दौलतनगर दि.10 :दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची
56 वी वार्षिक सर्वसाधारण सभा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व
माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.श्री.शंभूराज
देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.12 सप्टेंबर,2026 रोजी
दु.01.00वा. संपन्न होणार आहे. “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी
स्मारक दौलतनगर, ता.पाटण या ठिकाणी
पालकमंत्री मा. ना. श्री. शंभूराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण
संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई(दादा) व सर्व संचालक मंडळ
हे 56व्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरीता उपस्थित राहणार आहेत.
तरी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे 56 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरीता
जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित रहावे,असे आवाहन कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग
नलवडे यांनी शेवटी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.
Wednesday, 9 September 2026
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची शनिवार दि. 12 सप्टेंबर रोजी दौलतनगर येथे 56 वी वार्षिक सर्वसाधारण सभा.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment