दौलतनगर दि.१9:-
महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई
यांच्या 42 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त लोकनेते साहेब यांचे जीवन कार्यावरील काही
महत्त्वाच्या घटनांचे दर्शन घडविणारे तसेच पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे
माध्यमातून मार्गी लागलेली व नियोजित विकास कामांचे दर्शन घडविणारे चित्ररथ व गौरव
यात्रेची व पालखीची भव्य मिरवणूक पाटण तालुक्यात शनिवारी मोठया उत्साहात पार पडली.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख व महाराष्ट्र
राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे
संकल्पनेतून साकारलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जीवन कार्यावरील चित्ररथ व
गौरव यात्रेला तालुक्यातील जनतेने चांगला प्रतिसाद दिला. तसेच या चित्ररथ गौरव यात्रेमधील पालखीमध्ये
ठेवलेल्या लोकनेते साहेब यांचे पादुकांचे दर्शन घेऊन अभिवादन केले.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या
पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रतिवर्षी दौलतनगर, ता.पाटण येथे श्री ग्रंथराज पारायण सोहळा आयोजित केला जातो. यंदाच्या वर्षी
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या42 व्या पुण्यतिथी सोहळया
निमित्त रविवारदि. 20 ते बुधवार दि. 23 एप्रिल पर्यंत दौलतनगर, ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत
लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये तीन दिवसीय श्री ग्रंथराज पारायण
सोहळा संपन्न होत आहे. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पारायण सोहळयाच्या अगोदर लोकनेते बाळासाहेब
देसाई यांनी महाराष्ट्र राज्याकरीता केलेल्या अतुलनीय कार्याची ओळख करुन
देण्याकरीता त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारे, लोकनेते साहेब यांनी राज्यासाठी, जिल्हयासाठी तसेच
तालुक्यासाठी दिलेल्या योगदानाची युवा पिढीला माहिती देणारे तसेच लोकनेते साहेब
यांचे स्वप्नातील तालुका या संकल्पनेतून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे माध्यमातून मतदार संघात साकारलेले
तसेच नियोजित विकास कामे या सर्वांचे चित्ररथांची गैारवयात्रा व गौरव यात्रेच्या पुढे
लोकनेते यांच्या पादुकांचा पालखी रथ असा सोहळा साजरा करण्यात येऊन तालुक्यातील 22 गावातून हे चित्ररथ व गौरव यात्रेचे मार्गक्रमण झाले. शनिवारी सकाळी 09 वाजता लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई यांचे शभहस्ते कारखाना
कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण
करुन विनम्र अभिवादन करीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पादूकांचे पूजन करुन या
चित्ररथ गौरव यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच श्रीमती विजयादेवी देसाई यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालय मल्हारपेठ
येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करत अभिवादन
केले.पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती
पाटण लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे फोटोला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे चित्ररथ गौरव यात्रेवेळी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज
देसाई(दादा),उपविभगीय अधिकारी सोपान टोंपे,तहसिलदार
अनंत गुरव अशोकराव पाटील, विजय पवार, संतोष गिरी, भरत साळूंखे, अभिजित पाटील, बबनराव शिंदे, सोमनाथ खामकर, संजय देशमुख, जालंदर पाटील यांचेसह
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शासनाच्या
विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे अभिवादन करण्यासाठी दौलतनगर
येथे उपस्थित होते.
लोकनेते बाळासाहेब देसाई चित्ररथ व गौरवयात्रेमध्ये
विविध वाद्य, लोकनेत्यांची आकर्षक पालखी, फटाक्यांची आतषबाजी यामुळे तालुक्यातील सर्व वातावरण दुमदुमुन
गेले होते. तालुक्यातील दौलतनगर,चोपदारवाडी, मारुलहवेली,निसरे फाटा,मल्हारपेठ, नाडेनवारस्ता,पाटण असा मार्ग होता.एकूण 22 गावातून जाणारा हा चित्ररथ गौरवयात्रेच्या
सोहळयाचे मोठया उत्साहात ठिकठिकाणी पुष्पहार अर्पण करुन लोकनेत्यांच्या पालखी मधील
पादुकांचे महिला वर्गाकडून पूजन करुन या चित्ररथ गौरवयात्रेचे स्वागत करण्यात
आले.या चित्ररथ गौरवयात्रेमध्ये शासकीय विभागांचा सहभाग होता. शासकीय विविध विभाग
व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुह यांचे 23 आकर्षक चित्ररथ या
सोहळयामध्ये सहभागी झाले होते. या चित्ररथ गौरवयात्रेची मिरवणूक भर उन्हातही अत्यंत उत्साहात
संपन्न झाली. दरम्यान रविवार दि. 20 एप्रिल पासून ग्रंथराज
श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचा प्रारंभ महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई
शताब्दी स्मारक दौलतनगर येथे होणार असून रविवार दि. २० एप्रिल २०२5 रोजी ह.भ.प.रामकृष्ण महाराज
कारंजकर तासगाव यांचे प्रवचन, ह.भ.प. तुकाराम हजारे महाराज
अथणी बेळगाव यांचे किर्तन, सोमवार दि. २१ एप्रिल, २०२5 रोजी ह.भ.प. वासुदेव गुरव
महाराज, चिपळूण यांचे प्रवचन तर ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे,संत तुकाराम महाराज
यांचे 11 वे वंसज
यांचे किर्तन आणि मंगळवार दि.२२ एप्रिल, २०२5 रोजी ह.भ.प रविंद्र महाराज
लोहार,अध्यक्ष गुरुकुल श्री ज्ञानेबाराय वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र करंडी
ता.सातारा यांचे प्रवचन तर ह.भ.प.
श्रीमहंत पुरुषोत्तमदादा पाटील आळंदीकर यांचे किर्तन होणार असून लोकनेते बाळासाहेब
देसाई यांच्या 42 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त बुधवार दि. २३ एप्रिल २०२5 रोजी सकाळी 8.३० ते 9.३० वा.श्रीमती विजयादेवी देसाई (मॉसाहेब), मा.नामदार श्री. शंभूराज देसाई व मा.सौ.स्मितादेवी देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन
मा.श्री.यशराज देसाई (दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई
(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत
दिंडी सोहळा व पुतळयावर पुष्पवृष्टी आणि विनम्र अभिवादन व नंतर रिंगण सोहळा होणार
असून त्यानंतर सकाळी १० ते १२ वा.पर्यंत ह.भ.प. अमोल पाटील महाराज,संस्थापक अध्यक्ष श्री संत तुकाराम वारकरी शिक्षण
संस्था गिरेवाडी यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी
उद्योग समुह,दौलतनगर
यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर पारायणाची सांगता
करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment