दौलतनगर दि.28 :- पाटण या डोंगरी व दुर्गम भागामधील अनेक गांवामध्ये शेत पाणंद रस्ते अरुंद व ना दुरुस्त असल्याने या रस्त्यावरुन शेतीशी निगडीत विविध बाबींसाठी कमी प्रमाणात या रस्त्यावरुन वहिवाट होत होती शेतीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या शेत पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागणे गरजेचे असल्याने पाटण मतदारसंघातील शेत/पाणंद रस्त्यांची प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील 22 गावातील सुमारे 27 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांची कामे ही राज्य शासनाने नव्याने सुरु केलेल्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेतून मंजूर होण्यासाठी रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार पाटण मतदारसंघातील 22 गावातील सुमारे 27 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश हा मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेच्या सन 2021-22 वर्षाच्या वार्षिक आराखडयामध्ये समावेश करत या शेत/पाणंद रस्त्यांना मंजूरी देण्यात आली असल्याची माहिती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य
असून राज्यातील शेतकरी हिताच्यादृष्टीने अनेक निर्णय राज्य शासनाचेवतीने घेण्यात
येत आहेत. शेतकऱ्यांना शेतीचे मशागतीचे साहित्य व शेत मालाची वाहतूक करण्यासाठी
शेत पाणंद रस्त्यांची सुविधा नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा
लागतो. शेत पाणंद रस्त्यांची कामे झाल्यास शेतकऱ्यांच्या बांधावर वाहन जाऊन शेती विषयक
कामे जलदगतीने पुर्ण होण्यास मदत होणार आहे. या अगोदर अस्तित्वात असलेली पालकमंत्री
शेत/पाणंद रस्ते योजनेतून कामे पूर्ण करताना अनेक अडचणी व निधीची कमतरता यामुळे सदर
योजना अधिक कार्यक्षम करणे गरजेचे असल्याने त्याअनुषंगाने पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते
येाजनेचे सर्व शासन निर्णय व शुध्दीपत्रके अधिक्रमित करुन सदर योजना अधिक सुटसुटीत
करण्यात येऊन या योजनेचे मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजना असे करण्यात
आले आहे.मनरेगा आणि राज्य रोहयो यांच्या अभिसरणातून सदर योजना राबवायची असून शेत/पाणंद
रस्त्यांच्या कामांकरीता पुरक कुशल निधी राज्य रोहयोंतर्गत उपलब्ध करुन देण्याबाबत
या शासन निर्णयात तरतुद करण्यात आली.त्यानुसार
मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजने अंतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी
शेत/पाणंद रस्त्यांच्या आराखडा तयार करण्यासंदर्भात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई
यांनी पाटण तालुक्यातील महसूल विभागाच्या संबंधित गाव नकाशामध्ये असलेल्या 22 गावातील
27 किमी शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांच्या शिफारशी रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे
यांचेकडे केल्या होत्या.त्यानुसार मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेच्या
सन 2021-22 वर्षाच्या वार्षिक आराखडयामध्ये पाटण मतदारसंघातील 22 गावातील सुमारे
27 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश करुन या कामांना मंजूरी
देण्यात आली आहे.मंजूरी देण्यात आलेल्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांमध्ये पत्रेवाडी
चोपडी पोहोच रस्ता 01 किमी, काळगाव येथे येळेवाडी फाटा ते धामणी पाणंद रस्ता 02 किमी,
पापर्डे खुर्द पाणंद रस्ता 01 किमी, शिद्रुकवाडी धावडे येथील पाणंद रस्ता 01 किमी,जिमनवाडी
कुशी जळकेवस्ती पाणंद रस्ता 01 किमी, विहे विहिर पाणंद रस्ता 01 किमी, येराड ते तामकडे
पाणंद रस्ता 02 किमी,आवर्डे धनगरवस्ती पाणंद रस्ता 01 किमी,चाफळ ते गमेवाडी पाणंद रस्ता
02 किमी, गुढे ते भोसगाव पाणंद रस्ता 1.5 किमी,डावरी येथील पाणवटा ते निनाई मंदिर पाणंद
रस्ता 0.500 किमी, आडूळ पेठ ते काळेवाडी पाणंद रस्ता 01 किमी, मारुलहवेली येथील जाधव
शिवार ते गांधीटेकडी कारखाना पाणंद रस्ता 01 किमी, वेताळवाडी गावठाण ते खारुती पाणंद
रस्ता 02 किमी, गारवडे नवनाथ बंगला ते मारुल वडा पाणंद रस्ता 02 किमी,आंब्रुळे ढोपरेवस्ती
ते मळी पाणंद रस्ता 01 किमी, मरळी निनाई मंदिर ते नंदा पाणंद रस्ता 01 किमी, मरळी दत्त
मंदिर ते खुटाळ पाणंद रस्ता 01 किमी, सांगवड सोसायटी गोडाऊन ते गडकर पाणंद रस्ता
01 किमी नाडे गाव ते पिलके अरदळ पाणंद रस्ता 01 किमी,बांबवडे ते तळी पाणंद रस्ता
01 किमी, साकुर्डीवस्ती येथील पाणंद जोड रस्ता 01 किमी या कामांचा समावेश असून मातोश्री
शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना पूरक कुशल निधी राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत उपलब्ध
होऊन या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार असल्याचे शेवटी पत्रकांत म्हंटले
आहे.
No comments:
Post a Comment