Thursday 6 February 2020

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या माध्यमातून पाटण मतदारसंघातील १४४.५०० ‍कि.मी.लांबीच्या ग्रामीण रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती. ग्रामीण रस्त्यांवर राज्याच्या अर्थसंकल्पातून निधी खर्ची पडणार.


दौलतनगर दि.०६:- राज्याच्या गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन या महत्वाच्या खात्यांच्या राज्यमंत्रीपदावर विराजमान झालेले ना.शंभूराज देसाई यांचेकडे राज्याच्या या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी असताना देखील त्यांनी आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध जनहितार्थ कामांवरील लक्ष अजिबात विचलीत केले नाही. आपल्याला मिळालेल्या राज्यमंत्रीपदाचा लाभ हा पाटण मतदारसंघातील जनतेला झालाच पाहिजे ही त्यांची भूमिका असून अनेक वर्षापासून राज्य शासनाकडे पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याचा विषय प्रलंबीत होता तो त्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एका महिन्याच्या आतच शासनाकडून मार्गी लावून घेतला आहे. ना.शंभूराज देसाईंच्या माध्यमातून पाटण विधानसभा मतदारसंघातील १४४.५०० किलोमीटर लांबीच्या एकूण १० ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती मिळाली असून दर्जोन्नती झालेल्या ग्रामीण रस्त्यांवर आता राज्याच्या अर्थसंकल्पातून निधी खर्ची पडणार आहे.
                पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी आणि दुर्गम भागातील ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग याप्रमाणे दर्जोन्नती मिळणेचा विषय राज्याच्या सार्वजनीक बांधकाम विभागाकडे अनेक वर्षापासून प्रलंबीत होता याकरीता ना.शंभूराज देसाईंनी गत पंचवार्षिकमध्ये युतीच्या शासनाकडे पाठपुरावा करुन पाटण मतदारसंघातील ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग असा दर्जा मिळणेकरीताचा आराखडा जिल्हा परीषद बांधकाम व सार्वजनीक बांधकाम विभागामार्फत तयार करुन घेतला व राज्याचे गृहराज्यमंत्री झालेनंतर त्यांनी हा आराखडा राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण यांचे निर्दशनास आणून देत या ग्रामीण व इतर जिल्हा मार्गावरील रस्त्यांच्या कामांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याची आग्रही मागणी सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण यांचेकडे केली. त्यांनीही तात्काळ या प्रस्तावास मान्यता देवून पाटण विधानसभा मतदारसंघातील १४४.५०० किलोमीटर लांबीच्या एकूण १० ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती दिली. दर्जोन्नती दिल्याचा शासन निर्णय सार्वजनीक बांधकाम विभागाने दि.०५ फेब्रुवारी, २०२० रोजी पारित केला असून या निर्णयामध्ये दहा ग्रामीण आणि इतर जिल्हा मार्गावरील रस्त्यांचा समावेश आहे. दर्जोन्नती मिळालेल्या ग्रामीण आणि इतर जिल्हा मार्गावर आता राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून निधी उपलब्ध होणार असून दळणवळणाच्या दृष्टीने पाटण मतदारसंघाच्या विकासात यामुळे भर पडणार आहे.
                ना.शंभूराज देसाईंच्या आग्रही मागणीमुळे राज्य शासनाच्या सार्वजनीक बांधकाम विभागाने पाटण विधानसभा मतदारसंघातील दर्जोन्नती दिलेल्या १० रस्त्यांमध्ये इजिमा 138 ते निगडे-कसणी-निवी-डाकेवाडी-धामणी-चव्हाणवाडी-मस्करवाडी-घराळवाडी रस्ता दर्जोन्नतीची लांबी २५ कि.मी,भोसगाव-आंब्रुळकरवाडी-नवीवाडी-रुवले-कारळे-पाणेरी रस्ता दर्जोन्नतीची लांबी १२.५०० कि.मी,त्रिपुडी-मुळगाव-कवरवाडी-नेरळे-गुंजाळी-लेंढोरी-मणेरी-चिरंबे-काढोली-चाफेर-रिसवड-ढोकावळे रस्ता दर्जोन्नतीची लांबी २६ कि.मी,प्रजिमा 53-चोपडी-बेलवडे खुर्द-सुळेवाडी-सोनवडे-हुंबरवाडी-नाटोशी-धावडे इजिमा-134 रस्ता दर्जोन्नतीची लांबी १९ कि.मी,बनपूरी- आंबवडे-कोळेकरवाडी-उमरकांचन रस्ता दर्जोन्नतीची लांबी १३ कि.मी,ढेबेवाडी-भोसगावं-उमरकांचन-जिंती-मोडकवाडी-सातर रस्ता दर्जोन्नतीची लांबी १२ कि.मी,मल्हारपेठ-पानस्करवाडी-मंद्रुळहवेली-जमदाडवाडी-नवसरवाडी रस्ता दर्जोन्नतीची लांबी ०६ कि.मी,काटेवाडी-आवर्डे-मुरुड-मालोशी रस्ता दर्जोन्नतीची लांबी ११ कि.मी, लोरेवाडी (प्रजिमा 37 पासून) कोंजवडे-भूडकेवाडी-कडवे खुर्द रस्ता इजिमा-141 दर्जोन्नतीची लांबी १० कि.मी व गमेवाडी-कडववाडी-पाडळोशी-मसुगडेवाडी रस्ता दर्जोन्नतीची लांबी १० कि.मी असे एकूण १४४.५०० किलोमीटर लांबीच्या ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाच्या एकूण १० रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील १० ग्रामीण व इतर जिल्हा मार्गावरील रस्त्यांच्या कामांना तात्काळ प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती दिल्याबद्दल ना.शंभूराज देसाईंनी त्यांचे विशेष आभार मानले असून या १० रस्त्यांच्या कामांचा समावेश राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये करुन या १० रस्त्यांच्या कामांवरील अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांच्या भागांची सुधारणा करणेकरीता आवश्यक असणारा निधी सन २०२०-२१ चे अर्थसंकल्पामधून उपलब्ध करुन देणेबाबत ना.अशोकराव चव्हाण यांचेकडे मागणीही केली आहे.

No comments:

Post a Comment