यात आले असून या चित्ररथाचे व गौरव
यात्रेचा प्रारंभ पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये कारखाना
कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयापासून करण्यात
येणार असून हा चित्ररथ व गौरवयात्रा चोपदारवाडी, गव्हाणवाडी, सुर्यवंशीवाडी, पापर्डे, मारुलहवेली फाटा, सोनाईचीवाडी, नावडी, निसरे फाटा, मल्हारपेठ, नवारस्ता, आडूळपेठ, आडूळ गावठाण, येरफळे, पाटणपर्यंत अशी चित्ररथ व गौरव यात्रेची मिरवणूक काढण्यात येणार असून पाटण
येथे या चित्ररथ व गौरव यात्रेची सांगता होणार आहे.
या पारायण सोहळयात
ह.भ.प. पुंडलीक महाराज कापसे आळंदीकर हे व्यासपीठ चालक असून रविवार दि. २० एप्रिल २०२5 रोजी ह.भ.प.रामकृष्ण महाराज
कारंजकर तासगाव यांचे प्रवचन, ह.भ.प. तुकाराम हजारे महाराज
अथणी बेळगाव यांचे किर्तन, सोमवार दि. २१ एप्रिल, २०२5 रोजी ह.भ.प. वासुदेव गुरव
महाराज, चिपळूण यांचे प्रवचन तर ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे,संत तुकाराम महाराज
यांचे 11 वे वंसज
यांचे किर्तन आणि मंगळवार दि.२२ एप्रिल, २०२5 रोजी ह.भ.प रविंद्र महाराज
लोहार,अध्यक्ष गुरुकुल श्री ज्ञानेबाराय वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र करंडी
ता.सातारा यांचे प्रवचन तर ह.भ.प. श्रीमहंत
पुरुषोत्तमदादा पाटील आळंदीकर यांचे किर्तन होणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई
यांच्या 42 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त बुधवार दि. २३ एप्रिल २०२5 रोजी सकाळी 8.३० ते 9.३० वा. श्रीमती विजयादेवी देसाई (मॉसाहेब), मा.नामदार श्री. शंभूराज देसाई व मा.सौ.स्मितादेवी देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज
देसाई (दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा) यांचे
प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा व
पुतळयावर पुष्पवृष्टी आणि विनम्र अभिवादन व नंतर रिंगण सोहळा होणार असून त्यानंतर
सकाळी १० ते १२ वा.पर्यंत ह.भ.प. अमोल
पाटील महाराज,संस्थापक अध्यक्ष श्री संत तुकाराम वारकरी शिक्षण संस्था गिरेवाडी
यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह,दौलतनगर यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून
त्यांनतर पारायणाची सांगता करण्यात येणार आहे.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख, पर्यटन खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना.श्री.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाचे हे सोळावे वर्ष असून या पारायण सोहळयाच्या निमित्ताने पाटण तालुक्यातील किर्तनकार,प्रवचनकारांना तालुकास्तरीय व्यासपीठ निर्माण झाले आहे.या पारायण सोहळयामध्ये सहभागी होणाऱ्या श्री ज्ञानेश्वरी वाचकांनी आपल्या नावाची नोंद ही कारखान्याचे मुख्य कार्यालय,शेती ऑफीस विभागीय कार्यालय,गट ऑफीस तसेच शिवदौलत सह.बँक शाखा मल्हारेपठ, ढेबेवाडी, तारळे, दौलतनगर, पाटण व मलकापूर या शाखांचे ठिकाणी करावी.तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 42 व्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचा तालुक्यातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ही पत्रकांत करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment