दौलतनगर दि.22: पाटण विधानसभा मतदारसंघातील
दळण वळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेलया राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या
रस्त्यांचे पुनर्बांधणीचे कामासाठी निधी मंजूर होणेकरीता राज्य उत्पादन शुल्कमंत्री
तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री
ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र
चव्हाण यांचेकडे शिफारस केली होती.सध्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये
पुरवणी अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांच्या
कामांसाठी सुमारे 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून पाटण येथील 100 खाटांचे उपजिल्हा
रुग्णालयाच्या बांधकामासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरीता 05 कोटी रुपयांची तरतूदही राज्याचे पुरवणी अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याची
माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली
आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले की, पाटण विधानसभा मतदारसंघातील
दळण वळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेलया राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या
रस्त्यांचे मोठे प्रमाणांत नुकसान झाले होते.त्यामुळे या रस्त्यांवरुन प्रवास करताना अनेक अडचणी येत होत्या. या राज्य
मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांचे पुनर्बांधणीचे कामासाठी निधी मंजूर
होणेकरीता राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज
देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस
व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचेकडे शिफारस केली होती. त्यानुसार
पाटण विधानसभा मतदारसंघातील डिचोली नवजा हेळवाक मोरगिरी
साजूर तांबवे विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता रामा 148 कि.मी.0/00 ते 9/00
भाग डिचोली ते कामरगाव ची सुधारणा करणे 04 कोटी 50 लाख,प्रजिमा 53 ते चोपडी बेलवडे
खु. सुळेवाडी सोनवडे हुंबरवाडी नाटोशी धावडे रस्ता प्रजिमा 124 कि.मी. 0/00 ते
19/00 भाग कि.मी.2/00 ते 2/900, 3/00 ते 4/00 मधील रस्त्याची भूसंपादनासह सुधारणा
करणे 04 कोटी 50 लाख, प्रजिमा 61 साकुर्डी बेलदरे तळबीड शहापूर रस्ता भाग बेलदरे
ते तळबीड रस्ता किमी 1/500 ते 5/00 ची सुधारणा करणे ता.कराड 02 कोटी या कामांना सध्या
नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा
मतदारसंघातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा
मार्ग असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी एकूण 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.तसेच
पाटण येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरीता
05 कोटी रुपयांची तरतूदही राज्याचे पुरवणी
अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याच्या पुरवणी
अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया तातडीने करण्याच्या
सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या असून निविदा प्रक्रिया
झाल्यानंतर तातडीने मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती
प्रसिध्दीपत्रकां देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment