Monday 17 February 2020

सडादाढोली गावांचा सर्वांगीण विकास साधणार, गावाच्या कायम पाठीशी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची ग्वाही.



            दौलतनगर दि.१७:- डोंगरपठारावर वसलेल्या सडादाढोली गांवाने एकमुखाने राहून गावांचा प्रलंबीत राहिलेला विकास साध्य करुन घेण्याचा घेतलेला ध्यास खरोखरच कौतुकास्पद आहे. अनेक वर्षे या गांवाला पोहोच रस्ता नव्हता काम करणाऱ्या नेत्याच्या पाठीशी ठाम उभे राहून आपल्या गांवाचा रस्ता पुर्ण करुन घेवूया या एका मुद्दयावर एकत्रित आलेले गांव आज एकसंघ आहे हे पाहून आनंद होत आहे. जो विश्वास या गांवातील ग्रामस्थांनी माझेवर दाखविला आहे तो विश्वास सार्थकी लागणार असून सडादाढोली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटीबध्द आहे गांवाच्या कायम पाठीशी राहून गांवामध्ये प्रलंबीत राहिलेली विकासकामे पुर्ण करणार असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिली आहे.
              सडादाढोली रामघळ ता.पाटण येथे ग्रामस्थांच्या वतीने गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचा राज्यमंत्रीपदी निवड झालेबद्दल सत्कार समारंभ आयोजीत केला होता या सत्कार समारंभात ते बोलत होते. प्रांरभी डोंगरपठारावरील ग्रामस्थांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचा पांरपारिक पध्दतीने घोंगडे व काठी देवून सत्कार केला.याप्रसंगी कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे व्हा.चेअरमन राजाराम पाटील,शंभूराज युवा संघटना अध्यक्ष भरत साळुंखे,माजी संचालक प्रकाश नेवगे,वसंत झोरे,प्रकाश झोरे,जयराम झोरे,आनाजी झोरे,लक्ष्मण झोरे,शिवाजी झोरे,मनोहर कडव,वैभव मुळगांवकर,कुणाल चंदुगडे,गोरख चव्हाण,शंकर सांळुखे या प्रमुख पदाधिकारी यांच्यासह सडादाढोली येथील ग्रामस्थ व महिलांची व मुंबई मित्रमंडळातील कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
                    याप्रसंगी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले, सडादाढोली गांवाला जोडणारा तीन किलोमीटरचा रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबीत होता. अनेक ठिकाणी मागणी करुनही हा रस्ता न झाल्याने या गांवातील ग्रामस्थांनी तसेच मुंबई मित्रमंडळातील कार्यकर्त्यांनी माझी भेट घेवून आमचे गांवाच्या रस्त्याचे काम पुर्ण करा अशी मागणी केल्यानंतर तीन किलोमीटरचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत प्रस्तावित करुन तो मंजुर करुन घेतला या रस्त्याच्या कामांसाठी सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचा निधी या योजनेतून मंजुर करुन घेतला या रस्त्याचे काम सध्या सुरु झाले आहे. गावाला जोडणारा रस्त्याचा काही भाग शिल्लक राहत आहे त्याकरीताही आवश्यक निधी मंजुर केला आहे. लवकरच याचेही काम सुरु होईल. जो शब्द येथील ग्रामस्थांनी मला दिला तो त्यांनी पाळला त्याचपध्दतीने मीही जो शब्द येथील ग्रामस्थांना दिला तो मी पाळला.गावाच्या विकासासाठी एकत्रित आलेल्या गांवाने माझी राज्याच्या राज्यमंत्री निवड झालेबद्दल सत्कार समारंभ घेवून माझा सत्कार करुन नेत्यावरील असणारी एकनिष्ठा दाखवून दिली. ज्यां नेत्याने आपली मुलभूत सुविधांची गैरसोय दुर केली त्या नेत्याच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा घेतलेला निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे. आज सत्कार समारंभाच्या निमित्ताने गावातील एकसंघता पाहून मनस्वी आनंद झाला. भविष्यातही गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांनी एकत्रित, एकसंघ राहून गावाचा राहिलेला प्रलंबीत विकास पुर्ण करुन घ्यावा. आपल्या मागणीप्रमाणे भविष्यात गांवाच्या विकासासाठी आवश्यक असणारा निधी मंजुर करायला मी कुठेही कमी पडणार नाही. ज्याप्रमाणे गाव माझे पाठीशी ठाम उभे राहिले आहे त्याचपध्दतीने मीही गावाच्या पाठीशी तालुक्याचा आमदार आणि राज्याचा राज्यमंत्री म्हणून ठाम उभा राहणार असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिली . कार्यक्रमाचे प्रस्ताविक वैभव झोरे आभार कोडींबा झोरे यांनी मानले.


No comments:

Post a Comment