दौलतनगर दि.07:- महाराष्ट्र राज्याचे राज्य
उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते,लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई (दादा) यांचा सोमवार दि.१0ऑक्टोंबर,२०२२ रोजीचा वाढदिवस पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये ना. शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेना,युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेवतीने साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान
वाढदिनी मा.यशराज देसाई (दादा) हे सकाळी 10 ते दुपारी 03.00 वा. पर्यंत दौलतनगर,ता.पाटण येथे
उपस्थित राहणार असून शिवविजय हॉल दौलतनगर येथे शुभेच्छा स्विकारणार आहेत. त्यानंतर
ते कुटुंबियांसमवेत परगावी जाणार असून वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ,हार न आणता
शालेय वस्तू आणण्याचे आवाहन मा. यशराज देसाई (दादा) वाढदिवस नियोजन समिती यांनी प्रसिध्दीपत्रकांत
केले आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस प्रतिवर्षी मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते, हितचिंतक यांचेकडून विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो. यंदाच्याही वर्षी मा.यशराज देसाई (दादा) यांचे सोमवार दि. १0 ऑक्टोंबर,२०२2 रोजीचे वाढदिवसा निमित्त पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेना,युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे. मा. यशराज देसाई यांचे हस्ते सकाळी 9.30 वा एहसास मतीमंद मुलांची शाळा येथे खाऊ वाटप करण्यात येणार असून, सकाळी 10.00 वा. दौलतनगर,ता.पाटण येथील निवासस्थानी आगमन होणार आहे. प्रथम दौलतनगर येथील श्री गणेश मंदिरात गणरायांचे दर्शन घेऊन, मरळी गावचे ग्रामदैवत श्री निनाईदेवी मंदिर येथे निनाईदेवीचे दर्शन घेणार असून श्री. निनाईदेवी मंदीरामध्ये मरळी ग्रामस्थ मा. यशराज देसाई यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करणार आहेत.त्यानंतर ते कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब), स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधी व पुर्णाकृती पुतळयाचे दर्शन घेतल्यानंतर ते कारखाना परिसरातील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयाचे दर्शन घेणार असून ते शिवविजय हॉल येथे वाढदिवसानिमित्त उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांचेकडून दुपारी 03 वाजेपर्यंत शुभेच्छा स्विकारणार आहेत. दुपारी 03.00 नंतर मा यशराज देसाई (दाद) हे कुटुंबियांसमवेत परगावी जाणार आहेत. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरीता येणा-या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ,हार न आणता पाटण विधानसभा मतदार संघातील गोर-गरीब कुटुंबातील शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशा शालेय वस्तू भेट म्हणून आणण्याचे आवाहनही शेवटी मा. यशराज देसाई (दादा) वाढदिवस नियोजन समितीचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment