दौलतनगर दि.०३:- राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघात सत्कार, समारंभांना फाटा देत डोंगरपठारावर मोफत सर्वरोग निदान शिबीर आयोजीत करण्याची संकल्पना मांडली होती. त्यांच्या संकल्पनेतून पाटण मतदारसंघातील डोंगरपठारावरील जनतेकरीता राज्य शासनाच्या वतीने घाणबी डोंगर पठारावर आयोजीत मोफत सर्वरोग निदान शिबीराचा या विभागातील ५९ गांवातील ३०१४ रुग्णांनी लाभ घेतला असून डोंगरपठारावर ना.शंभूराज देसाईंच्या विशेष प्रयत्नामुळे प्रथमत:च झालेल्या या सर्वरोग निदान शिबीरास डोंगरपठारावरील नागरिक महिलांनी आपल्या मुलाबांळासंह उदंड प्रतिसाद दिला.
घाणबी ता.पाटण येथील डोंगरपठारावर गृह राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून येथील डोंगरपठारावरील जनतेकरीता राज्य शासनाच्या वतीने शनिवार दि.01/02/2020 रोजी मोफत सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीराचे उद्धाटन गृह राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते आयोजीत करण्यात आले होते मात्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब हे सातारा जिल्हयाच्या दौऱ्यावर असल्या कारणामुळे ना.शंभूराज देसाईंना या शिबीरास उपस्थित राहता आले नाही. त्यांच्या वतीने युवा नेते यशराज देसाई (दादा) यांच्या हस्ते या मोफत सर्वरोग निदान शिबीराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रभारी तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर धुमाळ,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पाटील, पाटण ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.चंद्रकांत यादव,ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.डी.बी.डोंगरे आदीची प्रमुख उपस्थिती होती.
शुभारंभानंतर बोलताना युवा नेते यशराज देसाई (दादा) म्हणाले, डोंगरपठारावरील जनतेला वर्षानुवर्षे आरोग्य सुविधा मिळत नाहीत आरोग्य सुविधा घेणेकरीता डोंगरपठारावरील जनतेला,वयोवृध्दांना,लहान बालकांना तालुक्याच्या ठिकाणी येवून आरोग्य तपासणी करावी लागत असल्याने डोंगरपठारावरील जनतेला, वयोवृध्दांना तसेच महिलांचे व त्यांच्या लहान बालकांचे शासनाच्या वतीने मोफत सर्व रोग निदान व्हावे त्यांच्यावर उपचार व्हावेत याकरीता गृह राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी डोंगरपठारावरच शासनाच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्याची संकल्पना मांडली त्यानुसार ग्रामीण,दुर्गम व डोंगराळ जनतेच्या आरोग्य सेवांचा दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या व शासनाच्या वतीने हे मोफत सर्वरोग निदान शिबिर होत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. या शिबीराचा डोंगरपठारावरील जनतेला नक्कीच लाभ होईल. असे सांगून युवा नेते यशराज देसाई (दादा) यांनी या आरोग्य शिबीराची प्रत्यक्ष रुग्णांपर्यंत जावून पहाणी केली. तसेच त्यांच्या हस्ते सुमारे २०० नेत्र तपासणी झालेल्यांना चष्मे वाटप व अंगणवाडीतील मुलांना शक्तीवर्धक औषधांचे वाटप करण्यात आले.
या शिबीरामध्ये नेत्र रोग (६३५), स्त्री रोग (१८५), बालरोग (१४३), मदुमेह (१८७),अस्थिरोग (२१७), नाक, कान,घसा (८७), त्वचारोग (१५१), जनरल मेडीसीन (४५७), जनरल सर्जरी (१८२), क्षयरोग (४०),कुष्ठरोग (५१), आयूष (४६), प्रयोगशाळा तपासणी (४३३) व चष्मे वाटप (२००) असे एकूण ३०१४ रुग्णांची मोफत तपासणी जिल्हा ग्रामीण रुग्णालय,सातारा,ग्रामीण रुग्णालय-पाटण,जिल्हा परीषद आरोग्य विभाग,कृष्णा हॉस्पीटल-कराड, सहयाद्री हॉस्पीटल-कराड,शारदा हॉस्पीटल-कराड व कोळेकर हॉस्पीटल-कराड येथील विशेष तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने करण्यात आली.रुग्णाच्या वेगवेगळया तपासण्या करण्याकरीता याठिकाणी शिबीरात वेगवेगळी दालने उघडण्यात आली होती. दरम्यान तपासणी केलेल्या रुग्णांना पुढील औषधोपचाराकरीता विशेष तज्ञ डॉक्टरांच्या सल्लयाने औषधोपचार देणाऱ्या हॉस्पीटलशी संपर्क साधून या रुग्णांवर आवश्यक औषधोपचार करण्याचे संदर्भही देण्यात आले.जिल्हा ग्रामीण रुग्णालय-सातारा,ग्रामीण रुग्णालय- पाटण,जिल्हा परीषद आरोग्य विभाग,कृष्णा हॉस्पीटल-कराड,सहयाद्री हॉस्पीटल-कराड,शारदा हॉस्पीटल-कराड व कोळेकर हॉस्पीटल-कराड यांचे कडील औषधांबरोबर सातारा जिल्हा, पाटण व कराड तालुका केमिस्ट असोशियन तसेच गौरव सर्जीकल-कराड यांच्या वतीनेही आवश्यक औषधे तसेच आवश्यक आरोग्य साहित्य पुरविण्यास मोठे सहकार्य करण्यात आले.हे शिबीर यशस्वी करण्याकरीता महसूल,बांधकाम,आरोग्य विभागासह अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका,आरोग्य कर्मचारी यांनी कष्ट घेत मोलाचे सहकार्य करुन हे शिबीर यशस्वी करण्यास हातभार लावला. डोंगरपठारावर मोफत सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करुन आमच्या आरोग्याची मोफत तपासणी करुन घेतल्याबद्दल डोंगरपठारावरील ५९ गांवातील ३०१४ रुग्णांनी,जनतेने,वयोवृध्दांनी, महिलांनी ना.शंभूराज देसाईंचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.
No comments:
Post a Comment