दौलतनगर दि.१४:- ही निवडणूक ते ती निवडणूक केवळ मते मागायला जनतेच्या
दारात येणाऱ्या विरोधक युवा नेत्यांनी गत पाच वर्षात आमचेसाठी नेमके काय केले
म्हणून आम्ही तुम्हाला मते दयायची असा जाब मतदारांनी युवा नेते गांवात मते मागायला
आल्यानंतर विचारावा व आपण निवडणूका या विकासाच्या मुद्दयावर आतापर्यंत लढत आलो
आहोत आताही आपण विकासकामांच्या मुद्दयावरच निवडणूक लढवित आहोत येणाऱ्या निवडणूकीत विकासकामांच्या
माध्यमातून गाव समृध्द करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी मतदारसंघातील जनतेने ठाम उभे
रहावे असे आवाहन आमदार शंभूराज देसाईंनी केले आहे.
तारळे विभागातील
पाबळवाडी,बांधवाट,दुसाळे,वजरोशी,खडकवाडी,बामणेवाडी,जिमनवाडी,बागलेवाडी,
भोकरवाडी,जळव,मरळोशी,ढोरोशी,घोट,जुगाईवाडी,आंबळे,वेखंडवाडी,तारळे या गावांमध्ये आमदार
शंभूराज देसाईंच्या प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या होत्या या प्रचारसभेत ते बोलत
होते.यावेळी माजी पंचायत समिती
सदस्य बबनराव शिंदे, संचालक गजानन जाधव, सोमनाथ खामकर,शिवदौलत बँकेचे व्हाईस
चेअरमन संजय देशमुख,संचालक अभिजित पाटील,अशोकराव शिंदे,रणजित शिंदे,नामदेवराव
साळूंखे,माणिक पवार,विजय पवार फौजी,गजानन पाटील,भाऊसो जाधव, एस.के.वाघडोळे,श्रीकांत
सोनावले,रामचंद्र लाहोटी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,जनतेने
निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने आपल्याला कोणत्या गांवात किती मते पडली याचा विचार
न करता जे जनतेच्या निकडीचे आहे ते ते विकासकाम देण्याची गरज आहे.मी माझ्या आमदारकीच्या काळात मला गावात, वाडीवस्तीवर
किती मतदान पडले याचा विचार न करता गत साडेचार वर्षात आणि मागील आमदारकीच्या काळात
विविध विकासकामे देण्याचा प्रयत्न केला.विरोधकांकडे बोलण्यासारखे काहीच नाही आज
मतदारसंघातील प्रत्येक गांवामध्ये आपण पाच वर्षात कामे दिली आहेत आपण दिलेली कांमे
मतदारांना डोळयाने दिसत आहेत परंतू ती विरोधकांना दिसत नाहीत गत पाच वर्षात काहीही
न करता केवळ आपल्या विकासकामांची मापे काढण्याचा उद्योग विरोधकांचा सुरु आहे आता
मते मागायला गावागावात फिरत आहेत त्यांना गावात आलेनंतर आमच्यासाठी आपण काय केले
असा जाब विरोधकांना विचारावा व आपण केलेली विकासकामे त्यांना दाखवावित.केवळ ही निवडणूक ते ती निवडणूक मते मागायला जनतेच्या दारात जायचे आणि मते
मागून गेल्यानंतर मते दिलेल्या जनतेला काय हवे, काय
नको याकडे ढुंकुनही पहायचे नाही. मग अशा नेतृत्वाच्या मागे आपले
उभे आयुष्य घालविण्यात काय अर्थ आहे याचा विचार जनता कधी करणार आहे का नाही? का कामे करायला आमदार आणि मते घ्यायला माजी आमदार आणि त्यांचे निष्क्रीय सुपुत्र अशी
परिस्थिती होवू नये. मागेल त्याचे काम करण्याचे ध्येय आपण
बाळगल्यामुळेच गत पाच वर्षात
पाटण मतदारसंघात कोटयावधी रुपयांचा विकासनिधी आपण मंजुर करुन आणू शकलो.तालुक्याचे माजी आमदार आणि त्यांचे
सुपुत्र केवळ पोकळ गप्पा मारण्यात पटाईत आहेत. निवडणूक
विधानसभेची आणि माजी आमदार पुत्र प्रचार करतायत कारखान्याचा. त्यांच्या भूलथापाना
बळी पडू नका. मतदारसंघातील जनतेने विकासकामांनाच कौल देण्याचा धोरणात्मक निर्णय
घेतला आहे. आज या विभागात विरोधकांचा दौरा होता त्या दौऱ्यात त्यांना मतदारांनी
किती प्रतिसाद दिला आहे याची आपण माहिती घ्यावी. आज मतदार त्यांचेपुढे येण्यास
तयार नाहीत कारण त्यांनी पाच वर्षात जनतेला काहीही दिले नाही. विकासाच्या कामांकरीता यापुढेही
भरघोस असा निधी या विभागाला दिला जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले.यंदाच्या विधानसभा निवडणूकीत मागील निवडणूकीपेक्षा जादाचे मताधिक्य
देवून पाटण विधानसभा मतदारसंघाचा विकास आणखीन गतीने करण्याकरीता मला पाठबळ
दयावे तसेच महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे
भोसले यांनाही माझेबरोबरीने मतदान करावे अशी विनंती आमदार शंभूराज देसाई शेवठी
बोलताना केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन जाधव
व उपस्थितांचे आभार
एस.के.वाघडोळे यांनी मानले.
चौकट:- मंडप आमचा, सभा आमची आणि भाषण ठोकून गेले युवा नेते.
बामणेवाडी
याठिकाणी आपल्या विचारांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रचार सभेकरीता मंडप उभारला
होता मी या गांवात येण्यापुर्वी युवा नेते गांवात आले सभा कुठे आहे हे ही त्यांना ठाऊक
नसल्याने आमच्याच मंडपात आमच्याच स्पीकरवर युवा नेते भाषण ठोकून गेले यावरुनच युवा
नेते किती कतृत्ववान आहेत याचा प्रत्यय येतो. त्यामुळे अशा नेतृत्वाच्या मागे
जायचे का याचा विचार जनतेने करावा असेही आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
No comments:
Post a Comment