दौलतनगर दि.09:- पाटण विधानसभा
मतदारसंघातील ९० ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीपैकी १६ ग्रामपंचायतींमध्ये
निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय तेथील ग्रामस्थांनी घेतला. त्यातील १३
ग्रामपंचायतींमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा भगवा झेंडा फडकला आहे. तसेच इतर
५ ग्रामपंचायतींमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांची सरपंचपदी
बिनविरोध निवड झाली आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये मिळून बाळासाहेबांच्या
शिवसेनेचे तब्बल १६१ सदस्य आणि १८ सरपंच बिनविरोध निवडून आले. सुजाण नागरिक नेहमीच
विकासाच्या राजकारणाला पाठिंबा देतात. पाटणच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही करत
असलेल्या प्रयत्नांकडे पाहून पाटणवासीयांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला बळ
देण्याचे ठरवले आहे याचा आनंद आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला पाटणवासीयांनी
दिलेले हे यश जनसेवेसाठी ऊर्जा देणारे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे
राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.
दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते
बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील ९०
ग्रामपंचायतींपैकी बाळासाहेबांची शिवसेना
पक्षाचे नेतृत्व मानत बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीमधील सरपंच व नवनिर्वाचित
सदस्य यांचे सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत
होते. यावेळी या सत्कार समारंभास आमदार श्री.
शहाजीबापू पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व युवा
नेते मा. यशराज(दादा) देसाई, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सातारा जिल्हाप्रमुख
मा. जयवंतराव शेलार,बबनराव शिंदे,विजय पवार,प्रदिप पाटील,राजाराम पाटील,भरत
साळूंखे,विजय पवार,विजय शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते
मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आमदार शहाजीबापू पाटील, वैद्यकीय सहायता मदत
निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना ना.देसाई पुढे
म्हणाले की, सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये मोठया संख्येने सरपंच
व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडूण आले.बिनविरोध झालेल्या 16
ग्रामपंचायतींपैकी 13 ग्रामपंचायतीमध्ये आपल्या बाळासाहेबांच्या
शिवसेना पक्षाची सत्ता आली.ग्रामस्थांनी विकास कामांकडे बघूनच ग्रामपंचायती
निवडणुकीमध्ये आपला निर्णय घेतला पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
ना.एकनाथजी शिंदे यांचे नेतृत्वाखालील सरकारमध्ये सातारा जिल्हयाचा पालकमंत्री
म्हणून काम करत असताना सातारा जिल्हयासह आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध
विकास कामांसाठी नेहमीच झुकते माप दिले आहे. सातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांत
रस्ते, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.
मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीत याबाबत नुकतीच वरिष्ठ
अधिकाऱ्यांसह बैठक संपन्न झाली. या बैठकीत डोंगरी तालुक्यांतील नागरी सुविधांचा
आढावा घेऊन त्यासंदर्भातील विकासकामांसाठी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे
साहेबांनी १०० कोटी रुपयांचा निधी मंजुर केला असल्याचे सांगते ते पुढे म्हणाले की
कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर व मंत्रालयीन कामकाजामुळे मतदारसंघामध्ये वेळ
देण्यासाठी मर्यादा पडत आहेत. असे असले तरी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करताना
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांना गावच्या विकासासाठी
दिलेला प्रत्येक शब्द हा माझ्यावतीने दिला गेला आहे. गावांच्या विकासासाठीचे
प्रत्येक आश्वासन पूर्ण केले जाईल, असा विश्वास ना. शंभूराज देसाई यांनी यावेळी
व्यक्त केला.
चौकट:- सर्वांगिण विकासासाठी ना.शंभूराज
देसाई यांचे नेतृत्वाची मतदारसंघाला गरज-आमदार शहाजीबापू पाटील
मी स्वत: खुप नशिबवान आहे कारण मला ना.शंभूराज देसाई यांचे बरोबर काम करण्याची
संधी मिळाली. पाटण तालुक्याला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे विचारांचा वारसा असून
पाटण तालुका महाराष्ट्राच्या नकाशावर नेण्याचे काम लोकनेते यांनी केले.त्यांचा वारसा
आज ना.शंभूराज देसाई हे राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री व पालकमंत्री म्हणून समर्थपणे
पार पाडत असल्याचा अभिमान वाटतो. तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर ना.शंभूराज
देसाई यांचे नेतृत्वाची मतदार संघाला गरज असून त्यांच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे राहून पाठबळ देण्याचे आवाहन यावेळी
आमदार शहाजीबापू पाटील यांनी उपस्थितांना केले.
No comments:
Post a Comment