दौलतनगर दि.10
(जनसंपर्क
कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- नुकत्याच
झालेल्या पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेला दोन जागा मिळाल्या असल्या तरी
विरोधकांच्या गावात घुसून शिवसेनेने दोन जागा कायम ठेवून पाटण शहरात गतवेळी पेक्षा पाच टक्क्यांनी शिवसेनेनेचे मताधिक्य
वाढवून ते पंचवीस टक्क्यांवर नेले आहे. त्यामुळे पाटण शहरात शिवसेनेला अपयश मिळाले ही बाब चुकीची
असून ने खऱ्या अर्थाने शिवसेनेने सर्व जागा लढवून पाटण शहरात गतवेळ च्या तुलनेत
मुसंडीच मारल्याचे निकालावरून स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे
गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिली.पाटण नगरपंचायतीच्या निकालावरून
सध्या विरोधक शिवसेनेला अपयश मिळून शिवसेने ला धक्का म्हणून ढोल वाजवू लागले आहेत
या संदर्भात मंत्री देसाई पत्रकारांशी बोलत होते.
ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले,मला लोकांनी दिलेला कौल आम्ही लोकशाही मार्गाने स्वीकारलेला आहे मात्र थोडसं विश्लेषण या पाटण
नगरपंचायतीचे निवडणुकीच करणे गरजेचे आहे पाटण हे गाव ते पारंपारिक दृष्ट्या आमचे
राष्ट्रवादीचे तिथले स्थानिक नेते माननीय विक्रमसिंह पाटणकर यांचे गाव आहे त्या
गावांमध्ये सातत्यानं पाटणकर गट नेहमी प्राबल्याने राहिला आहे.आम्ही त्या ठिकाणी अल्पमतात पहिल्यापासूनच आहोत त्यामुळे अपयश आले.
मात्र पाटण नगर पंचायत
स्थापन झाली 2017 साली आणि पहिली निवडणूक पाच
वर्षांपूर्वी झाली आणि त्या वेळीसुद्धा आम्ही सर्व जागा शिवसेना म्हणून आम्ही त्या
ठिकाणी लढवू शकलो नव्हतो .ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य झाले त्याच्या ठिकाणी उमेदवार
मागच्या निवडणुकीत शिवसेनेने जेथे उभे केले आणि तेथेच दोन जागा आमच्या नगरसेवक म्हणून निवडून
आल्या होत्या.आज पाच वर्षांनंतर
आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण पूर्ण जागा 17 च्या 17 जागा लढवल्या आणि त्या ठिकाणी लढत झाली चांगली लढत झाली आणि
आमची दोन नगरसेवक दोन जागा आमची जागा कायम राखण्यात शिवसेनेला यश आले. परंतु पाटण हे स्वतः माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकरांचे गाव आहे
त्यामुळे याच्या आधी ग्रामपंचायत निवडणूक असताना आम्ही कधी त्या ठिकाणी उमेदवार
सुद्धा उभे करीत नव्हतो एवढी एक हाती सत्ता त्यांची त्या गावात होती. मात्र या गावांमध्ये आता बदल झाला 2017चे निवडणुकीमध्ये झालेल्या
मतदानाची नगरपंचायत किती टक्केवारी काढली तर शिवसेनेला फक्त 21 टक्के मते पडली
होती काल झालेल्या निवडणुकीमध्ये ही टक्केवारी 25 पर्यंत पोहोचली त्यामुळे या निवडणुकीत 4 ते 5 टक्के मतांची
पाटण मध्ये शिवसेनेच्या मतांची वाढ झाली आहे आमची वाटचाल मते वाढवण्याच्या
दृष्टीने आहे आणि जरी सत्ता आली असली तरी आणि आमचे बहुमत पाटण नगरपंचायतीत नसले
किंवा दोनच नगरसेवक निवडून आले असले तरी निवडणुकीमध्ये पाटण नगरपंचायतीच्या
विकासासाठी जो शब्द दिला होता तो शब्द शिवसेना आणि तिथला स्थानिक आमदार म्हणून आणि
राज्याचा राज्यमंत्री म्हणून आम्ही आणि लोकांच्या विकासासाठी आम्ही सतत कटिबद्ध
आहोत याउलट राष्ट्रवादीचे स्थानिक नेते म्हणतात की आम्ही त्या ठिकाणी प्रचंड यश
मिळवलं या गावांमध्ये पारंपारिक त्यांच्या गावात घुसून दोन जागा तरी शिवसेनेचे
निवडून आल्या मात्र आम्ही सगळ्या जागा निवडून आणल्या म्हणणाऱ्या विरोधकांनी
ज्याप्रमाणे आम्ही तूमच्या गावांत येऊन संपूर्ण पॅनल घेऊन लढून दोन जागा जिंकल्या
त्याप्रमाणे तुम्ही माझ्या मरळी
गावांत येऊन माझ्या गावात येऊन सर्वच्या सर्व उमेदवार उभे करून दाखवा असे आव्हान
ही मंत्री देसाई यांनी विरोधकांना दिले.दरम्यान ही निवडणक खेळीमेळीच्या
वातावरणामध्ये ही निवडणूक झाली काही ठिकाणी राष्ट्रवादीची गुंड प्रवृत्तीचे लोक
आहेत त्यांनी काही ठिकाणी अपवाद वगळता काही ठिकाणी दमदाटी दादागिरी करण्याचा
प्रयत्न केला पण आमच्या पोलीस प्रशासनाने या ठिकाणी चांगल्या वातावरणामध्ये
निवडणूक झाली आणि लोकशाही आहे लोकांनी मतदारांनी कौल दिला आहे तो आम्ही स्वीकारला
असल्याचे ही शेवटी त्यांनी स्पष्ट केले.
चौकट :
ही तर सुरवात आहे..!
पाटण नगर पंचायतीमध्ये गतवेळी केवळ दोन जागेसाठी शिवसेनेने प्रयत्न
केला असताना दोन जागा तर मिळाल्याच त्या
बरोबर पाटण शहरातील 17 टक्के मतदान ही मिळाले यावेळी तर शिवसेनेने दोन जागा
कायम ठेवल्याच त्याचबरोबर विरोधकांच्या गावात शिवसेनेचे संपूर्ण पॅनेल उभे करून
आणि गतवेळी पेक्षा जास्त मतांची टक्केवारी खेचली त्यामुळे 'अपयश' नेमके कुणाचे हे जनतेला माहीत झाले आहे .दरम्यान
ही तर केवळ सुरवात असल्याचे ही मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment