Friday 28 October 2022

राज्य सरकार साखर कारखानदारीच्या पूर्णपुणे पाठीशी- पालकमंत्री ना.शंभूराज देसाई. लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचा 49 वा गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न.

            

दौलतनगर दि.7 :- राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालील सरकार हे शेतकऱ्यांचे हिताचेच निर्णय वेगाने घेत आहे. राज्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून अडचणीत असलेल्या बळीराजाला आवश्यक ते सर्व सहकार्य करणे ही या सरकारची भूमिका आहे.नुकतेच कमी गाळप क्षमता असलेल्या कारखान्यांचे विस्तारीकरणासाठी शासनाकडून भागभांडवल देण्याचा धोरणात्मक निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.यामध्ये आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा  समावेश असून कारखान्याचे विस्तारीकरणासाठी  सुमारे सोळा कोटींचे शासकीय भागभांडवल कारखान्यास मिळणार असल्याने राज्य सरकार साखर कारखानदारीच्या पुर्णपणे पाठीशी असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा  सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.

       ते दौलतनगर, ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०22-3 मधील 49 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. प्रतिवर्षाप्रमाणे कारखान्याचे श्री.हिंदूराव देसाई बनपूरी,भिमराव चव्हाण कुंभारगाव,शंकर माने खिलारवाडी,बबन कदम मारुलहवेली,सुरेश काटे चाफळ,संभाजी पाटील माजगाव,भाऊसाहेब भंडारे महाडीकवाडी नुने,उत्तम साळूंखे येराड, शामराव पवार मल्हारपेठ,अधिकराव देसाई विहे,सुभाष निकम ऊरुल या ज्येष्ठ 11 सभासदांचे शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा),चि.आदित्यराज देसाई यांचेसह व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे,मा.चेअरमन अशोकराव पाटील,संचालक शशिकांत निकम,बबनराव शिंदे,प्रशांत पाटील,भागोजी शेळके,शंकरराव पाटील,सोमनाथ खामकर,विजय सरगडे,सुनील पानस्कर, विजय सरगडे,संचालिका श्रीमती जयश्री कवर, सौ.दिपाली पाटील,विजय पवार,जालंदर पाटील,विजयराव मोरे,डी.एम.शेजवळ,संतोष गिरी,पांडूरंग शिरवाडकर,म विष्णू पवार,बबनराव भिसे,प्रकाशराव जाधव, विजयराव जंबुरे यांचेसह सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी कार्यकर्ते,कारखाना अधिकारी कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. तत्पूर्वी गळीत हंगाम शुभारंभानिमित्त कारखान्याचे संचालक सर्जेराव लक्ष्मण जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रुपाली सर्जेराव जाधव यांचे शुभहस्ते सत्यनारायण महापुजा संपन्न झाली.

               ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले,राज्यातीला सहकारी साखर उद्योग सध्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चालला असून सहकारी साखर कारखाने शंभर टक्के शासनाच्या नियमाचे पालन करूनच  कारखाने चालवावे लागतात . लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे कार्यक्षेत्र पाहिल्यानंतर निम्माहून अधिेक क्षेत्र हे डोंगंरी भागात आहे. सध्या  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राज्यातील सहकारी साखर कारखानदारीची वाटचाल सुरु आहे.कमीत कमी 2500 प्र..मे.टन प्रतिदिन गाळप क्षमता व एखादा उपपदार्थ निर्मिती प्रकल्प असणे ही आता काळाजी गरज झाली आहे.त्यामुळे आताचे सरकार हे ग्रामीण भागातील सहकार क्षेत्राला जास्तीत जास्त मदत होण्यासाठी प्रयत्नशील असून याबाबत मंत्रीमंडळ बैठकीमध्येही चर्चा झाली. सभासदांचे हित डोळयासमोर ठेऊन विशेषबाब म्हणून कमी क्षमतेच्या कारखान्यांना सरकारकडून शासकीय भागभांडवल मंजूर करत मदत करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये घेतला.तसेच नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष 50 हजार अनुदान जमा करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत शेती नुकसान भरपाईचे जे नियम होते त्यामध्ये बदल करुन,निकषात बदल करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली. ऐन दिवाळी सणामध्ये सर्व मंत्री व लोकप्रतिनिधी हे जिल्हा व तालुका प्रशासनासोबत परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामामध्ये व्यस्त होते असे सांगत ते पुढे म्हणाले की, ज्या विश्वासाने सभासदांनी हा कारखाना आपल्याकडे सोपवला आहे त्या सभासदांचे हित डोळयासमोर ठेऊन सर्वांच्या हातून चांगले काम होईल असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त करत सभासदांनी आपला पिकविलेला सर्व ऊस गळीतास देऊन हा  गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सर्वोत्परी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

                  कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) म्हणाले की, सध्या आपल्या कारखान्याचे पहिल्या टप्प्यातील विस्तारीकरणाचे काम पुर्ण झाले असून लवकरच प्रत्यक्ष गळीत हंगामाला सुरुवात होणार आहे.तर येणाऱ्या काळामध्ये विस्तारीकरणासह उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारणीचा मानस असल्याचे स्पष्ट करत केंद्र शासनाने निर्यातीचे धोरणात बदल करण्याची गरज असल्याचे सांगत राज्य शासनाने कमी गाळप क्षमता असलेल्या सहकारी साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढविण्यासाठी शासकीय भाग भांडवल देण्यास मंजूरी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस,सहकार मंत्री ना.अतुल सावे व मंत्रीमंडळाचे यांचे आभार मानले.

चौकट: आपला कारखाना राज्यामध्ये एक मॉडेल होईल असं आदर्शवत काम करा-ना.शंभूराज देसाई.

मरळी,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा डोंगरी व दुर्गम भागातील कमी क्षमतेचा कारखाना असून कारखान्याचे पहिल्या टप्प्याचे विस्तारीकरणाचे पहिल्या टप्प्याचे काम सध्या पुर्णत्वाकडे गेले आहे.तर कमी गाळप क्षमता असलेल्या कारखान्यांना शासकीय भागभांडवल देण्याचा जो निर्णय झाला त्यामध्येही आपल्या कारखान्याचा समावेश त्यामुळे आपला कारखाना राज्यामध्ये एक मॉडेल होईल असं आदर्शवत काम सर्व संचालक मंडळ,अधिकारी  व कर्मचारी यांचेकडून व्हावं ,अशी अपेक्षाही ना.शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment