Friday 28 January 2022

गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील दुर्गम भागात थेट पोहोचले गृहराज्यमंत्री. नक्षलग्रस्त आदिवासी बांधवांशी व पोलीसांशी साधलेल्या संवादाचे राज्यभरातून कौतुक.

 

दौलतनगर दि.28:-  महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त छत्तीसगड सिमेस लागून असलेल्या गॅरापत्ती या गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील दुर्गम भागात प्रत्यक्ष भेट देऊन तेथील पोलिसांच्या आणि दुर्गम नक्षलग्रस्त भागातील स्थानिक आदिवासी जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी थेट पोहोचले गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई.नक्षलवादी हल्ल्यामुळे नेहमी संवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्हयामध्ये ना.शंभूराज देसाई यांनी ग्यारापत्ती येथील पोलीस आऊट पोस्टला जाऊन पोलिसांमार्फत राबविण्यात येणाऱ्या नाविण्यपूर्ण अशा दादालोरा खिडकी  योजनेमधील विविध उपक्रमांची माहिती घेऊन आदिवासी बांधवांचे जनजागृती मेळाव्यास उपस्थिती दशर्वत या दुर्गम भागातील आदिवासी समाजाशी संवाद साधत त्यांच्या अडी-अडचणी समजून घेऊन पोलीस विभागामार्फत मनोधैर्य वाढविण्याचा  मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांच्या या दौऱ्याचे संपूर्ण राज्यातून कौतुक होत आहे.

           राज्यातील गडचिरोली या जिल्ह्याकडे नेहमीच संपूर्ण देशाचे लक्ष असते.कारण या जिल्ह्याला नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखले जाते.नक्षलवादी कारवाईंमुळे या डोंगरी व दुर्गम भागामध्ये सोई सुविधांचा अभाव असल्याने अद्यापही मागासलेपणा असलेल्या आदिवासी समाजामध्ये मनोधैर्य वाढवत त्यांची प्रगती साधणे,विकासापासून वंचित समाजाचे हित जोपासणे हे या जिल्ह्यातील पोलीस खात्यापुढे नेहमीच एक आव्हान आहे.त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना या जिल्ह्यात पोहचवून त्या प्रभावीपणे राबविणे हे स्थानिक प्रशासनापुढे जिकरीचे काम असते.

           गत महिन्यात महाराष्ट्र राज्याच्या व छत्तीसगडच्या सीमा भागात गॅराबत्ती अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कामांडोनी धडाकेबाज कारवाई करून २७ नक्षलवाद्यांना यमसदनी पोहचविण्याचे कार्य केले.एवढेच नव्हे,तर जहाल नक्षलवाधी मिलिंद तेलतुंबडे या सर्वोच्च नेत्याचा खातमा ही याच ठिकाणी गडचिरोली पोलिसांनी केला होता. यासंदर्भात राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनीच नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात गडचिरोली पोलीसांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव ही केला होता आणि योगायोग म्हणजे हेच राज्याचे गृहराज्यमंत्री ना शंभूराज देसाई यांनी आपल्या पोलिसांच्या सुरक्षेविषयीची पाहणी करण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजना नक्षलग्रस्त भागांत पोहचविण्यासाठी थेट गडचिरोलीला पोहोचले.या धाडसी दौऱ्यात मंत्री ना.देसाई यांनी अतिदुर्गम विभागातील दादालोरा  खिडीकी  उपक्रमाची  थेट  ग्यारापत्ती  येथे जावून प्रत्यक्ष केली पाहणी केली.मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी या केवळ पाहणी दौराच केला नाही,तर या अति संवेदनशील भागातील  दादालोरा महामेवाळ्यात स्थानिकांशी संवाद साधत प्रमाणपत्र व साहित्यांचे वाटप करण्यात आले.  यावेळी गडचिरोली जिल्हयातील नक्षलग्रस्त भागात शासनाच्या योजना पोहचविण्यासाठी पोलीस विभागाने अनेक उपक्रम राबवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उत्कृष्ठ कार्य केले आहे. यामुळेच आता स्थानिक नागरिकांनी नक्षल विचार सारणी झुगारून त्यांना स्विकारलं असल्याचे मत राज्याचे गृह राज्यमंत्री ना. शंभुराज देसाई यांनी गडचिरोली येथे व्यक्त केले. एवढेच नव्हे तर मंत्री देसाई यांनी ग्यारापत्ती येथील आऊट पोस्टला जावून पोलीसांशी संवाद साधत प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी,कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला.तर गडचिरोली येथील  मेळाव्यात ही मंत्री देसाई यांनी  वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच प्रत्यक्ष सुरक्षा व्यवस्थेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये चांगला समन्वय असल्याचे सांगून  गडचिरोली पोलीस दलाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे ही त्यांनी आपल्या दौऱ्यात आवर्जून उल्लेख केला.

चौकट- ना.देसाई यांचा आदिवासी बांधवांशी संवाद तर चकमकीत जखमी पोलिसांच्या घरी जाऊन तब्येती केली विचारपूस

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गडचिरोली येथील अतिसंवेदनशील भागातील आदिवाशी बांधवांचे जनजागरण मेळाव्या दरम्यान आपला मंत्रीपदाचा प्रोटोकॉल बाजूला ठेवून या मेळाव्यास उपस्थित असलेल्या आदिवासी बांधवांशी आपुलकीने विचारपूर करत संवाद साधला.त्यामुळे गृहराज्यमंत्री ना. देसाई यांचे बद्दल उपस्थितांमध्ये कुतुहल निर्माण झाले.तर पोलीस दल आणि नक्षली यांच्यात झालेल्या चकमकीतील जखमी जवानांची घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्याबरोबर चकमकी बाबत चर्चा केली व तब्येतीची विचारपूस केली. राज्यमंत्री देसाई यांनी संबंधित जवानाला शासनाकडून जी काही मदत लागेल ते देण्याचे आश्वासनही दिले.

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजना अंतर्गत पाटण विधानसभा मतदार संघातील 22 गावातील 27 कि.मी.अंतराच्या पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजूरी

 



दौलतनगर दि.28 :- पाटण या डोंगरी व दुर्गम भागामधील अनेक गांवामध्ये शेत पाणंद रस्ते अरुंद व ना दुरुस्त असल्याने या रस्त्यावरुन शेतीशी निगडीत  विविध बाबींसाठी कमी प्रमाणात या रस्त्यावरुन वहिवाट होत होती शेतीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या शेत पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागणे गरजेचे असल्याने पाटण मतदारसंघातील शेत/पाणंद रस्त्यांची प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील 22 गावातील सुमारे 27 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांची कामे ही राज्य शासनाने नव्याने सुरु केलेल्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेतून मंजूर होण्यासाठी रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार  पाटण मतदारसंघातील 22 गावातील सुमारे 27 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश हा मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेच्या सन 2021-22 वर्षाच्या वार्षिक आराखडयामध्ये समावेश करत या शेत/पाणंद रस्त्यांना मंजूरी देण्यात आली असल्याची माहिती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

          प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य असून राज्यातील शेतकरी हिताच्यादृष्टीने अनेक निर्णय राज्य शासनाचेवतीने घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना शेतीचे मशागतीचे साहित्य व शेत मालाची वाहतूक करण्यासाठी शेत पाणंद रस्त्यांची सुविधा नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेत पाणंद रस्त्यांची कामे झाल्यास शेतकऱ्यांच्या बांधावर वाहन जाऊन शेती विषयक कामे जलदगतीने पुर्ण होण्यास मदत होणार आहे. या अगोदर अस्तित्वात असलेली पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजनेतून कामे पूर्ण करताना अनेक अडचणी व निधीची कमतरता यामुळे सदर योजना अधिक कार्यक्षम करणे गरजेचे असल्याने त्याअनुषंगाने पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते येाजनेचे सर्व शासन निर्णय व शुध्दीपत्रके अधिक्रमित करुन सदर योजना अधिक सुटसुटीत करण्यात येऊन या योजनेचे मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजना असे करण्यात आले आहे.मनरेगा आणि राज्य रोहयो यांच्या अभिसरणातून सदर योजना राबवायची असून शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांकरीता पुरक कुशल निधी राज्य रोहयोंतर्गत उपलब्ध करुन देण्याबाबत या शासन  निर्णयात तरतुद करण्यात आली.त्यानुसार मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजने अंतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी शेत/पाणंद रस्त्यांच्या आराखडा तयार करण्यासंदर्भात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील महसूल विभागाच्या संबंधित गाव नकाशामध्ये असलेल्या 22 गावातील 27 किमी शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांच्या शिफारशी रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे यांचेकडे केल्या होत्या.त्यानुसार मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेच्या सन 2021-22 वर्षाच्या वार्षिक आराखडयामध्ये पाटण मतदारसंघातील 22 गावातील सुमारे 27 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश करुन या कामांना मंजूरी देण्यात आली आहे.मंजूरी देण्यात आलेल्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांमध्ये पत्रेवाडी चोपडी पोहोच रस्ता 01 किमी, काळगाव येथे येळेवाडी फाटा ते धामणी पाणंद रस्ता 02 किमी, पापर्डे खुर्द पाणंद रस्ता 01 किमी, शिद्रुकवाडी धावडे येथील पाणंद रस्ता 01 किमी,जिमनवाडी कुशी जळकेवस्ती पाणंद रस्ता 01 किमी, विहे विहिर पाणंद रस्ता 01 किमी, येराड ते तामकडे पाणंद रस्ता 02 किमी,आवर्डे धनगरवस्ती पाणंद रस्ता 01 किमी,चाफळ ते गमेवाडी पाणंद रस्ता 02 किमी, गुढे ते भोसगाव पाणंद रस्ता 1.5 किमी,डावरी येथील पाणवटा ते निनाई मंदिर पाणंद रस्ता 0.500 किमी, आडूळ पेठ ते काळेवाडी पाणंद रस्ता 01 किमी, मारुलहवेली येथील जाधव शिवार ते गांधीटेकडी कारखाना पाणंद रस्ता 01 किमी, वेताळवाडी गावठाण ते खारुती पाणंद रस्ता 02 किमी, गारवडे नवनाथ बंगला ते मारुल वडा पाणंद रस्ता 02 किमी,आंब्रुळे ढोपरेवस्ती ते मळी पाणंद रस्ता 01 किमी, मरळी निनाई मंदिर ते नंदा पाणंद रस्ता 01 किमी, मरळी दत्त मंदिर ते खुटाळ पाणंद रस्ता 01 किमी, सांगवड सोसायटी गोडाऊन ते गडकर पाणंद रस्ता 01 किमी नाडे गाव ते पिलके अरदळ पाणंद रस्ता 01 किमी,बांबवडे ते तळी पाणंद रस्ता 01 किमी, साकुर्डीवस्ती येथील पाणंद जोड रस्ता 01 किमी या कामांचा समावेश असून मातोश्री शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना पूरक कुशल निधी राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत उपलब्ध होऊन या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार असल्याचे शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.

Monday 24 January 2022

पाटणमधील शिवसेना पक्षाला वाढलेल्या मताधिक्याने सत्यजितसिंहाचा थयथयाट. मंत्री ना. देसाई यांचे सत्यजितसिंह पाटणकर यांच्यावर हल्लाबोल.

 

दौलतनगर दि.24(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- आपल्या हक्काच्या पाटण गावातच शिवसेनेचे मताधिक्य वाढू लागल्यामुळे पाटणकरांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे.त्यामुळेच ते बेताल आरोप करीत सुटले आहेत.आम्हाला सेवानिष्ठा शिकविणाऱ्या सत्यजितसिंह पाटणकर तुम्ही पाटण नगरपंचायतीवर ज्या पक्षाची सत्ता आली आहे म्हणून टिमकी वाजवताय त्या पक्षाच्या चिन्हावर एक तरी सदस्य तुमचा निवडून आला आहे का? ज्या पक्षाच्या नावावर मोठे झाला त्या पक्षाचे नावच गायब करणारे आपले निष्क्रिय कर्तृत्व आता पाटण शहरातीलच नव्हे तर आता संपूर्ण जिल्ह्याने पाहिले आहे. नगरपंचायतीच्या निवडणूकीमध्ये पाटणमध्ये शिवसेना पक्षाला वाढलेल्या मताधिक्याने सत्यजितसिंहाचा थयथयाट सुरु आहे.असा हल्लाबोल राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांच्यावर पत्रकाद्वारे केला आहे. 

             मंत्री देसाई म्हणाले,पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीत आम्ही कुठेही राजकीय सभा कार्यक्रम घेतले नाही.मात्र आम्हाला या निवडणुकीत सत्तेचा राजकीय वापरच करायचा असता, तर तो आम्हाला बँकेत अथवा कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी बसून करायची गरज भासली नसती. तर तो आम्ही थेट आणि करेक्टच केला असता,  हे तुमच्यासहित तुमच्या बगलबच्च्यांनाही ही माहीत आहे.सत्यजितसिंहाचं अस झाले आहे की स्वत:च ठेवायच झाकून दूसऱ्याच बघायच वाकून अशीच अवस्था झाली आहे. कारण निवडणूक कोणतीही असो मग पाटणमध्ये मतदान मिळविण्यासाठी आपल्या बगलबच्च्यांमार्फत सामान्य जनतेला मतदान करण्याकरीता वेठीस धरण्यासाठी खालच्या पातळीचे कशा पध्दतीने राजकारण करण्यात येते ते पाटणवासियांनी यापुर्वी अनुभवले आहे.ते वेगळ सांगायची गरज नाही.

            सत्यजित पाटणकर तुम्ही आमच्या मरळी गावाची काळजी अजिबातच करू नका ते लोकनेत्यांचे आणि त्यांच्याच विचारांचे गाव आहे आणि त्यासाठी आम्ही सक्षम आहोत, हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे मात्र ज्या पाटण च्या भक्कम बालेकिल्ल्याची भाषा करणाऱ्या निष्क्रिय विरोधकांनी आपल्या बालेकिल्याचे बुरुज पहिल्यांदा तपासून पाहावेत कारण जे आपले उमेदवार निवडूण आले आहेत ते किती मतांच्या फरकाने निवडूण आले आहेत याचा गवगवा का करत नाही. त्यामुळे नेमके कुणाला मतदारांनी नाकारले आहे हे लवकरच जनतेलाही कळेल असा सूचक इशारा ही मंत्री देसाई यांनी दिला.

                 तुमच्या  केवळ निष्क्रिय नेतृत्वामुळे पाटण शहरातील सर्वसामान्य जनता वेठीस धरली जात आहे.ज्या अठरा नागरी सुविधा पाटण वासियांना आपण देऊ शकत नाही.यामध्ये प्राधान्याने पाटण शहर वासियांना साधे स्वच्छ पाणी देऊ शकत नाही.पहावे तेव्हा प्रत्येकाच्या घरापुढे टँकर उभा तोही सर्वसामान्य जनतेच्या खिशाला चाट लावून.हे आपल निष्क्रिय कर्तृत्व सर्वजण पाहत आहेत. राहिला विषय उमेदवारांचा ज्यांना समाजात स्थान नाही, ज्यांनी तमाम महिला वर्गाला लाजेने मान खाली लावायला अशा गावगुंडांना सोबत घेऊन नगर पंचायतीच्या सत्तेत पुन्हा बसविले जात आहे, त्यांच्याकडून नंगरपंचायतीमध्ये नेमक्या कोणत्या कामाची अपेक्षा पाटण शहारातील सर्वसामान्य महिला मतदार यांनी करायची हे एकदा स्पष्ट करा. कारण असा हा प्रकार पाटण शहराचेच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचे दुर्दैव आहे,असा घणाघात करून मंत्री देसाई म्हणाले, आमचे दोन जरी सदस्य असले तरी ते सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठीच झटत राहतील.पाटण नगरपंचायतीच्या निवडणूकीमध्ये गल्लीबोळात उमेदारांचा प्रचार करुनही शिवसेना पक्षासह इतर अपक्ष उमेदवार यांची व तुमच्या नेतृत्वाखालील उमेदवारांना पडलेली मते यांची टक्केवारी काढली तर पाटणमधील जनतेने नेमके कोणाला नाकारले आहे हेही आपणच तपासून घ्या.पाटण शहरातील काही अंशी  मतदार हे आता जरी तुमच्या दहशतीखाली असले तरी भविष्यात कुणाचा कार्यक्रम करेक्ट करायचा हे ही जनतेने  आत्ताच ठरवले आहे, असा सूचक इशारा मंत्री देसाई यांनी विरोधकांना केला.

              दरम्यान विरोधक काय टिमक्या वाजवातायत यांकडे दुर्लक्ष करून या निवडणुकीत  लोकांनी दिलेला कौल आम्ही  लोकशाही मार्गाने स्वीकारलेला असून आमची वाटचाल नेहमीच मते वाढवण्याच्या दृष्टीने आहे आणि जरी सत्ता आली नसली तरी आणि आमचे बहुमत पाटण नगरपंचायतीत नसले किंवा दोनच नगरसेवक निवडून आले असले तरी निवडणुकीमध्ये पाटण नगरपंचायतीच्या विकासासाठी जो शब्द दिला होता तो शब्द शिवसेना आणि तिथला स्थानिक आमदार म्हणून आणि राज्याचा राज्यमंत्री म्हणून आम्ही आणि लोकांच्या विकासासाठी आम्ही सतत कटिबद्ध राहणारच आणि तशी अपेक्षा ही शहरातील जनतेची आहे याची आपणाला निश्चित खात्री आहे असा पुनरोच्चार ही मंत्री देसाई यांनी शेवटी केला.

चौकट : सामान्य जनता म्हणजे तुमची काय खाजगी मालमत्ता वाटली काय?

माझ्या राजकीय जीवनात मी कधीही  विकासनिधी देताना राजकीय गट म्हणून दिला नाही. आडात नाही तर पोहऱ्यांत कोठून येणार ज्यांना साधा एक दमडीचा निधी वाटपाचा अधिकार नाही त्यांनी आम्हाला निधी कुठे वापरायचा आणि कुठे वापरायचा नाही हे वेगळ सांगण्याची गरजच नाही.मात्र तुम्हाला जनतेची एवढीच काळजी असती तर पाटण सारख्या शहराची अशी परवड झालीच नसती.असा हल्लाबोल करून जनता म्हणजे तुमची काय खाजगी मालमत्ता वाटली काय ? ज्यांनी तुम्हाला पोत्याने मतदान केले त्यांना विकासापासून वंचित ठेवण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे.तुमच्या केवळ तुमच्या निष्क्रियतेमुळे, नाकर्तेपणामुळे आणि  फाजील आत्मविश्वासमुळेच शहरातील जनता मूलभूत विकासापासून दुर्दैवाने लांब राहिली आहे. त्यामुळे जनतेचा विकासनिधी नाकारण्याची भाषा करु नये असा टोला  मंत्री शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांच्यावर लगावला.

Friday 21 January 2022

बालेकिल्ल्यात घुसून शिवसेनेने पंचवीस टक्के मतदान वाढवले. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई. पाटण नगरपंचायत निवडणूक

 

दौलतनगर दि.10 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- नुकत्याच झालेल्या पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेला दोन जागा मिळाल्या असल्या तरी विरोधकांच्या गावात घुसून शिवसेनेने दोन जागा कायम ठेवून  पाटण शहरात गतवेळी पेक्षा पाच टक्क्यांनी शिवसेनेनेचे मताधिक्य वाढवून ते पंचवीस  टक्क्यांवर नेले  आहे. त्यामुळे पाटण शहरात शिवसेनेला अपयश मिळाले ही बाब चुकीची असून ने खऱ्या अर्थाने शिवसेनेने सर्व जागा लढवून पाटण शहरात गतवेळ च्या तुलनेत मुसंडीच मारल्याचे निकालावरून स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिली.पाटण नगरपंचायतीच्या निकालावरून सध्या विरोधक शिवसेनेला अपयश मिळून शिवसेने ला धक्का म्हणून ढोल वाजवू लागले आहेत या संदर्भात मंत्री देसाई पत्रकारांशी बोलत होते.

ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले,मला लोकांनी दिलेला कौल आम्ही  लोकशाही मार्गाने स्वीकारलेला आहे मात्र थोडसं विश्लेषण या पाटण नगरपंचायतीचे निवडणुकीच करणे गरजेचे आहे पाटण हे गाव ते पारंपारिक दृष्ट्या आमचे राष्ट्रवादीचे तिथले स्थानिक नेते माननीय विक्रमसिंह पाटणकर यांचे गाव आहे त्या गावांमध्ये सातत्यानं पाटणकर गट नेहमी प्राबल्याने राहिला आहे.आम्ही  त्या ठिकाणी अल्पमतात पहिल्यापासूनच आहोत त्यामुळे अपयश आले. मात्र  पाटण नगर पंचायत स्थापन झाली 2017 साली आणि  पहिली निवडणूक पाच वर्षांपूर्वी झाली आणि त्या वेळीसुद्धा आम्ही सर्व जागा शिवसेना म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढवू शकलो नव्हतो .ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य झाले त्याच्या ठिकाणी उमेदवार मागच्या निवडणुकीत  शिवसेनेने  जेथे उभे केले आणि तेथेच दोन जागा आमच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या.आज पाच वर्षांनंतर आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण पूर्ण जागा 17 च्या  17 जागा लढवल्या आणि त्या ठिकाणी लढत झाली चांगली लढत झाली आणि आमची दोन नगरसेवक दोन जागा आमची जागा कायम राखण्यात शिवसेनेला यश आले. परंतु पाटण हे स्वतः माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकरांचे गाव आहे त्यामुळे याच्या आधी ग्रामपंचायत निवडणूक असताना आम्ही कधी त्या ठिकाणी उमेदवार सुद्धा उभे करीत नव्हतो एवढी एक हाती सत्ता त्यांची त्या गावात होती. मात्र या गावांमध्ये आता बदल झाला 2017चे निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानाची नगरपंचायत किती टक्केवारी काढली तर शिवसेनेला फक्त 21 टक्के मते पडली होती काल झालेल्या निवडणुकीमध्ये ही टक्केवारी  25 पर्यंत पोहोचली त्यामुळे या निवडणुकीत 4 ते 5 टक्के मतांची पाटण मध्ये शिवसेनेच्या मतांची वाढ झाली आहे आमची वाटचाल मते वाढवण्याच्या दृष्टीने आहे आणि जरी सत्ता आली असली तरी आणि आमचे बहुमत पाटण नगरपंचायतीत नसले किंवा दोनच नगरसेवक निवडून आले असले तरी निवडणुकीमध्ये पाटण नगरपंचायतीच्या विकासासाठी जो शब्द दिला होता तो शब्द शिवसेना आणि तिथला स्थानिक आमदार म्हणून आणि राज्याचा राज्यमंत्री म्हणून आम्ही आणि लोकांच्या विकासासाठी आम्ही सतत कटिबद्ध आहोत याउलट राष्ट्रवादीचे स्थानिक नेते म्हणतात की आम्ही त्या ठिकाणी प्रचंड यश मिळवलं या गावांमध्ये पारंपारिक त्यांच्या गावात घुसून दोन जागा तरी शिवसेनेचे निवडून आल्या मात्र आम्ही सगळ्या जागा निवडून आणल्या म्हणणाऱ्या विरोधकांनी ज्याप्रमाणे आम्ही तूमच्या गावांत येऊन संपूर्ण पॅनल घेऊन लढून दोन जागा जिंकल्या त्याप्रमाणे तुम्ही माझ्या मरळी  गावांत येऊन माझ्या गावात येऊन सर्वच्या सर्व उमेदवार उभे करून दाखवा असे आव्हान ही मंत्री देसाई यांनी विरोधकांना दिले.दरम्यान ही निवडणक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक झाली काही ठिकाणी राष्ट्रवादीची गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनी काही ठिकाणी अपवाद वगळता काही ठिकाणी दमदाटी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला पण आमच्या पोलीस प्रशासनाने या ठिकाणी चांगल्या वातावरणामध्ये निवडणूक झाली आणि लोकशाही आहे लोकांनी मतदारांनी कौल दिला आहे तो आम्ही स्वीकारला असल्याचे ही शेवटी त्यांनी स्पष्ट केले.

चौकट : ही तर सुरवात आहे..!

पाटण नगर पंचायतीमध्ये गतवेळी केवळ दोन जागेसाठी शिवसेनेने प्रयत्न केला असताना दोन जागा तर मिळाल्याच त्या  बरोबर पाटण शहरातील 17 टक्के मतदान ही मिळाले यावेळी तर शिवसेनेने दोन जागा कायम ठेवल्याच त्याचबरोबर विरोधकांच्या गावात शिवसेनेचे संपूर्ण पॅनेल उभे करून आणि गतवेळी पेक्षा जास्त मतांची टक्केवारी खेचली  त्यामुळे 'अपयश' नेमके कुणाचे हे जनतेला माहीत झाले आहे .दरम्यान ही तर केवळ सुरवात असल्याचे ही मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

Sunday 9 January 2022

पत्रकारांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील, पत्रकारांच्या पाठीशी आघाडी सरकार ठाम. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई.

 



 

दौलतनगर दि.10 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून आपत्कालीन सारख्या गंभीर परिस्थितीत तर पत्रकार जीवावर उदार होऊन स्वतःच्या समस्या बाजूला ठेवून समाजाच्या समस्या आणि प्रश्न शासनदरबारी प्रामाणिकपणे मांडत असतो मात्र समाजातील वास्तव मांडताना दुर्दैवाने पत्रकारांवर जीवघेणे हल्ले ही होतात ही बाब राज्याच्या दृष्टीने लाजिरवाणी आहे. मात्र पत्रकारांच्या पाठीशी राज्यातील महाविकास आघाडी सरकार ठामपणे उभे असून पत्रकारांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृह राज्यमंत्री ना शंभूराज देसाई यांनी केले.

             दौलतनगर,ता.पाटण येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या पाटण तालुक्यातील पत्रकारांना चहापान आणि शुभेच्छा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, लोकनेते बाळासाहेब देसाई करखान्याचेअध्यक्ष अशोकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

              मंत्री ना. शंभूराज देसाई पुढे म्हणाले, राज्यातील पत्रकारांसाठी पत्रकार कल्याण निधी योजना राज्य शासन राबवित असून राज्यात होत असलेल्या पत्रकार हल्ल्यावरील कठोर कारवाई करण्यासाठीही राज्य सरकार ने पुढाकार घेतला आहे. ज्या ज्या वेळी राज्यातील पत्रकारांवर असे हल्ले झाले त्या त्या वेळी  राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून तात्काळ दखल घेऊन हल्लेखोरांविरुद्ध तातडीने कार्यवाही करण्याचा आपण प्रयत्न केला आणि पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात गृह खात्याचा वचक निर्माण केला राज्यातील कोणत्याही पत्रकारांवर हल्ला झाल्यानन्तर तात्काळ दखल घेतली .

          कोरोना संसर्ग,अतिवृष्टी आणी पुरपरिस्थितित पत्रकारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या लेखणीने शासनापर्यंत जनतेच्या भावना पोहचवून आपले प्रामाणिक कर्तव्य पार पाडले.यापुढील काळातही राज्यसरकारच्या वतीने मी पत्रकाराच्या मागण्या आणि प्रलंबित प्रश्न विधिमंडळात मांडणार आहे. राज्यसरकार पत्रकारांच्या मागण्यासाठी सकारात्मक असून आघाडी सरकार पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे ही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.

यावेळी पत्रकार रवी माने,संजय लोहार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक  संभाजी भिसे यानी तर आभार रामचंद्र कदम यानी मानले . या कार्यक्रमासाठी पाटण तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.

चौकट ;तर एका वर्षात पाटण तालुक्यात पत्रकार भवन उभारणार.

             दरम्यान पाटण तालुक्यातील पत्रकारांचे योगदान महत्वाचे असून परिस्थिती,अतिवृषठी, भूकंप,असो अथवा दरडी कोसळणे यासारख्या कोणत्याही आपत्ती काळात पाटण तालुक्यातील पत्रकारांनी शासनापर्यंत वस्तुस्थिती पोहचविण्याचे प्रामाणिक काम केले आहे.त्यामुळे आगामी काळात पाटण तालुक्यात पत्रकारांचा गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असणारा पत्रकार भवना चा प्रश्न लवकरच सोडविण्यासाठी आपण पर्यत  करणार असून जागेचा प्रश्न सुटताच एका वर्षाच्या आत तालुक्यात भव्य असे पत्रकार भवन उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ही त्यांनी शेवटी सांगितले.

चौकट -वित्तमंत्री या नात्याने निधी कमी पडू देणार नाही 

             राज्याचे अर्थ मंत्री म्हणून ना. अजित पवार आहेत आणि मी गृहराज्य मंत्री पदा बरोबर माझ्याकडे राज्याचा अर्थराज्य मंत्रीपदाचा ही पदभार आहे. शिवाय अर्थमंत्री ना. अजित पवार आणि माझे स्नेहाचे संबंध आहेत त्यामुळे भविष्यात पाटण तालुक्यात होणाऱ्या पत्रकार भवन इमारतीसाठी  भरघोस निधी देण्यासाठी मी प्रयत्नशील असून निधीची कधीच कमतरता भासू देणार  नाही असा विश्वास मंत्री शंभूराज देसाई यांनी या वेळी दिला.