पाटण मतदारसंघात मध्यम नदयावर होणार कोल्हापुर पध्दतीचे बंधारे.
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांची घेतली भेट.
आवश्यक निधी देण्याचे
मृद व जलसंधारण मंत्री यांचेकडून
मान्य.
दौलतनगर
दि.02 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- सन 2020-21 च्या आर्थिक वर्षात पाटण विधानसभा मतदारसंघातील
तारळी, वांग, महिंद व मोरणा या मध्यम नद्यावर कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधणेच्या
कामांचा समावेश करणेकरीता राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी मृद व जलसंधारण
मंत्री ना.शंकरराव गडाख यांची मुंबई येथे भेट घेतली. ना.शंकरराव गडाख यांचेकडे ना.
शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघातील 11 कोल्हापुर पध्दतीचे बंधारे व एका साठवण तलावाचे
काम असे एकूण 12 कामे प्रस्तावित केली आहेत.या कामांना सन 2020-21 आर्थिक वर्षातच
आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांनी मान्य
केले लवकरच हा निधी त्यांचे विभागामार्फत उपलब्ध
करुन देण्याचे आश्वासन ना.शंभूराज देसाईंनी दिले आहे.
पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण,डोंगरी
भागातील तारळी, वांग,महिंदच्या वांग व मोरणा या मध्यम नदयावर कोल्हापुर पध्दतीचे बंधारे
बांधण्याची कामे अनेक वर्षापासून प्रलंबित असून सदरचे बंधारे बांधल्यास या विभागातील
शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याकरीता चांगला उपयोग होणार आहे. सदरच्या कोल्हापुर पध्दतीचे
बंधाऱ्यांच्या कामांचा सन 2020-21 या आर्थिक वर्षात समावेश करुन या कामांना आवश्यक
असणारा निधी उपलब्ध करुन दयावा अशी मागणी मतदारसंघाचे आमदार राज्याचे गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंनी मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांची मुंबई येथे भेट घेतली.
व पाटण मतदारसंघातील 12 कांमे त्यांचेकडे प्रस्तावित केली यामध्ये ढेबेवाडी विभागातील
वांग नदीवर शितपवाडी, बनपुरी, काळगांव विभागातील काळगांव,मोरेवाडी (कुठरे), धामणी,
चाफळ विभागातील उत्तरमांड नदीवर माजगांव, मोरणा विभागातील मोरणा नदीवर बेलवडे खुर्द,
वाडीकोतावडे, तारळे विभागातील तारळी नदीवर बांबवडे, नुने येथे कोल्हापुर पध्दतीचे बंधारे
बांधणे व कुंभारगांव विभागातील चव्हाणवाडी कुंभारगांव ता.पाटण येथे साठवण तलाव बांधणे
व वांग नदीवरील मालदन येथील कोल्हापुर पध्दतीच्या अस्तित्वात असणाऱ्या बंधाऱ्याची सुधारणा
करणे या कामांचा समावेश केला आहे. सन 2020-21 या आर्थिक वर्षात या बंधाऱ्यांच्या कामांना
मृद व जलसंधारण विभागामार्फत आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देण्याचे मृद व जलसंधारण
मंत्री ना.शंकरराव गडाख यांनी मान्य केले यातील बहूतांशी बंधाऱ्यांची अंदाजपत्रके ही
मृद व जलसंधारण विभागामार्फत तयार करण्यात आली आहेत. सदरचा निधी उपलब्ध करुन देण्याचे
मान्य केल्याने गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव
गडाख यांचे आभार व्यक्त केले आहेत.
No comments:
Post a Comment