Thursday 28 January 2021

गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंचे वाशिम जिल्हयात धडाकेबाज कार्य. दोन दिवसात विविध बैठका,विकासकामांची भूमिपुजन,उद्घाटने,लोकार्पण सोहळयांचा धडाका

 



 

दौलतनगर दि.28 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-राज्याचे गृहराज्यमंत्री तथा वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी वाशिम जिल्हयात जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून धडाकेबाज कार्य करीत वाशिम जिल्हा वासियांची मने जिंकली आहेत.26 जानेवारीच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वाशिम जिल्हयात सलग दोन दिवस तळ ठोकुन ना.शंभूराज देसाईंनी वाशिम जिल्हयाच्या विकासाच्या दृष्टीने विविध शासकीय बैठका घेवून ठोस व धोरणात्मक पावले उचलली आहेत.त्याचबरोबर गत वर्षभरात जिल्हयामध्ये करण्यात आलेल्या व येणाऱ्या विविध विकासकामांची भूमिपुजने,उदघाटने तसेच लोकार्पण सोहळयाचा त्यांचा धडाकाच वाशिम जिल्हा वासियांना पहावयास मिळाला.

               धडाकेबाज राज्यमंत्री म्हणून ना.शंभूराज देसाईंची आघाडी शासनाच्या मंत्रीमंडळात आणि राज्यात ओळख आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जनता त्यांचे धडाकेबाज कार्य पहात असून त्यांच्या या कार्याचा धडाका वाशिम जिल्हयातील जनतेलाही अनुभवण्यास मिळाला. दि.25 रोजी वाशिमला मुक्कामी निघालेले पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या हस्ते जानोरी,ता.कारंजा,जि.वाशिम येथील वन उद्यानाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. तसेच जानोरी ता.कारंजा (लाड) जि.वाशिम येथे कृषी विभागाचे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतंर्गत शेततळयाचे भूमिपुजन त्यांचे हस्ते करण्यात आले.रात्री उशीरापर्यंत वाशिम जिल्हयातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेत नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत शिवसेना पक्षाला भरघोस मिळालेल्या यशाबद्दल शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे अभिनंदन करुन सर्वांचे कौतुक केले.

              दुसरे दिवशी स.09.15 वा. पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या शुभहस्ते पोलीस कवायत मैदानावर शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न झालेनंतर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले श्री नामदेवराव कांबळे (सर) यांचे निवासस्थानी जावून ना.शंभूराज देसाईंनी त्यांचे अभिनंदन व सत्कार केला.तसेच वाशिम पत्रकार संघाचे वतीने आयोजीत रक्तदान शिबीर व कोरोना योध्दांचा सत्कार कार्यक्रमही पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवनामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय बैठका पार पडल्या यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची बैठक,जिल्हा नियोजन समितीची बैठक,गौण खनिज समिती,रोजगार हमी समिती,जिल्हा दक्षता समिती व जिल्हा क्रीडा समिती अशा वाशिम जिल्हयाच्या विकासाच्या दृष्टीने विविध बैठका त्यांनी घेवून जिल्हयाच्या विकासाचा आराखडाच अंमलबजावणी करीता जिल्हा प्रशासनाला मंजुर करुन दिला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करावयाच्या विविध विकासकामांकरीता वाढीवचा निधीही राज्य शासनाकडून मंजुर करुन देण्याचे आश्वासित करीत त्यांनी  दि.26 जानेवारी रोजी 11 विविध उपोषण करणाऱ्या प्रतिनिधी बरोबर चर्चा करुन 11 उपोषण सोडविण्याचे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले.

              ना.शंभूराज देसाईंच्या संकल्पनेतून वाशिम जिल्हयामध्ये जिल्हयाच्या ठिकाणी स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नावाने बहुउद्देशीय संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारणी करण्याचा निर्णय पालकमंत्री ना.देसाईंनी घेतला असून तालुक्याच्या ठिकाणीही अशी प्रशिक्षण उपकेंद्र उभारण्यात येणार असून या कामाचा आराखडा ना.शंभूराज देसाईंनी निश्चित करुन दिला. रिठद ता.रिसोड येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभही त्यांचे हस्ते पार पडला. रिसोड ता. वाशिम येथे शिवसेना मेळाव्यास उपस्थित राहून त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. रिसोड येथे आपनी मंडी अपना बजार यांचे शेतकरी केंद्राचे उदघाटन त्यांचे हस्ते करण्यात आले.

              राज्यात आघाडीचे शासन आहे केवळ आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर न घेता पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी जिल्हयाच्या पालकत्वाच्या नात्याने वाशिम जिल्हयातील राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा समितीचे पदाधिकारी यांचे समवेत विश्रामगृह येथे बैठक घेत त्यांचेशीही विविध विषयांवर चर्चा केली.येथील काँग्रेसचे आमदार अमित झनक यांचे आमदार निधीतून रिसोड पोलिस स्टेशनतंर्गत शहरात 30 ठिकाणी बसवलेल्या सी.सी.टी.व्ही. व स्पीकर याचा लोकार्पण समारंभ व आमदार अमित झनक यांचे कार्यकर्त्यांचे फोटो शॉपी व आर्ट गॅलरी दुकानाचे उद्घाटन रिठद येथे ना.देसाईंच्या हस्ते करण्यात आले.त्याचबरोबर आमदार झनक यांचे माध्यमातून सुरज इंडस्ट्रिज रिसोड यांचे अत्याधुनिक विविध उपयोगी कृषि अवजारांचे प्रथम उत्पादनाचे लोकार्पण असे विविध कार्यक्रम दि.25 व 26 जानेवारी रोजी पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत वाशिम जिल्हयात पार पडले.सलग दोन दिवस दिवसभर व्यस्त रहात वाशिम जिल्हयाच्या विकासाकरीता त्यांनी घेतलेल्या विविध बैठका, उदघाटने, भूमिपुजने, लोकार्पण सोहळे पाहून वाशिम जिल्हावासियांनी पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या धडाकेबाज कार्याचे कौतुक केले.

 

No comments:

Post a Comment