Friday 28 October 2022

राज्य सरकार साखर कारखानदारीच्या पूर्णपुणे पाठीशी- पालकमंत्री ना.शंभूराज देसाई. लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचा 49 वा गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न.

            

दौलतनगर दि.7 :- राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालील सरकार हे शेतकऱ्यांचे हिताचेच निर्णय वेगाने घेत आहे. राज्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून अडचणीत असलेल्या बळीराजाला आवश्यक ते सर्व सहकार्य करणे ही या सरकारची भूमिका आहे.नुकतेच कमी गाळप क्षमता असलेल्या कारखान्यांचे विस्तारीकरणासाठी शासनाकडून भागभांडवल देण्याचा धोरणात्मक निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.यामध्ये आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा  समावेश असून कारखान्याचे विस्तारीकरणासाठी  सुमारे सोळा कोटींचे शासकीय भागभांडवल कारखान्यास मिळणार असल्याने राज्य सरकार साखर कारखानदारीच्या पुर्णपणे पाठीशी असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा  सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.

       ते दौलतनगर, ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०22-3 मधील 49 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. प्रतिवर्षाप्रमाणे कारखान्याचे श्री.हिंदूराव देसाई बनपूरी,भिमराव चव्हाण कुंभारगाव,शंकर माने खिलारवाडी,बबन कदम मारुलहवेली,सुरेश काटे चाफळ,संभाजी पाटील माजगाव,भाऊसाहेब भंडारे महाडीकवाडी नुने,उत्तम साळूंखे येराड, शामराव पवार मल्हारपेठ,अधिकराव देसाई विहे,सुभाष निकम ऊरुल या ज्येष्ठ 11 सभासदांचे शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा),चि.आदित्यराज देसाई यांचेसह व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे,मा.चेअरमन अशोकराव पाटील,संचालक शशिकांत निकम,बबनराव शिंदे,प्रशांत पाटील,भागोजी शेळके,शंकरराव पाटील,सोमनाथ खामकर,विजय सरगडे,सुनील पानस्कर, विजय सरगडे,संचालिका श्रीमती जयश्री कवर, सौ.दिपाली पाटील,विजय पवार,जालंदर पाटील,विजयराव मोरे,डी.एम.शेजवळ,संतोष गिरी,पांडूरंग शिरवाडकर,म विष्णू पवार,बबनराव भिसे,प्रकाशराव जाधव, विजयराव जंबुरे यांचेसह सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी कार्यकर्ते,कारखाना अधिकारी कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. तत्पूर्वी गळीत हंगाम शुभारंभानिमित्त कारखान्याचे संचालक सर्जेराव लक्ष्मण जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रुपाली सर्जेराव जाधव यांचे शुभहस्ते सत्यनारायण महापुजा संपन्न झाली.

               ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले,राज्यातीला सहकारी साखर उद्योग सध्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चालला असून सहकारी साखर कारखाने शंभर टक्के शासनाच्या नियमाचे पालन करूनच  कारखाने चालवावे लागतात . लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे कार्यक्षेत्र पाहिल्यानंतर निम्माहून अधिेक क्षेत्र हे डोंगंरी भागात आहे. सध्या  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राज्यातील सहकारी साखर कारखानदारीची वाटचाल सुरु आहे.कमीत कमी 2500 प्र..मे.टन प्रतिदिन गाळप क्षमता व एखादा उपपदार्थ निर्मिती प्रकल्प असणे ही आता काळाजी गरज झाली आहे.त्यामुळे आताचे सरकार हे ग्रामीण भागातील सहकार क्षेत्राला जास्तीत जास्त मदत होण्यासाठी प्रयत्नशील असून याबाबत मंत्रीमंडळ बैठकीमध्येही चर्चा झाली. सभासदांचे हित डोळयासमोर ठेऊन विशेषबाब म्हणून कमी क्षमतेच्या कारखान्यांना सरकारकडून शासकीय भागभांडवल मंजूर करत मदत करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये घेतला.तसेच नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष 50 हजार अनुदान जमा करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत शेती नुकसान भरपाईचे जे नियम होते त्यामध्ये बदल करुन,निकषात बदल करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली. ऐन दिवाळी सणामध्ये सर्व मंत्री व लोकप्रतिनिधी हे जिल्हा व तालुका प्रशासनासोबत परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामामध्ये व्यस्त होते असे सांगत ते पुढे म्हणाले की, ज्या विश्वासाने सभासदांनी हा कारखाना आपल्याकडे सोपवला आहे त्या सभासदांचे हित डोळयासमोर ठेऊन सर्वांच्या हातून चांगले काम होईल असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त करत सभासदांनी आपला पिकविलेला सर्व ऊस गळीतास देऊन हा  गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सर्वोत्परी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

                  कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) म्हणाले की, सध्या आपल्या कारखान्याचे पहिल्या टप्प्यातील विस्तारीकरणाचे काम पुर्ण झाले असून लवकरच प्रत्यक्ष गळीत हंगामाला सुरुवात होणार आहे.तर येणाऱ्या काळामध्ये विस्तारीकरणासह उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारणीचा मानस असल्याचे स्पष्ट करत केंद्र शासनाने निर्यातीचे धोरणात बदल करण्याची गरज असल्याचे सांगत राज्य शासनाने कमी गाळप क्षमता असलेल्या सहकारी साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढविण्यासाठी शासकीय भाग भांडवल देण्यास मंजूरी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस,सहकार मंत्री ना.अतुल सावे व मंत्रीमंडळाचे यांचे आभार मानले.

चौकट: आपला कारखाना राज्यामध्ये एक मॉडेल होईल असं आदर्शवत काम करा-ना.शंभूराज देसाई.

मरळी,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा डोंगरी व दुर्गम भागातील कमी क्षमतेचा कारखाना असून कारखान्याचे पहिल्या टप्प्याचे विस्तारीकरणाचे पहिल्या टप्प्याचे काम सध्या पुर्णत्वाकडे गेले आहे.तर कमी गाळप क्षमता असलेल्या कारखान्यांना शासकीय भागभांडवल देण्याचा जो निर्णय झाला त्यामध्येही आपल्या कारखान्याचा समावेश त्यामुळे आपला कारखाना राज्यामध्ये एक मॉडेल होईल असं आदर्शवत काम सर्व संचालक मंडळ,अधिकारी  व कर्मचारी यांचेकडून व्हावं ,अशी अपेक्षाही ना.शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.

Tuesday 25 October 2022

लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचा नामदार शंभूराज देसाई व ज्येष्ठ ११ सभासदांच्या हस्ते गुरुवार दि.२7 ऑक्टोंबर रोजी गळीताचा शुभारंभ – पांडूरंग नलवडे व्हा. चेअरमन

   

 दौलतनगर दि.5:- दौलतनगर, ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२2-3 मधील ४9 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ समारंभ गुरुवार दि.27ऑक्टोंबर,२०२२ रोजी दुपारी 02.00 वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. स्मितादेवी शंभूराज देसाई, कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद यांचे शुभहस्ते कारखाना कार्यस्थळ,दौलतनगर,ता.पाटण येथे संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

                 पत्रकात म्हंटले आहे की,या वर्षीच्या गळीत हंगामातील गळीताकरीता मागील हंगामाच्या जवळपास कारखान्याकडे कार्यक्षेत्रातील ऊसाची नोंद झाली असून कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊस गळीताचे उद्दीष्ट कारखाना व्यवस्थापनाने ठेवले आहे. चालु गळीत हंगामाची पुर्वतयारी पुर्ण झाली असून गाळप हंगाम पुर्ण क्षमतेने होण्याच्या दृष्टीने कारखान्यातील सर्व कामकाज पुर्णत्वाकडे गेले आहे. कारखान्याने ऊस तोडणी व वाहतूकीकरीता पुरेसे तोडणी मजुर व वाहनांचे करार पुर्ण केलेले असून कारखान्याकडे करार केलेली सर्व ऊस तोडणी व वाहतूक तोडणी मजुर यंत्रणा कारखाना कार्यक्षेत्रात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.यंदाचाही गळीत हंगाम कारखान्याचे सभासद,ऊस उत्पादक शेतकरी यांचे सहकार्यातून यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करीत या गळीत हंगामाचा शुभारंभ हा प्रतिवर्षाप्रमाणे कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद श्री.हिंदूराव मारुती देसाई बनपूरी,भिमराव रामचंद्र चव्हाण कुंभारगाव,सदाशिव रामा नलवडे नावडी,बबन यशवंत कदम मारुलहवेली,सुरेश गणपती काटे चाफळ,संभाजी गणपती पाटील माजगाव,भाऊसाहेब सावळा भंडारे महाडीकवाडी नुने,उत्तम रामचंद्र साळूंखे येराड, शामराव यशवंत पवार मल्हारपेठ,अधिकराव आनंदा देसाई विहे,अशोक भिकाजी खामकर सनगरवाडी ऊरुल या ज्येष्ठ 11 सभासदांचे शुभहस्ते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.स्मितादेवी शंभूराज देसाई, कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई (दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत गुरुवार दि.27ऑक्टोंबर,२०२२ रोजी दुपारी 02.00 वा. संपन्न होणार असून या गळीत हंगाम शुभारंभानिमित्त कारखान्याचे संचालक सर्जेराव लक्ष्मण जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रुपाली सर्जेराव जाधव यांचे शुभहस्ते सत्यनारायण महापुजा आयोजीत केलेली आहे. तरी या समारंभास कारखान्याचे सर्व सभासद,ऊस उत्पादक शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी शेवठी पत्रकात केले आहे.

 

चौकट:-

नामदार शंभूराज देसाई यांचे उपस्थितीमध्ये गुरुवार दि.27 ऑक्टोंबर रोजी दिवाळी फराळाचे आयोजन.

प्रतिवर्षा प्रमाणे यंदा दिपावली सणाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेवतीने दिवाळी फराळ या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि. 27 ऑक्टोंबर 2022 रोजी साय.05 ते 08 या वेळेमध्ये महाराष्ट्र दौलत,लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक,दौलतनगर,ता.पाटण येथे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमास सातारा जिल्हयातील लोकप्रतिनिधी, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी, सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांना निमंत्रण देण्यात आले आहे.दरम्यान दिवाळी फराळ कार्यक्रमाचे निमित्ताने सुप्रसिध्द गायक श्री. श्रीधर फडके यांचे फिटे अंधाराचे जाळे या संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.

Monday 17 October 2022

पाटण तालुक्यातील चार ग्रामपंचायतीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे घवघवीत यश. मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदशनाखाली चार ग्रामपंचायतीमध्ये सत्ता. मोरणा‍ विभागातील मोरगिरी ग्रामपंचातीमध्ये तब्बल 60 वर्षानंतर सत्तांतर करत राष्ट्रवादीला धोबी पछाड.

     

दौलतनगर दि.17:-पाटण तालुक्यामध्ये माहे ऑक्टोंबर महिन्यामध्ये पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला होता. निवडणूक लागलेल्या ग्रामपंचातींमध्ये भिलारवाडी,सुतारवाडी,मान्याचीवाडी,मोरगिरी व घाणव या ग्रामपंचातयींचा समोवश होता. दरम्यान महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाखाली भिलारवाडी,सुतारवाडी व मान्याचीवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर मोरणा विभागातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मोरगिरी व शिरळ गणातील घाणव या दोन ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक लागली होती. आज मतमोजणी  झाल्यानंतर निवडणुक झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये मोरणा विभागातील मोरगिरी या ग्रामपंचायतीमध्ये तब्बल 60 वर्षानंतर सत्तांतर करत तालुक्यातील पाच पैकी चार ग्रामपंचायतीवर राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेची सत्ता आली.

           पाटण तालुक्यातील भिलारवाडी, सुतारवाडी, मान्याचीवाडी, मोरगिरी व घाणव या ग्रामपंचातयींचा या ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम नुकताच पार पडला.यामध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाखाली भिलारवाडी,सुतारवाडी व मान्याचीवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.तर निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मोरणा विभागातील मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या मोरगिरी ग्रामपंचायतीची निवडूण लागली होती.या निवडणूकीमध्ये ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली  गावातील युवा वर्गाने भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूकीला सामोरे गेले होते.ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये ना.शंभूराज देसाई यांनी मोरगिरी गावामध्ये केलेल्या विकास कामांचा घरोघरी प्रचार करत  पहिल्यापासून निवडणूकीमध्ये चूरस निर्माण केली  होती. या निवडणूकीमध्ये सरपंच म्हणून सौ.अर्चना किरण गुरव या 307 मतांच्या फरकाने विजयी झाल्या.तसेच विठ्ठल वार्ड क्र.1 मध्ये सचिन कृष्णाजी मोरे,श्रीमती सरिता कृष्णत कुंभार, सौ. वैशाली सचिन मोरे गणेश वार्ड क्र. 2 मधून संदिप गजानन सुतार, सौ.सुनिता सुरेश गुरव तर जोतिर्लिंग वार्ड क्र.3 मधून श्री. जगन्नाथ परशराम माने,सौ.निर्मला रावसाहेब चव्हाण हे सात उमेदवार विजयी झाले.विजयी उमेदवार व कार्यकर्ते यांनी  दौलतनगर,ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई(दादा) यांची भेट घेतली. यावेळी मा.यशराज देसाई (दादा) यांनी विजयी उमेदवारांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.विजयी उमेदवारांचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,मा.जिल्हा परिषद सदस्या सौ.सुग्रा खोंदू, बशीर खोंदू,मा.पंचायत समिती सदस्य सौ.निर्मला देसाई,नथूराम कुंभार गणेश भिसे यांनी अभिनंदन केले.निवडणुकीमध्ये विजय संपादन करण्याठी सी.डी.केळकर (काका), विलास कुंभार, राजेंद्र साने, राघू भाईंगडे, रंगा झांजुगडे, संजय कानडे, पंढरीनाथ मोरे, संतोष मोरे, महेश कुंभार, बळीराम कुंभार, दशरथ पवार, अशोक नाडेकर, मोहन कोळेकर, धनाजी मोहिते, लक्ष्मण मोरे, सतिश कदम, प्रकाश पवार, प्रविण कुंभार, बाळू केळकर, भगवान कुंभार, शामराव कुंभार, प्रकाश गुरव, सचिन लाड, संदिप नाडेकर, सचिन मोरे, युवराज चव्हाण, महेंद्र सरनोबत, अर्जुन चव्हाण, पंढरीनाथ मोरे, मारुती कुंभार, महादेव सरनोबत, किशोर गुरव तसेच मुंबई व पुणे रहिवाशी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

Saturday 15 October 2022

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून गत गळीत हंगामातील एफ.आर.पी.ची रक्कम बँक खाती वर्ग. शेतकऱ्यांच्या बँक खाती अंतिम बिल वर्ग करत शेतकऱ्यांना चेअरमन यशराज देसाई यांचेकडून दिपावलीच्या शुभेच्छा.


दौलतनगर दि.15 :- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यांस सन 2021-22 च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसबिलापोटी लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी नुसार उर्वरित अंतिम रु. 215/- प्र.मे.टन प्रमाणे होणारी रक्कम रु.572.95 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने गत सन 2021-22 च्या गळीत हंगामातील एफ.आर.पी.प्रमाणे होणारी ऊसबिलाची संपूर्ण रक्कम अदा केली असल्याची माहिती कारखान्याचे  चेअरमन मा.यशराज शंभूराज देसाई (दादा) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2021-22 चे गळीत हंगामामध्ये 02 लाख 66 हजार 488 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 11.82% सरासरी साखर उताऱ्यांने 03 लाख 14 हजार 850 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सन 2021-22 च्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसबिलाची एफआरपीच्याप्रमाणे  एकूण रक्कम रु.7101.91  लाख इतकी होत असून कारखान्याने यापूर्वी रु. 6528.96  लक्ष रक्कम ऊस पुरवठादारांना अदा केली आहे. दरम्यान लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमप्रसंगी दिवाळीपूर्वी गत गळीत हंगामातील उर्वरित एफ.आर.पी.ची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार आज रोजी गत गळीत हंगामातील उर्वरित अंतिम रु. 215/- प्र.मे.टन प्रमाणे होणारी रक्कम रु.572.95 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करत लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी पाटण तालुक्यातील तमाम ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे  मार्गदर्शक,महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापन चांगल्या पध्दतीने नियोजन करत दैनंदिन खर्चांमध्ये काटकसर करण्याचे धोरण राबविले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतक-यांचे हित डोळयांसमोर ठेऊन नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने सन 2021-22 च्या गळीत हंगामात कारखान्याला गळीतास आलेल्या ऊसाला एफआरपीच्या उर्वरित रक्कम ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खाती वर्ग केली असल्याचे सांगत सन 2021-22 च्या गळीत हंगामामध्ये कारखान्याला गळीतास पुरविलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांशी संपर्क साधावा असे सांगत ते पुढे म्हणाले की,ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांना भासणारी आर्थिक निकड लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत गत गळीत हंगामातील उर्वरित एफ.आर.पी.ची रक्कम दिवाळीपूर्वी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग केली आहे. सन 2022-23 च्या गळीत हंगामाची संपूर्ण तयारी करण्यात आली असून तोडणी वाहतूक यंत्रणा कारखान्यावर दाखल होण्यास सुरुवातही झाली आहे.तसेच कारखान्याचे आधुनिकीकरणासह विस्तारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष ऊस गळीत हंगामास लवकरच सुरुवात होणार आहे.त्यामुळे चालू गळीत हंगाम यशस्वी करण्याच्या उद्देशाने कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस हा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास गळीतास देऊन गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन  चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांनी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.

Monday 10 October 2022

चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेबरोबर युवकांची मांदीयाळी.

             

दौलतनगर दि.10:- महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून पाटण विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच युवकांची मांदीयाळी होती.तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने पारंपारीक वाद्यांचे नियोजनही करण्यात आले होते.दरम्यान मुंबई येथील नियोजित बैठकांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी कालच मा.यशराज देसाई (दादा) यांना कोयना दौलत निवासस्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच आज श्रीमती विजयादेवी देसाई(मॉसाहेब),सौ.स्मितादेवी देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई (दादा), सौ.अस्मितादेवी देसाई,चि.जयराज देसाई,चि.आदित्यराज देसाई,ईश्वरी दिदी यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस  प्रतिवर्षी  मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते, हितचिंतक यांचेकडून विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी मा.यशराज देसाई (दादा) यांना साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा प्रशासनाचेवतीने सातारा येथील कोयना दौलत निवासस्थानी  प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.त्यानंतर वाढदिवसाचे औचित्य साधून सातारा येथील एहसास मतीमंद मुलांचे शाळेमध्ये खाऊवाटप करण्यात आले. त्यांनतर त्यांनी दौलतनगर येथील श्री गणेश मंदिरामध्ये श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर मा. यशराज देसाई दादा यांचे औक्षण केले.तद्नंतर मरळी गावचे ग्रामदैवत श्री निनाईदेवी मंदिर येथे निनाईदेवीचे दर्शन घेतले. श्री. निनाईदेवी मंदीरामध्ये मरळी ग्रामस्थांच्या मा. यशराज देसाई यांनी शुभेच्छा स्विकारल्या. त्यानंतर कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब), स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधी व पुर्णाकृती पुतळयाचे दर्शन घेऊन त्यांनी कारखाना परिसरातील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे  पुर्णाकृती  पुतळयाचे दर्शन घेतल्यानंतर शिवविजय हॉल येथे मा.यशराज देसाई (दादा)  यांचे पारंपारीक वाद्यांच्या गजरात आगमण झाले. शिवविजय हॉल येथे वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केल्यानंतर उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांचेकडून शुभेच्छा स्विकारल्या.वाढदिवसानिमित्त तारळे विभागातील वजरोशी येथील पारंपारिक लेझीम पथक, आदमापूर येथील गजी नृत्य तसेच हालगी वादक अशा पारंपारिक कला या वेळी उपस्थितांना बघायला मिळाल्या.

            मा.यशराज देसाई यांना  शुभेच्छा देण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. मा.यशराज देसाई यांना दूरध्वनीव्दारे व समक्ष भेटून हजारो कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे,खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, प्रदीप पाटील, प्रकाश तवटे, सारंग पाटील,कृष्णा बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले(बाबा),विनायक भासले(बाबा) सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनावणे,परिक्षित थोरात, राजेंद्र देसाई, परेश शेठ, राजेंद्र देसाई कोल्हापूर, कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडूरंग नलवडे, माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण, अशोकराव पाटील शिवदौलत बँकेचे माजी चेअरमन ॲङ मिलिंद पाटील, संचालक शशिकांत निकम, बळीराम साळुंखे, शंकर पाटील, सोमनाथ खामकर,गजानन जाधव,विकास गिरी-गोसावी,विजयराव जंबुरे, प्रकाशराव जाधव,प्रकाश पवार, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,बशीर खोंदु,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई सुरेश पानस्कर,संतोष गिरी, पांडूरंग शिरवाडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, विजयराव मोरे, टी.डी. जाधव, शिवाजीराव शेवाळे, गणेश काजारी, शिवसेना पदाधिकारी राजेश चव्हाण,सागर नलवडे, रत्नदिप जाधव, राजकुमार कदम, हणमंत जाधव, आनंदाराव काळे, अमोल पाटील, शिवाजी देसाई, गोरख देसाई, माणिक पवार, विजय पवार फौजी, अमोल घाडगे, कांता सोनवले, शिवाजी बोंगाणे, प्रशांत पाटील, चंद्रकांत पाटील, अशोकराव पाटील, सावळाराम लाड,भागोजी शेळके,दिपक सुतार, मिलींद पाटील, सलीम इनामदार, गणीभाई चाफेरकर, सुरेश जाधव विठ्ठल पवार, विलास कु-हाडे, वाय. के. जाधव,संजय शिर्के विनायक शिर्के,अरविंद पवार, विष्णू पवार, गणेश भिसे,किसन गालवे,संजय देशमुख, उत्तम मोळावडे,प्रविण पाटील, जालंदर पाटील, माजी पंचायत समिती सदस्य ॲङ डी.पी.जाधव,नथूराम कुंभार, बबनराव शिंदे,अमोल चव्हाण, अभिजित चव्हाण,धनाजी केंडे, राजेंद्र पाटील, विष्णू पवार,अरविंद पवार, शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे,नाना साबळे,संजय शिर्के,हेमंत पवार, प्रकाश टोपले,महिपती गायकवाड,नथूराम सावंत,निवृत्ती कदम,दादा जाधव,संतोष पवार,शंकर पाटील,किसन पवार,माणिक पवार, विठ्ठलराव जाधव, बाळासो सुर्यवंशी, राजेंद्र चव्हाण, विश्वास निकम,रविंद्र सपकाळ,रामभाऊ कदम, रविंद्र जाधव,नाना पवार,मनोज मोहिते, शिवाजी घार्गे, राजाराम मोहिते, मधुकर पाटील,नेताजी मोरे, ॲङ बाबूराव नांगरे, प्रकाश पाटील, हणमंतराव चव्हाण, सचिन पवार, मोहन चव्हाण, अविनाश पाटील, सचिन पाटील, नारायण कारंडे, पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनिल गाडे, तहसिलदार रमेश पाटील, गट विकास अधिकारी गोरख शेलार, उपअभियंता विद्याधर शिंदे,घंटे, शाखा अभियंता संदीप पाटील, नरबट, हराळे भोसले, शंभूराज युवा संघटनेचे अध्यक्ष भरत साळूंखे,अभिजित पाटील, धनाजी शेवाळे, जय मल्हार मातंग संघटनेचे अध्यक्ष बबनराव भिसे, उत्तम मगरे, कारखान्याचे व्हा. चेअरमन राजाराम पाटील, माजी संचालक मधूकर भिसे,बबनराव पाटील, दै.पुढारीचे तुषार देशमुख, दै.तरुण भारतचे संपादक दिपक प्रभावळकर, संभाजी भिसे, दैनिक सकाळचे अरुण गुरव यांच्यासह विविध गावातील सरपंच, उपसरपंच, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच पाटण तालुका, जयमल्हार मातंग संघटना पाटण तालुका, कोयना परिसर साखर कामगार संघटना,शिवसेना,युवासेना,पाटण तालुका शंभूराज युवा संघटना तसेच तालुक्यातील देसाई कुटूंबावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

 

Friday 7 October 2022

चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा दि.10 ऑक्टोंबर रोजी वाढदिवस. वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ,हार न आणता शालेय वस्तू आणण्याचे आवाहन.


दौलतनगर दि.07:- महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई (दादा) यांचा सोमवार दि.0ऑक्टोंबर,२०२२ रोजीचा वाढदिवस पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये ना. शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेना,युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेवतीने साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान वाढदिनी मा.यशराज देसाई (दादा) हे सकाळी 10 ते दुपारी 03.00 वा. पर्यंत दौलतनगर,ता.पाटण येथे उपस्थित राहणार असून शिवविजय हॉल दौलतनगर येथे शुभेच्छा स्विकारणार आहेत. त्यानंतर ते कुटुंबियांसमवेत परगावी जाणार असून वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ,हार न आणता शालेय वस्तू आणण्याचे आवाहन मा. यशराज देसाई (दादा) वाढदिवस नियोजन समिती यांनी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.

प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस  प्रतिवर्षी  मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते, हितचिंतक यांचेकडून विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो. यंदाच्याही वर्षी मा.यशराज देसाई (दादा) यांचे सोमवार दि. 0 ऑक्टोंबर,२०२2 रोजीचे वाढदिवसा निमित्त पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेना,युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे. मा. यशराज देसाई यांचे हस्ते सकाळी 9.30 वा एहसास मतीमंद मुलांची शाळा येथे खाऊ वाटप  करण्यात येणार असून, सकाळी 10.00 वा. दौलतनगर,ता.पाटण येथील निवासस्थानी आगमन होणार आहे. प्रथम दौलतनगर येथील श्री गणेश मंदिरात गणरायांचे दर्शन घेऊन,  मरळी गावचे ग्रामदैवत श्री निनाईदेवी मंदिर येथे निनाईदेवीचे दर्शन घेणार असून श्री. निनाईदेवी मंदीरामध्ये मरळी ग्रामस्थ मा. यशराज देसाई यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करणार आहेत.त्यानंतर ते कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब), स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधी व पुर्णाकृती पुतळयाचे दर्शन घेतल्यानंतर  ते कारखाना परिसरातील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे  पुर्णाकृती  पुतळयाचे दर्शन घेणार असून ते शिवविजय हॉल येथे वाढदिवसानिमित्त उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांचेकडून दुपारी 03 वाजेपर्यंत शुभेच्छा स्विकारणार आहेत. दुपारी 03.00 नंतर मा यशराज देसाई (दाद) हे कुटुंबियांसमवेत परगावी जाणार आहेत. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरीता येणा-या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ,हार न आणता पाटण विधानसभा मतदार संघातील गोर-गरीब कुटुंबातील शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशा शालेय वस्तू भेट म्हणून आणण्याचे आवाहनही शेवटी मा. यशराज देसाई (दादा) वाढदिवस नियोजन समितीचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.