दौलतनगर
दि.23 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री
कार्यालय):- हिंदुहृदयसम्राट
शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे 95 व्या जयंती
दिनानिमित्ताने दौलतनगर ता.पाटण येथे महाराष्ट्र राज्याचे
गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी
शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे जयंती
दिनानिमित्ताने पाटण मतदार संघातील गोरगरीब कुटुंबातील महिलांना तसेच लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील ऊस तोडणी मजूरांचे
कुटुंबियांना ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात
आले.
दौलतनगर,ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुह तसेच पाटण
विधानसभा मतदारसंघ शिवसेना पक्षाच्यावतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब
ठाकरे यांचे 95 व्या जयंती दिन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. प्रांरभी
ना.शंभूराज देसाईंनी शिवसेनाप्रमुख यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करुन अभिवादन केले. त्यानंतर जयंतीनिमित्ताने
पाटण मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील महिलांना तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई
सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील ऊस तोडणी मजूरांचे कुटुंबियांना जीवनावश्यक
वस्तूंचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास पाटण मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्ते,
पदाधिकारी व विविध संस्थांचे पदाधिकारी हे मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी अभिवादन करताना नामदार शंभूराज देसाई म्हणाले,हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख
स्व.बाळासाहेब
ठाकरे व महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे
जिव्हाळयाचे ऋृणानुबंध होते. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब
ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना करताना लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी
त्यांना मोलाचे सहकार्य केले होते हे अवघा महाराष्ट्र जाणून आहे.शिवसेनाप्रमुख
स्व.बाळासाहेब
ठाकरे यांनी मराठी माणसाच्या
हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी
आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची
तलवार अनेक वर्षे तळपती ठेवली.तेजस्वी नेतृत्व
आणि तमाम मराठी जनतेच्या
मनात आदरणीय स्थान प्राप्त
करणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख
स्व.बाळासाहेब
ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता
असताना आणि सत्तेबाहेर असतानाही
राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट
कंट्रोल कायम ठेवला.
सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर
व्यंगचित्रातून
टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी
उडविण्याची शक्ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब
ठाकरे यांच्या लेखणीत आणि
प्रखर वक्तृत्वातही होती.मराठी
माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा
अभिमान रुजविण्याचा वसा
त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून
अविरतपणे चालविला आणि पार
पाडला.शिवसेनेच्या स्थापनेपासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
ही एक झंझावाती शक्ती
म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात
उदयास आली आणि बाळासाहेब
ठाकरे यांना उभा महाराष्ट्र
शिवसेनाप्रमुख व हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखू
लागला.आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
हे हयात नाहीत परंतू त्यांनी दिलेले आदर्श विचारांतून शिवसेना पक्षाची वाटचाल सुरु
आहे.
शिवसेना पक्षाची धुरा त्यांनी
उध्दवजी ठाकरे यांच्या हातात दिली. आज मा. उध्दवजी ठाकरे हे राज्याचे लाडके आणि कर्तबगार
मुख्यमंत्री आहेत त्यांनी माझेवर राज्याच्या पाच महत्वाच्या खात्यांची जबाबदारी देवून
मला राज्याचा राज्यमंत्री केले आहे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी जी जी जबाबदारी
माझेवर दिली आपल्या सर्वांच्या सहकार्याने ती पार पाडण्याचे काम मी करीत आहे. शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांना त्यांचे
जयंती दिनानिमित्ताने पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम शिवसैनिक व
आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने मी विनम्र
अभिवादन करतो.
No comments:
Post a Comment