दौलतनगर दि.24: पाटण विधानसभा मतदारसंघातील दळण वळणाच्या दृष्टीने
महत्वाच्या असलेलया राज्य मार्ग 148 नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे रस्त्यांचे
पुनर्बांधणीचे कामासाठी निधी मंजूर होणेकरीता राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा
व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केंद्रीय रस्ते
वाहतूक आणि परिवहन मंत्री
ना. नितीनजी गडकरी यांचेकडे
पाठपुरावा करुन सन 2022-23 चे आर्थिक
वर्षात केंद्रीय मार्ग निधी
(सी.आर.एफ.) मधून
25 कोटी
रुपायांचा
निधी
मंजूर झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे
राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे
कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.
पत्रकात पुढे म्हणाले की, पाटण विधानसभा मतदारसंघातील गुहाघर चिपळूण कराड जत विजापूर या राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी रस्ता म्हणून नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे काले विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता या रस्त्याला राज्य मार्गाचा दर्जा मिळणेसाठी ना. शंभूराज देसाईंनी सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे काले विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता 148 क्रमांकाचा राज्य मार्गाचा दर्जा देण्यात आला. सध्या हेळवाक मोरगिरी ते गारवडे या रस्त्यावर मोठया प्रमाणांत वाहनांची ये-जा सुरु असते.माहे जुलै 2021 महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या राज्य मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली होती या मार्गावरुन प्रवास करताना वाहनधारकांसह प्रवाशांची दळण-वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने या राज्य मार्गावरील
हेळवाक ते मोरगिरी ते गारवडे
या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ.) योजनेतून भरीव निधी मंजूर करावा,अशी मागणी केंद्रीय रस्ते
वाहतूक आणि महामार्ग मंत्री
ना.नितीन गडकरी यांचेकडे केली होती. या
मागणीनुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी
मार्ग असलेल्या राज्य मार्ग 148 नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे कोळे विंग
वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता कि.मी.32/500 ते 62/500 ची सुधारणा करण्यासाठी भारत
सरकारचे केंद्रीय मार्ग निधी(सी.आर.एफ.) मधून 25 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय
रस्ते वाहतूक आणि महामार्ग
मंत्री ना.नितीनजी गडकरी यांनी मंजूर केला असून कुसवडे ते तालुका हद्दीपर्यंतच्या
30 कि.मी.लांबीमध्ये संपूर्ण रस्ता साडेसात मीटरने डांबरीकरणासह पूर्ण करण्यात येणार असून या कामामध्ये
आवश्यक तेथे 10 छोटे पूल व 04 मोठे पूल बांधले जाणार आहेत.तसेच या राज्य मार्गावरील
लेंढोरी,काढोली,किल्ले मोरगिरी, मान्याचीवाडी, शिंदेवाडी व सुळेवाडी या गावांचे हद्दीतील
रस्त्याच्या दुतर्फा आर.सी.सी.गटराचे बांधकाम केले जाणार आहे.त्याचबरोबर छेद रस्त्यांची कामेही
करण्यात येणार असल्याने या राज्य मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांचेकडे
या राज्य
मार्गाचे मजबुती करण्यासाठी केंद्रीय मार्ग निधी
(सी.आर.एफ.)मधून
निधी मंजूर होणेकरीता सातत्याने
केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले
असल्याचे सांगत लवकरच या कामाची
निविदा प्रक्रिया करण्यात येऊन
तातडीने राज्य मार्गाच्या दुरुस्तीचे
काम हाती घेण्यात यावे,अशा
सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या
अधिकाऱ्यांना केल्या असून या रस्त्याच्या
कामांस आवश्यक असणारा निधी
तातडीने मंजुर करुन दिलेबद्दल
ना. शंभूराज देसाई यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक
आणि परिवहन मंत्री ना.
नितीनजी गडकरी यांचे विशेष
आभार मानले असल्याचेही त्यांनी
शेवटी पत्रकात म्हंटले
आहे.
No comments:
Post a Comment