दौलतनगर दि.12: लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन 2022-23
चा गळीत हंगाम राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार
शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने यशस्वीपणे चालू केला असून गळीतास येणाऱ्या ऊसाला 2800
रु.प्र.मे.टन ऊस दर जाहिर करण्यात आला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना ऊसबिलापोटी पहिला हप्ता प्र.
मे.टन 2500 रुपयांप्रमाणे रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर लवकरच वर्ग केली जाणार
असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली
आहे.
पत्रकात पुढे म्हंटले आहे की, लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन
शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने
आर्थिक नियोजन करुन पहिल्या टप्प्यातील विस्तारवाढ चालू गळीत हंगामापुर्वी केली
असून, दुस-या टप्प्याचे काम ही चालू गळीत हंगाम समाप्त झाल्यानंतर करणार आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतक-यांचे
हित डोळयांसमोर ठेऊन सन 2022-23 गळीत
हंगाममध्ये कारखान्यास गळीतास आलेल्या ऊसाला 2800 रु.प्र.मे.टन दर जाहिर करण्यात
आला आहे. तसेच आतापर्यंत कारखान्यास गळीतास आलेल्या ऊसापोटी 2500 रु.प्र.मे.टन
प्रमाणे पहिल्या हपत्याची होणारी रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करणार
असल्याचे सांगत पुढे म्हणाले की, सध्या सर्वत्र ऊस गळीत हंगाम सुरु असून आपले
कारखान्याचे पहिल्या टप्प्यातील गाळप क्षमता वाढविण्याचे काम पुर्णत्वाकडे
गेल्यानंतर गळीत हंगाम सुरु केला आहे. आपले लोकनेते बाळासाहेब देसाई
सहकारी साखर कारखान्याने सन 2022-23 चे गळीत हंगामामध्ये आज पर्यंत 44 हजार 110 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 44 हजार 750 क्विंटल साखर उत्पादन केले
आहे.जिल्हयासह
राज्यात सर्वच कारखान्यांकडे ऊस तोडणी
मजूरांची कमतरता असून देखील राज्य उत्पादन
शुल्कमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने सन 2022-23
च्या गळीत हंगामा यशस्वीपणे चालवला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी
यांनी आपला पिकविलेला सर्व ऊस आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर
कारखान्यास गळीतास घालून सन 2022-23 चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी
सहकार्य करावे असे आवाहनही शेवटी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.
No comments:
Post a Comment