Sunday 9 January 2022

पत्रकारांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील, पत्रकारांच्या पाठीशी आघाडी सरकार ठाम. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई.

 



 

दौलतनगर दि.10 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून आपत्कालीन सारख्या गंभीर परिस्थितीत तर पत्रकार जीवावर उदार होऊन स्वतःच्या समस्या बाजूला ठेवून समाजाच्या समस्या आणि प्रश्न शासनदरबारी प्रामाणिकपणे मांडत असतो मात्र समाजातील वास्तव मांडताना दुर्दैवाने पत्रकारांवर जीवघेणे हल्ले ही होतात ही बाब राज्याच्या दृष्टीने लाजिरवाणी आहे. मात्र पत्रकारांच्या पाठीशी राज्यातील महाविकास आघाडी सरकार ठामपणे उभे असून पत्रकारांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृह राज्यमंत्री ना शंभूराज देसाई यांनी केले.

             दौलतनगर,ता.पाटण येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या पाटण तालुक्यातील पत्रकारांना चहापान आणि शुभेच्छा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, लोकनेते बाळासाहेब देसाई करखान्याचेअध्यक्ष अशोकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

              मंत्री ना. शंभूराज देसाई पुढे म्हणाले, राज्यातील पत्रकारांसाठी पत्रकार कल्याण निधी योजना राज्य शासन राबवित असून राज्यात होत असलेल्या पत्रकार हल्ल्यावरील कठोर कारवाई करण्यासाठीही राज्य सरकार ने पुढाकार घेतला आहे. ज्या ज्या वेळी राज्यातील पत्रकारांवर असे हल्ले झाले त्या त्या वेळी  राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून तात्काळ दखल घेऊन हल्लेखोरांविरुद्ध तातडीने कार्यवाही करण्याचा आपण प्रयत्न केला आणि पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात गृह खात्याचा वचक निर्माण केला राज्यातील कोणत्याही पत्रकारांवर हल्ला झाल्यानन्तर तात्काळ दखल घेतली .

          कोरोना संसर्ग,अतिवृष्टी आणी पुरपरिस्थितित पत्रकारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या लेखणीने शासनापर्यंत जनतेच्या भावना पोहचवून आपले प्रामाणिक कर्तव्य पार पाडले.यापुढील काळातही राज्यसरकारच्या वतीने मी पत्रकाराच्या मागण्या आणि प्रलंबित प्रश्न विधिमंडळात मांडणार आहे. राज्यसरकार पत्रकारांच्या मागण्यासाठी सकारात्मक असून आघाडी सरकार पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे ही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.

यावेळी पत्रकार रवी माने,संजय लोहार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक  संभाजी भिसे यानी तर आभार रामचंद्र कदम यानी मानले . या कार्यक्रमासाठी पाटण तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.

चौकट ;तर एका वर्षात पाटण तालुक्यात पत्रकार भवन उभारणार.

             दरम्यान पाटण तालुक्यातील पत्रकारांचे योगदान महत्वाचे असून परिस्थिती,अतिवृषठी, भूकंप,असो अथवा दरडी कोसळणे यासारख्या कोणत्याही आपत्ती काळात पाटण तालुक्यातील पत्रकारांनी शासनापर्यंत वस्तुस्थिती पोहचविण्याचे प्रामाणिक काम केले आहे.त्यामुळे आगामी काळात पाटण तालुक्यात पत्रकारांचा गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असणारा पत्रकार भवना चा प्रश्न लवकरच सोडविण्यासाठी आपण पर्यत  करणार असून जागेचा प्रश्न सुटताच एका वर्षाच्या आत तालुक्यात भव्य असे पत्रकार भवन उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ही त्यांनी शेवटी सांगितले.

चौकट -वित्तमंत्री या नात्याने निधी कमी पडू देणार नाही 

             राज्याचे अर्थ मंत्री म्हणून ना. अजित पवार आहेत आणि मी गृहराज्य मंत्री पदा बरोबर माझ्याकडे राज्याचा अर्थराज्य मंत्रीपदाचा ही पदभार आहे. शिवाय अर्थमंत्री ना. अजित पवार आणि माझे स्नेहाचे संबंध आहेत त्यामुळे भविष्यात पाटण तालुक्यात होणाऱ्या पत्रकार भवन इमारतीसाठी  भरघोस निधी देण्यासाठी मी प्रयत्नशील असून निधीची कधीच कमतरता भासू देणार  नाही असा विश्वास मंत्री शंभूराज देसाई यांनी या वेळी दिला.

 

No comments:

Post a Comment