Sunday, 20 April 2025

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 42 व्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर,ता.पाटण येथे भक्तीमय वातावरणात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास प्रारंभ.

 

दौलतनगर दि.20:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 42 व्या पुण्यतिथीनिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उदयोग समुह व पाटण तालुका वारकरी संघ यांचे सौजन्याने दौलतनगर, ता. पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये  सोळाव्या वर्षी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचा प्रारंभ रविवार दि. २० एप्रिल,२०25 रोजी भाविक भक्तांच्या उदंड प्रतिसादाने भक्तीमय वातावरणात ह...जयवंतराव शेलार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रंजना जयवंतराव शेलार यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.तसेच श्रीमती विजयादेवी देसाई, ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करण्यात आले.

                   मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून सन २०१० या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून पाटण तालुक्यात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येत असून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास पाटण तसेच शेजारील तालुक्यातील भाविकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता लोकनेते बाळासाहेब देसाई यांची पुण्यतिथी हि दौलतनगर येथे तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयानेच साजरी करण्यात येत आहे. यंदा या पारायणाचे सोळावे वर्ष असून प्रति वर्षाप्रमाणे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 42 व्या पुण्यतिथीनिमित्त दि. २० ते २३ एप्रिल, २०25 पर्यंत तीन दिवसीय पारायण या ठिकाणी होत आहे.

              दौलतनगर,ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये सुरु झालेल्या पारायण सोहळयामध्ये 783 वाचक सहभागी झाले आहेत. पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाच्या निमित्ताने तालुक्यातील तसेच शेजारील तालुक्यातील किर्तनकार, प्रवनचनकारांना एक चांगले तालुकास्तरीय व्यासपिठ निर्माण झालेले असून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पाटण तालुक्यातील दौलतनगरला लोकनेते बाळासाहेब देसाई नगरीमध्ये पारायण सोहळयामुळे प्रति पंढरीचे रुप अवतरले असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यानयंदाचे पारायण सोहळयास वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रति वर्षाप्रमाणे व्यासपीठ चालक म्हणून ह...पुंडलिक महाराज कापसे,आळंदीकर हे उपस्थित असून सोमवार दि. २१ एप्रिल, २०२5 रोजी ह.भ.प. वासुदेव गुरव महाराज, चिपळूण यांचे प्रवचन तर ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे,संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंसज यांचे किर्तन आणि मंगळवार दि.२२ एप्रिल, २०२5 रोजी ह.भ.प रविंद्र महाराज लोहार,अध्यक्ष गुरुकुल श्री ज्ञानेबाराय वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र करंडी ता.सातारा  यांचे प्रवचन तर ह.भ.प. श्रीमहंत पुरुषोत्तमदादा पाटील आळंदीकर यांचे किर्तन होणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 42 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त बुधवार दि. २३ एप्रिल २०२5 रोजी सकाळी 8.३० ते 9.३० वा.श्रीमतीविजयादेवीदेसाई(मॉसाहेब),मा.नामदार श्री. शंभूराज देसाई व मा.सौ.स्मितादेवी देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई (दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा व पुतळयावर पुष्पवृष्टी आणि विनम्र अभिवादन व नंतर रिंगण सोहळा होणार असून त्यानंतर सकाळी १० ते १२ वा.पर्यंत ह.भ.प. अमोल पाटील महाराज,संस्थापक अध्यक्ष श्री संत तुकाराम वारकरी शिक्षण संस्था गिरेवाडी यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह,दौलतनगर यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर पारायणाची सांगता करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment