दौलतनगर
दि.२५:- मतदारसंघाच्या टोकावर डोंगरपठारावर वसलेल्या पांढरेपाणी गांवाला
यापुर्वी मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. यापुर्वी केवळ पांढरेपाणी गांवाच्या
विकासाच्या गप्पाच मारल्या गेल्या मी केवळ आमदार असताना गतवर्षी पांढरेपाणी
गांवाला राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत रस्ता मंजुर करुन आणला
आता तर आपण मंत्री आहोत मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आणि राज्याचा मंत्री म्हणून
पांढरेपाणी गांवाच्या सर्वांगीण विकासाकरीता मी हे गांव दत्तक घेत असल्याची घोषणा
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी यांनी केली.
मुख्यमंत्री
ग्रामसडक योजनेतंर्गत ना.शंभूराज देसाईंनी मंजुर केलेल्या पांढरेपाणी ता.पाटण
येथील गावपोहोच रस्त्याचा भूमिपुजन समारंभ त्यांचे हस्ते आयोजीत करण्यात आला होता
याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे घोषणा केली. सुमारे ०२ किमी रस्त्यांच्या
कामांकरीता ना.शंभूराज देसाईंनी ०१ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे.
या रस्त्याचे भूमिपुजन त्यांचेच हस्ते करण्यात यावे असा आग्रह पांढरेपाणी गांवातील
ग्रामस्थांचा होता त्यानुसार ना.शंभूराज देसाईंच्या हस्ते या रस्त्याच्या कामांचे
भूमिपुजन करण्यात आले. प्रांरभी डोंगरपठारावरील ग्रामस्थांनी गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाई यांचा पांरपारिक पध्दतीने घोंगडे व काठी देवून सत्कार केला.
याप्रसंगी
कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,जिल्हा परीषद सदस्या
सौ.सुग्रा खोंदू, माजी सदस्य बशीर खोंदू,माजी पंचायत समिती सदस्य नथूराम कुंभार,शिवदौलत
बँकेचे संचालक दगडू शेळके, भागोजी शेळके,किसन गालवे,गणेश भिसे,रमेश गालवे,आटोली
सरपंच सावळाराम शेळके,उपसरपंच भिमराव जगताप,माजी सरपंच राम पवार,लक्ष्मण
शेळके,दिनकर शिंदे,बंडू चाळके,दिनकर कोळेकर,आनंदा मोहिते या प्रमुख पदाधिकारी यांच्यासह आटोली,पांढरेपाणी
येथील ग्रामस्थ व महिलांची व मुंबई मित्रमंडळातील पदाधिकारी,कार्यकर्ते यांची प्रमुख
उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले, पांढरेपाणी गांवाने सन २०१४
च्या व २०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये मला १०० टक्के मतदान करीत गावातील गावकऱ्यांनी
एकही मत विरोधात जावू दिले नाही. गतवेळीही मतदारसंघात मताच्या बाबतीत पहिल्या
क्रमांकाचे बक्षिस या गावाने मिळविले आणि आत्ताही. ग्रामस्थांच्या मागणीवरुन आपण
गतवेळेस ग्रामदैवताच्या सभामंडपाचे विकासकाम दिले तर या गावाला प्रमुखत:
रस्त्याच्या कामांची गरज होती ती गरज आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत हा
रस्ता प्रस्तावित करुन पुर्ण करुन घेतली. रस्त्याची लांबी एकूण ०६ किमी असून यातील
०२ किमीचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत मंजुर आहे तर उर्वरीत ०४ किमीचा
रस्ता करणेकरीता आपणांस अजुनही निधीची आवश्यकता भासणार आहे. येणाऱ्या आर्थिक
वर्षात उर्वरीत राहिलेल्या कामांना आवश्यक निधी मंजुर करुन देणेकरीता मी कटीबध्द
असून एक मंत्री म्हणून या गावांच्या विकासाकरीता हे गांव मी दत्तक घेत आहे.या
गांवाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय यंत्रणे कडील आवश्यक
योजना राबविणेकरीता एक आराखडा तयार करण्यात येवून या गांवाला आवश्यक असणारी विविध
विकासकामे पुर्ण करण्याची जबाबदारी आता माझी आहे. गावांमध्ये कोणकोणती कामे
प्राधान्याने करावयाची याकरीता आत्ताच गा्रमस्थांनी पाच लोकांची कमिटी तयार करावी
व कमिटीने ठरवलेली कामे माझेकडे प्रस्तावित करावित. या कामांना आवश्यक असणारा निधी
टप्प्या टप्प्याने देण्यास मी कटीबध्द आहे. आपल्या गांवाचा प्रलंबीत विकास पुर्ण
करुन घेवूया या एका मुद्दयावर एकत्रित आलेले गांव आज एकसंघ आहे हे पाहून आनंद होत
आहे. जो विश्वास या गांवातील ग्रामस्थांनी माझेवर दाखविला आहे तो विश्वास सार्थकी
लागणार असून पांढरेपाणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटीबध्द आहे असे सांगुन
ते म्हणाले येथील डोगंरपठारावरील लोकांचे दैवत असणाऱ्या वाघजाई देवीच्या
दर्शनाकरीता खडकच्या वाघजाईला मी प्रतिवर्षी दसऱ्यादिवशी न चुकता येतो. आमचे मरळी
येथील निनाई मातेचा जसा आशिर्वाद माझे पाठीशी आहे तसाच आशिर्वाद वाघजाई मातेचाही
आहे. येथील मंदीराच्या परीसरातील विकासकामांकरीताही माझे येथील ग्रामस्थांना
सहकार्य राहील.असेही ना.शंभूराज देसाई शेवठी बोलताना म्हणाले.
चौकट:-
देसाई कुटुबांतील आमदारांच्या पाठीशी ठाम राहण्याचा पांढरेपाणी गावकऱ्यांचा
निर्णय.
भूमिपुजन कार्यक्रम संपन्न झालेनंतर प्रारंभी पांढरेपाणी येथील
ग्रामस्थांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचा पांरपारिक पध्दतीने घोंगडे व
काठी देवून सत्कार केला व आमच्या गावाच्या विकासासाठी आम्हाला पाठबळ देणाऱ्या
ना.शंभूराज देसाई यांच्यासह देसाई कुटुंबातील आमदारांच्या पाठीशीच ठाम उभे राहून भविष्यात
येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीत गांवातील एकही मत विरोधात न जावू देण्याचा निर्णय
ग्रामस्थांनी घेत तसे वचन ग्रामस्थांनी ना.शंभूराज देसाईंना दिले.
No comments:
Post a Comment