दौलतनगर दि.15 :- लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यांस सन 2021-22
च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसबिलापोटी लोकनेते
बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी नुसार उर्वरित अंतिम रु. 215/- प्र.मे.टन प्रमाणे होणारी
रक्कम रु.572.95 लाख ऊस उत्पादक
शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने
गत सन 2021-22 च्या गळीत हंगामातील एफ.आर.पी.प्रमाणे
होणारी ऊसबिलाची संपूर्ण रक्कम अदा केली असल्याची माहिती
कारखान्याचे
चेअरमन मा.यशराज शंभूराज देसाई (दादा) यांनी
प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, दौलतनगर
ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2021-22 चे गळीत हंगामामध्ये 02 लाख 66 हजार 488 मे.टन इतके
ऊसाचे गाळप करुन 11.82% सरासरी साखर उताऱ्यांने 03 लाख 14
हजार 850 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सन 2021-22 च्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसबिलाची एफआरपीच्याप्रमाणे एकूण
रक्कम रु.7101.91 लाख इतकी होत असून
कारखान्याने यापूर्वी रु. 6528.96 लक्ष
रक्कम ऊस पुरवठादारांना अदा केली आहे. दरम्यान लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी
साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमप्रसंगी दिवाळीपूर्वी गत गळीत
हंगामातील उर्वरित एफ.आर.पी.ची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करणार असल्याचे
जाहिर केले होते. त्यानुसार आज रोजी गत गळीत हंगामातील उर्वरित अंतिम रु. 215/- प्र.मे.टन प्रमाणे होणारी रक्कम
रु.572.95 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करत
लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी पाटण तालुक्यातील तमाम ऊस उत्पादक सभासद व शेतकरी
यांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग
समुहाचे मार्गदर्शक,महाराष्ट्र राज्याचे
राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री नामदार शंभूराज
देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापन चांगल्या पध्दतीने नियोजन करत
दैनंदिन खर्चांमध्ये काटकसर करण्याचे धोरण राबविले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई
सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतक-यांचे हित डोळयांसमोर ठेऊन नामदार
शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने सन 2021-22 च्या
गळीत हंगामात कारखान्याला गळीतास आलेल्या ऊसाला एफआरपीच्या उर्वरित रक्कम ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खाती वर्ग केली असल्याचे सांगत सन 2021-22 च्या
गळीत हंगामामध्ये कारखान्याला गळीतास पुरविलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांशी संपर्क साधावा असे सांगत ते पुढे म्हणाले की,ऐन दिवाळीच्या सणाच्या
तोंडावर ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांना भासणारी आर्थिक निकड लक्षात घेऊन
शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत गत गळीत हंगामातील उर्वरित एफ.आर.पी.ची रक्कम
दिवाळीपूर्वी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग केली आहे. सन 2022-23 च्या गळीत
हंगामाची संपूर्ण तयारी करण्यात आली असून तोडणी वाहतूक यंत्रणा कारखान्यावर दाखल
होण्यास सुरुवातही झाली आहे.तसेच कारखान्याचे आधुनिकीकरणासह विस्तारीकरणाच्या
पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष ऊस गळीत हंगामास लवकरच सुरुवात होणार
आहे.त्यामुळे चालू गळीत हंगाम यशस्वी करण्याच्या उद्देशाने कारखाना
कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस
हा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास गळीतास देऊन गळीत हंगाम यशस्वी
करण्यासाठी सहकार्य करावे, असे
आवाहन चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांनी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.
No comments:
Post a Comment