दौलतनगर
दि.२५ :- २०१९ च्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत
आमदारकीची हॅट्रीक करणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाई तिसऱ्यांदा आमदार म्हणून
विजयी झालेनंतर विधानसभा सदस्यांचे निवडून आलेले प्रमाणपत्र घेणेकरीता पाटण तहसिल
कार्यालयात आलेले आमदार शंभूराज देसाईंनी आमदारकीचे प्रमाणपत्र हाती घेताच
आमदारकीच्या तिसऱ्या टर्ममधील कामांस सुरुवात केली. प्रमाणपत्र हाती घेतल्यानंतर
त्यांनी दि.२० रोजी पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीतील
नुकसानीचा तातडीने महसूल,कृषी व बांधकाम ग्रामीण विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून
तहसिल कार्यालयात आढावा घेतला.
विधानसभा निवडणूकीच्या
आदल्या दिवशी दि.२० रोजी मोठया प्रमाणात पाटण तालुक्यात अतिवृष्टी झाली
या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती, रस्ते, पुल याचा आढावा घेणेकरीता आमदार
शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय,पाटण येथे बैठक घेण्यात आली
होती.यावेळी बैठकीत दि.२० रोजीच्या अतिवृष्टीमध्ये पाटण तालुक्यातील शेतीचे मोठया
प्रमाणात नुकसान झाले असल्याने या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करणेत यावेत अशा
सुचना आमदार शंभूराज देसाईंनी प्रांरभी तालुका कृषी अधिकाऱ्यांना केल्या त्यानंतर
तालुक्यातील पवारवाडी व गारवडे येथील पुलावरुन अतिवृष्टीचे पाणी गेल्यामुळे
पवारवाडी येथील पुलाच्या दोन्ही बाजू खचल्या असल्याने कसणी,निवी,निगडे या गांवाकडे
जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद झाली असून या पुलाच्या भरावाच्या कामांना तात्काळ
सुरुवात करावी असे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांनाही
त्यांनी सांगितले त्याचबरोबर गारवडे येथील पुलाचे काम संबधित ठेकेदाराकडून तातडीने
परत करुन घ्यावे याविषयी कोणतीही तक्रार येवू देवू नये अशाही सुचना त्यांनी यावेळी
जिल्हा परीषदेच्या बांधकाम अधिकाऱ्यांना दिल्या तर दि.२१ ऑक्टोंबर रोजी दिवशी बु//
याठिकाणी आपल्या आजोबाबरोबर शेतात गेलेला ॠषीकेश संदीप थोरात हा ५ वर्षाचा मुलगा
ओढयाला मोठया प्रमाणात पाणी आल्याने हात निसटून वाहून गेल्यांने मृत झाल्याने
त्याचे कुटुबिंयाना तातडीची मदत करण्याचे व शासनाकडून या कुटुंबाला मदत
होणेकरीताचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे सादर करण्याच्या सुचना आमदार शंभूराज देसाई
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी बैठकीस महसूल, कृषी, ग्रामीण विकास,
जिल्हा परीषद व सार्वजनीक बांधकाम विभागाचे तालुकास्तरीय सर्व अधिकारी यांची
प्रमुख उपस्थिती होती.
चौकट :- आमदार देसाईंबरोबर
आमदारकीचे प्रमाणपत्र घेण्याकरीता शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित.
पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे
पाटण विधानसभा मतदारसंघाचे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले असून काल झालेल्या
विधानसभा निकालानंतर आमदार म्हणून निवड झालेले प्रमाणपत्र घेण्याकरीता तहसिल
कार्यालय, पाटण येथे आमदार शंभूराज देसाईंबरोबर शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी
उपस्थित होते. पाटण शहरात आमदार शंभूराज देसाईंचे ठिकठिकाणी जल्लोषात आतिषबाजी
करुन स्वागत करण्यात आले.तर आमदार शंभूराज देसाईंनी आमदारकीचे प्रमाणपत्र हाती
घेतल्यानंतर उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी तहसिल कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष
साजरा केला.
चौकट:- आमदार शंभूराज
देसाईंना प्रांताधिकारी यांनी दिले आमदारकीचे प्रमाणपत्र.
काल निकालाला वेळ झाल्यामुळे आमदार
शंभूराज देसाईंना २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत विधानसभा सदस्य म्हणून निवडून
आलेचे प्रमाणपत्र आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीरंग तांबे
यांनी तहसिल कार्यालय,पाटण याठिकाणी दिले.यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी
तथा तहसिलदार रवींद्र माने, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका कृषी अधिकारी
अविनाश मोरे यांची उपस्थिती होती.यावेळी विधानसभा निवडणूक सुस्थितीत पार
पडल्याबद्दल आमदार शंभूराज देसाईंनी सर्व अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment