Tuesday, 30 June 2026

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेतून पाटण विधानसभा क्षेत्रासाठी 04 कोटींचा निधी. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मतदारसंघातील शेत/पाणंद रस्त्यांची कामे लागणार मार्गी.

 


दौलतनगर दि.30:- महाराष्ट्र शासनाने नव्याने सुरु केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते येाजनेतून पाटण विधानसभा क्षेत्रासाठी 04 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने दि.29 जून 2026 रोजी पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

            प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी इत्यादी कामांसाठी तसेच शेतीमाल बाजारात पोहोचविण्यासाठी बारमाही शेतरस्ते असणे अत्यंत आवश्यक होते. यांत्रिकीकरणामुळे शेतातील कामांसाठी यंत्रसामग्रीचा वापर वाढत असल्यामुळे शेतापर्यंत पोहचण्यासाठी चांगले रस्ते असणे गरजेचे आहे. असे शेतरस्ते हे सामान्यत: रस्ते योजनेत समाविष्ठ नसल्यामुळे शेतकऱ्यांची दळण वळणाची मोठी गैरसोय होत होती.तसेच काही ठिकाणी शेतरस्ते अतिक्रमित झालेले असून वाहतूकीसाठी योग्य नसल्याचे निदर्शनास आले.या पार्श्वभूमीवर शेत/पाणंद रस्ते प्रभावीपणे सक्षम होण्याकरीता आणि रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्यासंदर्भात मंत्रिमडळाच्या बैठकमीमध्ये चर्चा होऊन ग्रामीण भागामध्ये पुर्णपणे यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने जलद गतीने कामे करण्याकरीता सोपी व सुलभ कार्यपध्दती असलेली मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना ही स्वतंत्र योजना महसूल विभागामार्फत राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना राबविण्याकरीता विविध यंत्रणेमध्ये सुसुत्रता व जबाबदारीच्या स्पष्टतेसाठी राज्याचे महसूल मंत्री यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती तर जिल्हयाचे पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यकारी समिती तसेच विधानसभा सदस्यांचे अध्यक्षतेखाली विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती  या तीन समित्या स्थापन केल्या आहेत.दि.14.12.2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना सुरु करणे व ती राबविण्याकरीता सोपी व सुलभ कार्यपध्दती निश्चित करण्यात आली असून महाराष्ट्र शासनाने नव्याने सुरु केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते येाजनेतून पाटण विधानसभा क्षेत्रासाठी 04 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने दि.29 जून 2026 रोजी पारित केला आहे.त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील शेतीच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे शेत/पाणंद रस्ते यांची कामे मोठया प्रमाणांत मार्गी लागणार असून संपूर्ण यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून हे शेत/पाणंद रस्ते तातडीने पूर्ण होणार असल्याने पाटण मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.लवकरच पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची बैठक घेऊन या योजनेमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील शेत/पाणंद रस्त्यांची कामे हाती घेणार असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत  देण्यात आली आहे.

सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय हक्कांसाठी सरकार संवेदनशील; आवश्यक ती सर्व कार्यवाही करू महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी समन्वयक मंत्री शंभूराज देसाई साहेब यांची भूमिका


मुंबई, दि. ३० : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत राज्य सरकार पूर्णपणे संवेदनशील असून सीमाभागातील मराठी बांधवांचे न्याय-हक्क अबाधित राहावेत यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.


महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात नियम २८९ अंतर्गत चर्चा घेण्याबाबत सदस्य भाई जगताप यांनी मागणी केली. हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा व मराठी अस्मितेचा प्रश्न असून या विषयावर सभागृहात चर्चा व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. सदस्य अनिल परब यांनीही नियम २८९ अंतर्गत दिलेली सूचना नामंजूर करण्यामागील कारण स्पष्ट करण्याची मागणी करत, हा विषय तातडीचा असल्याचे सांगितले.


यावर उत्तर देताना समन्वयक मंत्री देसाई म्हणाले की, संबंधित विषयावर चर्चा स्वीकारायची किंवा अन्य संसदीय प्रक्रियेद्वारे घ्यायची, हा अधिकार सभापतींचा आहे. मात्र, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत सरकार अजिबात उदासीन नसून या विषयावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.


राज्य सरकारने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांची आणि आपली समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती केली असून, कायदे व न्याय विभाग तसेच महाधिवक्ता यांच्यासमवेत आतापर्यंत तीन बैठका झाल्या आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणावर तीन वेळा सुनावणी झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.


महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत सरकार पूर्णपणे संवेदनशील असून सीमाभागातील मराठी बांधवांचे हक्क, न्याय्य मागण्या आणि हिताचे संरक्षण करण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते करण्याची राज्य सरकारची पूर्ण तयारी असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.

Monday, 29 June 2026

तक्षशिला सोसायटीलगतच्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू करणार – मंत्री शंभूराज देसाई

 

 जोगेश्वरी (पूर्व) येथील तक्षशिला सोसायटीलगत धोकादायक संरक्षण भिंतीजवळील ५० ते ६० झोपडीधारकांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी कलम १४(१) अंतर्गत भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक दृष्टीने प्रयत्न करेल, अशी ग्वाही गृहनिर्माण मंत्री तथा प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.


विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे आमदार अनंत (बाळा) भि. नर यांनी जोगेश्वरी (पूर्व) येथील तक्षशिला सोसायटीच्या पश्चिमेकडील धोकादायक संरक्षण भिंतीखाली वास्तव्यास असलेल्या ५० ते ६० झोपड्यांचा पुनर्वसन प्रकल्पात समावेश करावा, तसेच संबंधित कुटुंबांना संरक्षण देण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.


यावर उत्तर देताना मंत्री श्री. देसाई म्हणाले की, संबंधित परिसरात संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी २७ मे २०१६ रोजी संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधित झोपड्यांचा विद्यमान पुनर्वसन योजनेत समावेश करण्यासाठी जमीनमालकाची संमती आवश्यक असून, वारंवार पाठपुरावा करूनही ती प्राप्त झालेली नसल्यामुळे विद्यमान नियमांनुसार त्यांचा समावेश करता आलेला नाही.


तथापि, शासनाने क्लस्टर पुनर्विकास धोरण स्वीकारले असून, संबंधित जमीनमालकाची संमती न मिळाल्यास आवश्यकतेनुसार कलम १४(१) अंतर्गत भूसंपादनाची कार्यवाही करण्याबरोबरच या झोपड्यांचा क्लस्टर पुनर्विकास योजनेत समावेश करण्याबाबतही सकारात्मक विचार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी आमदार अनंत (बाळा) भि. नर यांनी पुनर्प्रश्न उपस्थित करत संबंधित झोपड्यांचा प्रवेशमार्ग बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याची बाब निदर्शनास आणून देत भूसंपादनाची कार्यवाही गतीने पूर्ण करून या कुटुंबांचा शेजारील पुनर्विकास प्रकल्पात समावेश करण्याची मागणी केली.


त्यावर मंत्री श्री. देसाई यांनी संबंधित भाग दरडप्रवण असल्याने संरक्षण भिंतीचे काम सुरू असल्याचे सांगितले. तसेच, झोपडीधारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी कलम १४(१) अंतर्गत भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, या विषयात शासन आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करेल, असे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

कोकणातील खारभूमी संरक्षणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार – मंत्री शंभूराज देसाई


 कोकणातील खारभूमीचे संरक्षण, शेतीक्षेत्राचे खाऱ्या पाण्यापासून संरक्षण आणि प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी शासन सकारात्मक असून, आवश्यक निधी उपलब्ध करून ही कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील. तसेच लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या प्राधान्याच्या कामांचा बृहत आराखड्यात समावेश करून ती शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.


विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात आमदार प्रवीण दरेकर यांनी कोकणातील हजारो हेक्टर शेतीक्षेत्र खाऱ्या पाण्यापासून वाचविण्यासाठी बृहत आराखडा, आवश्यक निधीची उपलब्धता आणि स्वतंत्र विशेष योजना राबविण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यास उत्तर देताना मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले की, आतापर्यंत १६५ योजना मंजूर करण्यात आल्या असून त्याअंतर्गत २२ हजार ५५८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. मार्च २०२५ पर्यंत १३६ कामे पूर्ण झाली असून २० हजार १२७ हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित करून लागवडीयोग्य करण्यात आले आहे.


उर्वरित २९ योजनांपैकी ११ कामे कांदळवन क्षेत्रातील पर्यावरणीय परवानग्या व इतर तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असून ती मार्गी लावण्यासाठी शासन आवश्यक कार्यवाही करीत असल्याचे त्यांनी सांगितले. दरेकर यांनी उल्लेख केलेल्या २१ प्रस्तावित कामांसाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून ती टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


गेल्या चार वर्षांत कोकण विभागातील खारभूमी संरक्षणाच्या कामांसाठी ७६.२८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, २०२४-२५ मध्ये २० कोटी रुपये, तर २०२५-२६ मध्ये २७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहितीही मंत्री श्री. देसाई यांनी दिली. तसेच रायगड जिल्ह्यातील कामांसाठी चालू वर्षात जलसंपदा विभागामार्फत २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी खारबंधाऱ्यांवरील उघडीच्या दरवाज्यांची वारंवार होणारी नादुरुस्ती तसेच खारभूमी विकास योजनांच्या मापदंडांमध्ये बदल करण्याची आवश्यकता उपस्थित केली. त्यावर उत्तर देताना मंत्री श्री. देसाई यांनी संबंधित यांत्रिकी विभागामार्फत अधिक टिकाऊ व दर्जेदार दरवाज्यांचा वापर करण्याबाबत तज्ज्ञांच्या सूचनांनुसार निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. तसेच लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेऊन विद्यमान मापदंडांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी विभागामार्फत कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Friday, 26 June 2026

नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे रस्त्यासाठी आशियाई विकास बँक (ADB) अंतर्गत 335 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्याला यश.

 

 

दौलतनगर दि.27: पाटण विधानसभा मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या राज्यमार्ग 148 नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे रस्त्यांचे पुनर्बांधणीचे कामासाठी निधी मंजूर होणेकरीता पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. ना.शंभूराज देसाई यांचे सातत्याचे पाठपुराव्यानुसार सन 2026-27चे आर्थिक वर्षात राज्यमार्ग 148 नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे रस्त्यांचे पुनर्बांधणीचे कामासाठी आशियाई विकास बँक (ADB) अंतर्गत 335 कोटी 50 लक्ष  रुपायांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

            प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदार संघातील कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी मार्ग असलेला राज्यमार्ग 148 नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे काले विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन हा दळण वळणसाठी  महत्त्वाचा असलेला राज्य मार्ग असून या मार्गावर मोठया प्रमाणांत वाहनांची वर्दळ असते.दरम्यान नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे या रस्त्याचे कामासाठी आशियाई विकास बँक (ADB) अंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक तो प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सुचना केल्या होत्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यामध्ये पाटण तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले आहेत. पुरवणी मागण्यांद्वारे तालुक्यातील विकासकामांसाठी मोठा आर्थिक निधी मंजूर करण्यात आला असून पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.पावसाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या पुरवणी मागण्यांनुसार राज्य मार्ग क्र. १४८ अंतर्गत नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे काले विंग वाठार रेठरे शेनोली स्टेशन रस्ता या महत्त्वाच्या मार्गाच्या उन्नतीकरणासाठी आशियाई विकास बँक (ADB) अंतर्गत तब्बल ३३५.५0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामामध्ये हेळवाक ते लेंडोरी आणि मोरगिरी ते मारुलहवेली फाटा या टप्प्यांतील कामांचा समावेश आहे.यामुळे तालुक्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध होण्याबरोबरच शेती, व्यापार, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे.

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीसाठी अतिरिक्त ५० कोटी रुपयांचा निधी.

              पावसाळी अधिवेशामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीसाठी अतिरिक्त ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आला आहे. या निधीमुळे पाटण तालुक्यासह इतर तालुक्यांतील विकासकामांना गती मिळणार आहे.  मंत्री शंभुराज देसाई यांचा पाटण तालुक्याच्या विविध विकासकामांसाठी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा सुरु असतो. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याने तालुक्याच्या विकासाचा वेग आणखी वाढणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटण तालुक्यासाठी मंजूर झालेल्या या पुरवणी मागण्या केवळ आर्थिक तरतुदी नसून विकास आणि सामाजिक बांधिलकीचा समतोल साधणाऱ्या आहेत. एका बाजूला रस्ते विकासासाठी भरीव निधी उपलब्ध झाला आहे, तर दुसऱ्या बाजूला मंत्री शंभूराज देसाई हे कोषाध्यक्ष असलेल्या कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीसाठी अतिरिक्त ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने  तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे. 

नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे रस्त्यासाठी आशियाई विकास बँक (ADB) अंतर्गत 335 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्याला यश.

 

दौलतनगर दि.26: पाटण विधानसभा मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या राज्यमार्ग 148 नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे रस्त्यांचे पुनर्बांधणीचे कामासाठी निधी मंजूर होणेकरीता पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. ना.शंभूराज देसाई यांचे सातत्याचे पाठपुराव्यानुसार सन 2026-27चे आर्थिक वर्षात राज्यमार्ग 148 नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे रस्त्यांचे पुनर्बांधणीचे कामासाठी आशियाई विकास बँक (ADB) अंतर्गत 335 कोटी 50 लक्ष  रुपायांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

            प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदार संघातील कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी मार्ग असलेला राज्यमार्ग 148 नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे काले विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन हा दळण वळणसाठी  महत्त्वाचा असलेला राज्य मार्ग असून या मार्गावर मोठया प्रमाणांत वाहनांची वर्दळ असते.दरम्यान नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे या रस्त्याचे कामासाठी आशियाई विकास बँक (ADB) अंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक तो प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सुचना केल्या होत्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यामध्ये पाटण तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले आहेत. पुरवणी मागण्यांद्वारे तालुक्यातील विकासकामांसाठी मोठा आर्थिक निधी मंजूर करण्यात आला असून पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.पावसाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या पुरवणी मागण्यांनुसार राज्य मार्ग क्र. १४८ अंतर्गत नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे काले विंग वाठार रेठरे शेनोली स्टेशन रस्ता या महत्त्वाच्या मार्गाच्या उन्नतीकरणासाठी आशियाई विकास बँक (ADB) अंतर्गत तब्बल ३३५.५0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामामध्ये हेळवाक ते लेंडोरी आणि मोरगिरी ते मारुलहवेली फाटा या टप्प्यांतील कामांचा समावेश आहे.यामुळे तालुक्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध होण्याबरोबरच शेती, व्यापार, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे.

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीसाठी अतिरिक्त ५० कोटी रुपयांचा निधी.

              पावसाळी अधिवेशामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीसाठी अतिरिक्त ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आला आहे. या निधीमुळे पाटण तालुक्यासह इतर तालुक्यांतील विकासकामांना गती मिळणार आहे.  मंत्री शंभुराज देसाई यांचा पाटण तालुक्याच्या विविध विकासकामांसाठी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा सुरु असतो. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याने तालुक्याच्या विकासाचा वेग आणखी वाढणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटण तालुक्यासाठी मंजूर झालेल्या या पुरवणी मागण्या केवळ आर्थिक तरतुदी नसून विकास आणि सामाजिक बांधिलकीचा समतोल साधणाऱ्या आहेत. एका बाजूला रस्ते विकासासाठी भरीव निधी उपलब्ध झाला आहे, तर दुसऱ्या बाजूला मंत्री शंभूराज देसाई हे कोषाध्यक्ष असलेल्या कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीसाठी अतिरिक्त ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने  तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे. 

उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचेकडून पाटण नगरपंचायतीकरीता 05 कोटींचा निधी मंजूर. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्याला यश.

 

दौलतनगर दि.26:- पाटण या तालुक्याच्या ठिकाणी  नगरपंचायतीच्या  क्षेत्रामध्ये  आवश्यक असणाऱ्या विकास कामांना महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून तातडीने निधी मंजूर होणेकरीता महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचेकडे 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याकरीता सातत्याने पाठपुरावा केला होता.मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केलेल्या शिफारशीनुसार पाटण नगरपंचायतीचे क्षेत्रामध्ये नागरी सुविधा पुरविण्याच्या  विविध विकास कामांना 05 कोटी रुपयांचा निधी वितरित केला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने पारीत केला असल्याची माहिती ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

              प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण नगरपंचायतीचे क्षेत्रामध्ये नागरी सुविधांची अनेक कामे गेली अनेक वर्ष प्रलंबित असल्याने येथील नागरीकांची मोठी गैरसोय होत होती. तसेच पाटण शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने सदरची नागरी सुविधांची कामे मंजूर होण्यासाठी मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे शिफारस केली होती. ना.शंभूराज देसाई यांनी केलेल्या शिफारशीनुसार पाटण नगरपंचायतीचे क्षेत्रामध्ये नागरी सुविधांचे  विविध विकास कामासाठी राज्याचे नगरविकास विभागाने 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचा शासन निर्णय पारित केला आहे. या शासन निर्णयानुसार पाटण नगरपंचायती अंतर्गत पुढीलप्रमाणे असणाऱ्या विविध विकास कामांना निधी मंजूर करण्यात आला आहे.यामध्ये पाटण नगरपंचायत  

प्रभाग क्र.14 स्मशानभूमी बांधणे व सुशोभिकरण 35 लक्ष, प्रभाग क्र. 11 एस.टी.कॉलनीमध्ये सभामंडप 25 लक्ष, प्रभाग क्र. 11 जालिंदर देवकांत यांचे घरापासून नंदकुमार देवकांत यांचे घरापर्यंत पेव्हर ब्लॉक 10 लक्ष, प्रभाग क्र. 09 लायब्ररी चौक ते चाफोली रोड रस्ता सुधारणा  व गटर बांधकाम 30 लक्ष, प्रभाग क्र. 17 लोहार यांच्या मळीमध्ये पायऱ्या 15 लक्ष, प्रभाग क्र.06 बाजार समिती मैदान मजबुतीकरण सुशोभिकरण 20 लक्ष, प्रभाग क. 05 व 06 आर.सी.सी.गटर 10 लक्ष, प्रभाग क्र.13 नागोबा मंदिर नगर पंचायत जागेमध्ये सभामंडप 25 लक्ष, प्रभाग क्र.15 भास्कर कुंभार यांचे घर ते कराड चिपळूण रोड आर. सी. सी. बंदिस्त गटर 20 लक्ष, प्रभाग क्र.15 एल.एम.पवार यांचे घरापासून आनंदा आर्डे यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक व बंदिस्त आर.सी.सी.गटर 10 लक्ष, प्रभाग क्र.06 बाजार समिती कमान 15 लक्ष, प्रभाग क्र.16 साळुंखे हायस्कुल ते संतोष नाईकवडी यांचे घर व श्री. ठोके यांचे घर ते सुरेश नायकवडी यांचे घररस्ता काँक्रीटीकरण व बंदीस्त गटर बांधकाम 35 लक्ष, प्रभाग क्र.08  चंद्रकांत भिसे यांचे घरापासून आनंदा शिरसाठ यांच्या घरापर्यंत रस्ता  व गटर 20 लक्ष, प्रभाग क्र. 15 गणपती मंदिर सुशोभिकरण 15 लक्ष, प्रभाग क्र.11 सर्जेराव चव्हाण यांचे घर ते प्रकाश पाटील यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण 15 लक्ष, मुस्लिम स्मशानभूमी कपौंड 25 लक्ष, इदगाह परिसर सुशोभिकरण 25 लक्ष, प्रभाग क्र. 17 भुई समाजाकरीता समाज मंदिर 25 लक्ष, प्रभाग क्र. 06 बाजार समिती परिसरामध्ये शौचालय 25 लक्ष, प्रभाग क्र. 14 कराड चिपळूण रोड ते मुळगांव पुल रस्ता सुधारणा 55 लक्ष, प्रभाग क्र. 17 शफिभाई सातारकर यांचे घरापासून लोहार यांचे शेतापर्यंत आऱ.सी. सी. गटर 15 लक्ष, प्रभाग क्र.13 श्री. देसाई ते डॅा. सावंत यांचे घर ते श्री. नाना इंगळे ते बापू टोळे यांचघर रस्ता  जिरवूण  काँक्रीटीकरण 20 लक्ष, प्रभाग क्र.08  सेवागिरी महाराज मंदीरासमोर सभामंडप 10 लक्ष असा एकूण 05 कोटींचा निधी नगरविकास विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे..राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी पाटण नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये नागरी सुविधा पुरविण्याच्या कामांना भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल ना.शंभूराज देसाई यांनी आभार मानले. लवकरच या मंजूर कामांची निविदा प्रक्रीया होऊन तातडीने हि कामे मार्गी लागणार असल्याचे शेवठी पत्रकात म्हटले आहे.

 

Wednesday, 24 June 2026

पाटण व मरळी बस स्थानकांच्या आधुनिकीकरण व सुशोभीकरणसाठी ६.९७ कोटींचा निधी मंजूर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्याला यश; प्रवाशांना मिळणार आधुनिक सुविधा




          पाटण तालुक्यातील पाटण आणि  मरळी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकांच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल ६ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांना महाव्यवस्थापक बांधकाम यांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. बस स्थानकांचे सुशोभीकरण, अतिरिक्त प्रवासी सुविधा, पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि आगार परिसराचे आधुनिकीकरण या कामांचा यात समावेश आहे. या निधी मंजुरीमुळे तालुक्यातील हजारो एसटी प्रवाशांना दर्जेदार आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असल्याचे प्रसिध्दीपत्रकांत नमूद केले. 

            प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण आगार हे पश्चिम महाराष्ट्र  व कोकणावला जोडणारे मध्यवर्ती आगार आहे. त्यामुळे या आगारात मोठ्या प्रमाणात प्रवाशी प्रवास करतात.पाटण येथील राज्य परिवहन आगाराच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये आगार इमारतीचे बाह्य सुशोभीकरण, आगार व्यवस्थापक निवासस्थान, पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन  विद्युत कामे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कुंपण भिंत व प्रवेशद्वार, वाहनतळ काँक्रिटीकरण आणि पेवर ब्लॉक बसविणे या कामांचा समावेश आहे.आहे तर मरळी हे पाटण तालुक्यातील महत्त्वाचे दळणवळण केंद्र असून लोकनेते बाळासाहेब देसाई महाराष्ट्र दौलत शताब्दी स्मारक व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना मरळी येथे असल्याने या स्थानकामध्ये ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर या बस स्थानकाचा वापर करतात. वाढती प्रवासी संख्येमुळे स्थानकाच्या विकासाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. मंजूर निधीमुळे या मागणीला अखेर मूर्त स्वरूप प्राप्त होणार आहे. मरळी बस स्थानकाच्या विकासासाठी १ कोटी ९७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये तळमजल्याचे नूतनीकरण, बाह्य सुशोभीकरण, पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन, विद्युत कामे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, संरक्षक भिंत, आरसीसी रिटेनिंग वॉल, वाहनतळाचे काँक्रिटीकरण आणि पेवर ब्लॉक बसविणे आदी कामांचा समावेश आहे.

            पाटण आणि मरळी स्थानकासाठी निधी उपलब्ध करून देण्याकरीता पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सन 2014 पासून  महत्त्वाची भूमिका बजावली आहे . पाटण आगाराचे नुकतेच वाढीव फलकांचे उद्गाटन झाले आहे. तर मरळी बस स्थानकाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम चालू आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक एसटी सुविधा मिळाव्यात तसेच भविष्यातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा उभाराव्यात, यासाठी शंभूराज देसाई यांनी शासन व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल होता असे पत्रकात म्हटले आहे. या कामांची तातडीने निविदा प्रक्रिया करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.