दौलतनगर
दि.३१:- ऑक्टोंबर,२०१९ मध्ये राज्यातील इतर
जिल्हयाबरोबर सातारा जिल्हयातील पाटण मतदारसंघात मोठया प्रमाणात झालेल्या
अतिवृष्टीमुळे पाटण मतदारसंघातील डोंगरी आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या
शेतीपिकांचे मोठया संख्येने नुकसान झाले असून या नुकसानीचे तात्काळ कृषी व महसूल
विभागामार्फत पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणेकरीता
पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे
दि.२५ ऑक्टोंबर रोजीच २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत निवडून आलेले प्रमाणपत्र हाती
घेतल्यानंतर आग्रही मागणी केली होती. आमदार शंभूराज देसाईंच्या मागणीवरुन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी
ऑक्टोंबर, २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानीसंदर्भात बाधित शेतकऱ्यांच्या
नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना तातडीने मदत देण्याचे निर्देश दिले असून
यासंदर्भातील आदेश शासनाच्या महसूल व वन
विभागाकडून राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना दि.२९ ऑक्टोंबर, २०१९ रोजी पारित
करण्यात आले असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी दिली आहे.
मुख्यमंत्री ना.देवेंद्र
फडणवीस यांचे निर्देशावरुन शासनाच्या महसूल व
वन विभागाकडून राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना दि.२९ ऑक्टोंबर, २०१९
रोजी ऑक्टोंबर, २०१९ मधील अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत
देण्याकरीता पंचनामे करण्याबाबत दिलेल्या आदेशावरुन पाटणचे आमदार शंभूराज देसाई
यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने पाटण तहसिल कार्यालय येथे महसूल,कृषी विभागासह सर्व
तालुकास्तरीय सर्व विभागांची बैठक आयोजीत
करण्यात आली होती यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी वरील आदेशाप्रमाणे तात्काळ पाटण
विधानसभा मतदारसंघात ऑक्टोंबर,२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानीचे तातडीने
पंचनामे करुन बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळणेकरीताचे प्रस्ताव शासनाकडे
सादर करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी बैठकीस प्रांताधिकारी श्रीरंग
तांबे,तहसिलदार रविंद्र माने,उपविभागीय पोलीस अधिकारी संजय थोरात,गटविकास अधिकारी
श्रीमती मीना साळुंखे,तालुका कृषी अधिकारी अविनाश मोरे यांच्या सह सार्वजनीक
बांधकाम, पाणी पुरवठा,जलसंधारण,वीज वितरण कंपनी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पाटणचे आमदार शंभूराज
देसाई तिसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झालेनंतर विधानसभा सदस्यांचे निवडून आलेले
प्रमाणपत्र घेणेकरीता पाटण तहसिल कार्यालयात गेले असताना त्यांनी आमदारकीचे
प्रमाणपत्र हाती घेताच आमदारकीच्या तिसऱ्या टर्ममधील कामांस सुरुवात करीत
ऑक्टोंबर, २०१९ मध्ये पाटण मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांबरोबर
इतरही सार्वजनीक मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला होता. या
आढाव्यानंतर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क
साधून ऑक्टोंबर, २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे बरोबर सार्वजनीक
मालमत्तेचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले असून शेतीपिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी
हवालदिल झाला आहे प्राधान्याने शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन बाधित
शेतकऱ्यांना तातडीने मदत देणे गरजेचे असल्याची आग्रही मागणी मुख्यमंत्री
यांच्याकडे केली होती आमदार शंभूराज देसाईंच्या मागणीवरुनच मुख्यमंत्री यांनी
वरीलप्रमाणे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी तात्काळ मदत देणेकरीताचे पंचनामे करण्याचे
आदेश दिले आहेत.
दरम्यान आमदार शंभूराज देसाईंनी
आज तहसिल कार्यालयात सविस्तरपणे घेतलेल्या बैठकीत शेतीपिकांचे कृषी व महसूल
विभागाने संयुक्तीकरित्या पंचनामे करुन याचा अहवाल नुकसानीच्या पुराव्यासह
शासनाच्या संबधित विभागाकडे सादर करण्यात यावा अशा सुचना केल्यानंतर सार्वजनीक
बांधकाम तसेच जिल्हा परीषद बांधकाम विभाग व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी
त्यांच्या विभागाकडील सार्वजनीक मालमत्तेचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे
करावेत जेणेकरुन या नुकसान झालेल्या कामांची पुर्नंबांधणी करणेकरीता शासनाकडे
आवश्यक असणारी मदत आपल्याला मागता येईल.बांधकाम आणि पाणी पुरवठा विभागानी आपला
अहवाल आपल्या वरीष्ठांमार्फत शासनाकडे लवकरात लवकर सादर करावा.असे सुचित करुन
ऑक्टोंबर, २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानीकरीता लवकरात लवकर शासनाकडून
मदत मिळणेकरीता मी आजच राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे
प्रत्यक्ष भेट घेवून मदतीची मागणी करणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी
बोलताना सांगितले.
No comments:
Post a Comment