दौलतनगर दि.26:- पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील विविध गावांतील नळ पाणी
पुरवठा योजनांचे कामांसाठी निधी मंजूर होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे
पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांनी कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडे शिफारस केली
होती.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 52 गावांतील नळ पाणी पुरवठा येाजनांचे
कामांना कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीमधून 10 कोटी 65 लाख 46 हजार रुपयांचा
निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे
कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकां दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे
म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघात विविध गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांचे
कामांना निधी मंजूर होणे गरजेचे होते.गेली तीन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने
या गावांमध्ये संभाव्या पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन या नळ पाणी पुरवठा
योजनांचे कामांना निधी मंजूर होण्यासंदर्भात संबंधित गावातील ग्रामस्थांनी
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील 52 गावांतील नळ पाणी पुरवठा
योजनांचे कामांना निधी मंजूर होण्यासाठी कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती
न्यासाकडे शिफारस केल्यानुसार या नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांना कोयना भूकंप
पुनर्वसन निधी समितीमधून 10 कोटी 65 लाख 46 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कोयना
भूकंप पुनर्वसन निधी समितीमधून मंजूर झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांमध्ये
लोहारवस्ती केरळ 15 लक्ष, चिटेघर 25 लक्ष,एकावडेवाडी सळवे 10 लक्ष,भुडकेवाडी 30
लक्ष,गायमुखवाडी बांबवडे 10 लक्ष,शिंदेवाडी 35.59 लक्ष,जाळगेवाडी 18 लक्ष,तामिणे
15 लक्ष,शिंगणवाडी 20 लक्ष,मरळोशी 10 लक्ष,मोरगिरी 15 लक्ष,हुंबरवाडी 15 लक्ष,आडूळ
गावठाण 20 लक्ष,खडकवाडी वजरोशी 15 लक्ष,नुने 20 लक्ष,आडदेव 20 लक्ष,मानेगाव 20
लक्ष,वेताळवाडी 20 लक्ष,साईकडे 19.95 लक्ष,कातवडी 17 लक्ष,कामरगाव 15 लक्ष,कोकीसरे
20 लक्ष,सुतावाडी मालदन 15 लक्ष,कुशी पुनर्वसन वेखंडवाडी 10 लक्ष,आडूळपेठ 15 लक्ष,
चिंचेवाडी वजरोशी 10 लक्ष,कोरिवळे 50 लक्ष,मस्करवाडी नं.2 10 लक्ष,सावंतवस्ती
मारुल तर्फ पाटण 13 लक्ष,रामेल 23 लक्ष,आंबळे 15 लक्ष,माणगाव खालची डोंगळेवाडी
16.50 लक्ष,जुंगठी 20 लक्ष,शिरळ 20 लक्ष,बोर्गेवाडी पुनर्वसन सांगवड 15
लक्ष,चोपदारवाडी 20 लक्ष,चोपडी 20 लक्ष,डोणी मालोशी पाडेकरवाडी 10 लक्ष,घेरादातेगड
5 लक्ष,नाणेगाव चव्हाणवाडी 15 लक्ष,मंद्रुळकोळे 20 लक्ष,रुवले 21 लक्ष,कुसवडे
झाकडे 35 लक्ष,पाणेरी वाल्मिकवाडी 20 लक्ष,वरकवस्ती केंजळवाडी 17 लक्ष,मोरेवाडी
पेठशिवापूर 15 लक्ष,पाचगणी खडकचा वाडा 15 लक्ष,मुरुड डिगेवाडी गोरेवाडी धुमुकवाडी
20 लक्ष,डफळवाडी निवडे 42.50 लक्ष,मरळी
जलशुध्दीकरण प्रकल्प 97.50 लक्ष, दौलतनगर मरळी सावठवण टाकी 25.50 लक्ष व
विठ्ठलवाडी शिरळ 20 लक्ष या 52 गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांचा समावेश आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद सातारा या कार्यान्वित यंत्रणांचे माध्यमातून
ही कामे मार्गी लागणार असल्याने या कामांची तातडीने निविदा प्रक्रिया करण्याच्या सूचनाही
यावेळी संबंधित अधिकारी यांना केल्या असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.
चौकट : टंचाईच्या पार्श्वभूमीवर 52 गावांतील योजनांना
निधी मंजूरीने मोठा दिलासा.
पाटण विधानसभा
मतदारसंघातील 52 गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांना 10 कोटी 65 लक्ष रुपयांचा निधी मंजूर
झाल्याने ऐन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर योजना मंजूर झालेल्या गावांतील पिण्याच्या
पाण्याची टंचाई दूर होण्यास मोठी मदत होणार
आहे.पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी टंचाईच्या पार्श्वभूमीवर मतदार संघातील 52 गावांतील
नळ पाणी पुरवठा योजनांना भरघोस निधी मंजूर केल्याने या गावांतील नागरिकांना मोठा दिलासा
निर्माण झाला.

No comments:
Post a Comment