दौलतनगर
दि.२५:- सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील प्रमुख
जिल्हा मार्ग क्रं.57 अशी ओळख असणाऱ्या पाटण-मणदुरे-जळव-तारळे-पाल-काशीळ या ४६
किलोमीटर रस्त्याला गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या विशेष प्रयत्नामुळे
राज्यमार्ग म्हणून दर्जोन्नती मिळाली असून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्यामुळे
या रस्त्याची ओळख आता राज्यमार्ग क्रं.३९८ अशी झाली आहे.या रस्त्याला राज्यमार्ग
म्हणून दर्जोन्नती देण्याचा शासन निर्णय राज्याच्या सार्वजनीक बांधकाम विभागाने आज
दि.२५ फेब्रुवारी, २०२० रोजी पारित केला आहे.
पाटण विधानसभा मतदारसंघ हा अतिशय
डोंगरी व दुर्गम मतदारसंघ असून पाटण मतदारसंघाला पुणे-बेंगलोर या राष्ट्रीय
महामार्ग क्र.4 हा जोडला जातो. मतदारसंघात नव्याने गुहागर-चिपळूण-कराड-जत-विजापूर
हा राष्ट्रीय महामार्ग झालेला असून या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा पाटण-मणदुरे-जळव-तारळे-पाल-काशीळ
हा प्रमुख जिल्हा मार्ग क्रं.57 अस्तित्वात आहे. याची लांबी एकूण ४६ कि.मी. आहे.
या मार्गावर मोठया प्रमाणांत वाहतूक होत असून हा प्रमुख जिल्हा मार्ग खुप अरुंद
आहे.मौजे जळव,ता.पाटण व मौजे निवकणे,ता.पाटण येथे पाटण तालुक्यातील सर्वात मोठे
अनुक्रमे श्री.जोतिर्लिंग व श्री.जानाईदेवीचे प्रसिध्द अशी देवस्थाने असून याच
मार्गावर मौजे पाल, ता.कराड येथे श्री खंडोबा देवाचे प्रसिध्द देवस्थान आहे.या तीन
देवस्थानांना महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातील भाविक भक्त मोठया संख्येने भेट देत
असतात. प्रमुख जिल्हा मार्ग क्रं.57 पाटण-मणदुरे-जळव-तारळे-पाल-काशीळ या मार्गावर
मोठया प्रमाणांत होत असलेल्या वाहतुकीमुळे अनेकदा वाहतुकीची मोठया प्रमाणांत कोंडी
होते. त्यामुळे गुहागर-चिपळूण-कराड व पुणे-बेंगलोर या दोन राष्ट्रीय महामार्गाला
जोडणारा प्रमुख जिल्हा मार्ग क्रं.57 असणारा पाटण-मणदुरे-जळव-तारळे-पाल-काशीळ या
मार्गाला विशेष बाब म्हणून राज्य मार्गाची दर्जोन्नती दयावी याकरीता गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंचा गत पंचवार्षिकमध्ये आमदार असताना सातत्याने पाठपुरावा होता.
दीडच महिन्यापुर्वी गृहराज्यमंत्री झालेले ना.शंभूराज देसाईंनी या प्रमुख जिल्हा
मार्गाला राज्यमार्ग दर्जोन्नती मिळणेकरीता राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.अशोकराव
चव्हाण यांची दि.२२ जानेवारी, २०२० रोजी भेट घेतली व या मार्गाला राज्यमार्ग
दर्जोन्नती देण्याची आग्रही भूमिका मांडली एक महिन्याच्या आत सार्वजनीक बांधकाम
मंत्री ना.अशोकराव चव्हाण यांचे सुचनेवरुन व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई
यांचे विशेष प्रयत्नामुळे राज्य शासनाच्या सार्वजनीक बांधकाम विभागाने दि.२५
फेब्रुवारी, २०२० रोजी पाटण-मणदुरे-जळव-तारळे-पाल-काशीळ या ४६ कि.मी अंतर असणाऱ्या
मार्गाला राज्यमार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याचा शासन निर्णय पारित केला आहे. या
राज्यामार्गाला भूसंपादनाची आवश्यकता नसून प्रमुख जिल्हा मार्ग क्रं.57 अशी ओळख
असणाऱ्या पाटण-मणदुरे-जळव-तारळे-पाल-काशीळ या रस्त्याला गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाई यांच्यामुळे आता राज्यमार्ग क्रं.३९८ अशी ओळख निर्माण झाली आहे. नव्याने
राज्यमार्ग झालेल्या पाटण-मणदुरे-जळव-तारळे-पाल-काशीळ या रस्त्याच्या
दर्जोन्नतीमुळे या रस्त्यांवर राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून भरघोस असा निधी
मिळणेकरीता मदत होणार असून यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी आता दुर होणार असून
प्रवाशांचा प्रवास आता सुखकर होणार आहे. या रस्त्याला राज्यमार्ग म्हणून
दर्जोन्नती मिळवून दिल्याबदद्ल गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंना जनतेकडून
धन्यवाद देण्यात येत आहेत.