Wednesday 31 May 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून सणबूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीसाठी निधी मंजूर.राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत सणबूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत व अधिकारी कर्मचारी निवासाचे बांधकामसाठी निधीची तरतूद.

दौलतनगर दि.31:- पाटण विधानसभा मतदारसंघातील ढेबेवाडी विभागातील डोंगर पठारावरील गावांची मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या सणबूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व अधिकारी,कर्मचारी यांचे निवासी इमारतीचे बांधकामाकरीता निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरीव निधी मंजूर होण्यासाठी  सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सणबूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्य इमारत व अधिकारी,कर्मचारी निवास स्थान इमारतीचे बांधकाम करण्यासाठी निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

                प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण तालुका हा डोंगरी व दुर्गम भागामध्ये वसलेला असून तालुक्यातील नागरीकांना वेळेत व चांगल्या आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन या ठिकाणी 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करुन या रुग्णालयाच्या कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली असून लवकरच पाटण येथील उपजिल्हा रुग्णालयाचे इमारतीचे बांधकाम करण्याचे कामांस सुरुवात होणार आहे.तसेच ढेबेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन होऊन या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले.दरम्यान ढेबेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे सणबूर या ठिकाणी मंजूर केले होते. परंतु या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राकरीता इमारत नव्हती. ढेबेवाडी विभागातील सणबूर हे गाव या विभागातील डोंगर पठारावरील गावांचे मध्यवर्ती असे ठिकाण असून या ठिकाणी या विभागातील डोंगर पठारावरील नागरीकांची मोठया प्रमाणांत ये-जा असते.परंतु सणबूर या मध्यवर्ती  ठिकाणी  विभागातील नागरीकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत नसल्याने येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होती.दरम्यान सणबूरसह या विभागातील डोंगर पठारावरील ग्रामस्थांची आरोग्याच्या दृष्टीने होणारी गैरसोय लक्षात घेऊन  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे सणबूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र  इमारत व अधिकारी,कर्मचारी निवासाचे इमारतीचे बांधकाम करण्यासाठी भरीव निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी केलेली होती. या विभागातील ग्रामस्थांच्या सातत्याने होत असलेल्या मागणीचा विचार करुन पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सणबूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत व अधिकारी,कर्मचारी निवास इमारतीचे बांधकामासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत तातडीने निधी मंजूर होण्यासाठी पत्रव्यवहार करत सातत्याने यासाठी पाठपुरावा सुरु होता.त्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सणबूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत व अधिकारी कर्मचारी निवासस्थान इमारतीचे बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे.यामध्ये सणबूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य इमारतीचे बांधकाम,अधिकारी व कर्मचारी यांचे निवासी इमारत,पाणी पुरवठा,फर्निचर,इलेक्ट्रिक काम,रेन हार्वेस्टींग,अग्निशामक यंत्रणा,बाग-बगीचा सुशोभिकरण व जमिन सपाटीकरण,सौलर सिस्टीम,संरक्षक भिंत यासह सुसज्ज अशी  मुख्य इमारत व अधिकारी,कर्मचारी निवासीचे इमारतीचे बांधकाम होणार आहे.सणबूर येथे नव्याने होणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व अधिकारी व कर्मचारी निवासी इमारतीमुळे या विभागातील नागरिकांची आरोग्याची चांगली सुविधा पुरविण्यास मदत होणार असल्याने सणबूरसह या विभागातील ग्रामस्थांनी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे आभार मानले असल्यासचे शेवटी पत्रकांत नमूद केले आहे.

Tuesday 30 May 2023

आबदारवाडी गावातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई. ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते नविन ग्रामपंचायत कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न.

दौलतनगर दि.30:- महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय योजना गावपातळीवर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचे संकल्पनेतून राज्य शासनाने शासन आपल्या दारी हा उपक्रम सध्या सर्वत्र राबविण्यात येत असून या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ नुकताच मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे शुभहस्ते दौलतनगर येथे पार पडला. ग्रामीण भागातील विविध विकास कामांसाठी सध्या राज्य शासनाकडून भरीव अशी आर्थिक तरतुद करण्यात येत असून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशिल आहे.आज उद्घाटन झालेल्या आबदारवाडी गावच्या नविन ग्रामपंचायत कार्यालयाचे इमारतीचे कामासाठी निधी मंजूर करण्यात आला.आज या इमारतीचा लोकार्पण सोहळा होत असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी व पदाधिकारी यांनी मागणी केलेल्या विकास कामांना प्राधान्याने निधी मंजूर करण्यात आला असून या पुढील काळामध्ये आबदारवाडी गावातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी दिली.

           ते आबदारवाडी,ता.पाटण येथे राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानतून  मंजूर झालेल्या नविन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन व पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार कार्यक्रप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जयवंतराव शेलार,विजय पवार,सुरेश पानस्कर,शशिकांत निकम,संग्राम मोकाशी,पांडूरंग नलवडे,विजय जंबुरे,अशोक डिगे,सुनिल पानस्कर, सुनिल पवार,शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे,उद्योजक के.आर.शिंदे,सागर नलवडे,भरत साळूंखे यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

           यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने राज्य शासनाच्या विविध योजना गाव पातळीवर प्रभावीपणे राबविण्यासाठी जनजागृतीसह प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी शासना आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ केला आहे.तसेच राज्य शासनाकडून ग्रामीण भागातील विविध विकास कामांसाठी भरीव तरतुद करण्यात येत आहे.आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघाचा विचार करता राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील विविध नागरी सुविधांच्या कामांसाठी  भरीव निधी मंजूर करण्यात आला असल्याने ग्रामीण भागाचा विकासाला हातभार लागत आहे.गावामध्ये विकासाची कामे राबविताना येथील स्थानिक ग्रामस्थांचा लोकसहभाग ही महत्त्वाचा असून आबदारवाडी गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत उभारणीसाठी श्रमदान केले ही बाब नक्कीच कौतुकास्पद असून इतरांना ती आदर्शवत अशीच आहे.त्याचबरोबर ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विशेषत: महिला भगिनींसाठी वेगळ वेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. पाटण विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातील गावा-गावांतील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्याचा नेहमीच प्रयत्न असून आबदारवाडी गावातील ग्रामस्थांनी ज्या-ज्या विकास कामांना निधी मंजूर करण्याची मागणी केली त्या विकास कामांना आता पर्यंत निधी मंजूर करण्यात आला असून गावामध्ये आतापर्यंत तीन कोटींच्या वर विकास कामे मार्गी लागली आहेत.ग्रामपंचायत स्थापनेपासून गेली 55 वर्षे या ग्रामपंचायतीवर आपली सत्ता असून संपूर्ण गाव हे पहिल्यापासून देसाई कुटुंबाबरोबर राहिले आहे. त्यामुळे यापुढील काळातही  आबदारवाडी गावातील विविध विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली त्यामुळे या पुढील काळातही अशीच आपल्या आबदारवाडी गावातील ग्रामस्थांची एकी कायम रहावी असे शेवटी सांगीतले.दरम्यान आबदारवाडी गावचे सरपंच व शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी प्रास्ताविकपर भाषणांत गावातील विकास कामांची व ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानाबाबतची माहिती दिली.दरम्यान नामदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते आबदारवाडी येथील दिपक नानासो शिंदे, प्रकाश दादू शिंदे, अंकुश रामचंद्र शिंदे, हेमंत आनंदा गायकवाड, बापूराव यशवंत गायकवाड, शिवाजी बाळू जाधव यांनी शिवसेना पक्षामध्ये जाहिर प्रवेश केलेल्यांचा शाल व श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. 

Saturday 20 May 2023

कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्तीमुळे शिक्षण घेऊन मुली स्वावलंबी होण्यास मदत.पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ६4 वी पुण्यतिथी व शिष्यवृत्ती वितरण असा संयुक्त कार्यक्रम संपन्न.

दौलतनगर दि.23:- पाटण मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील गरजू मुली शिक्षणापासून वंचित राहून नये म्हणून पाटण विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील गरजू मुलींच्या शिक्षणाला आपला हातभार लागावा याकरीता स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने शिष्यवृत्ती योजना सुरु केली. ही शिष्यवृत्ती योजना एक आदर्शवत व गरीब कुटुंबातील मुलींना प्रेरणादायी ठरत आहे. पाटण मतदारसंघातील एकूण १95 गरजू मुलींना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ झाला आहे.कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना गरजू मुलींकरीता एक आधार म्हणून काम करीत असून या शिष्यवृत्तीमुळे शिक्षण घेऊन मुली स्वावलंबी होण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन नामदार शंभूराज देसाईंनी  कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे ६4 व्या पुण्यस्मरण कार्यक्रमात केले.

 महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ६4 वी पुण्यतिथी कार्यक्रम व पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजीत कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती कार्यक्रमात राज्य उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराज देसाई बोलत होते.याप्रसंगी कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई, मा.चेअरमन अशोकराव पाटील,डॉ.दिलीपराव चव्हाण,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, विजय पवार,जालंदर पाटील,संतोष गिरी,सुरेश पानस्कर,शिवदौलत बँक चेअरमन संजय देशमुख, मा.चेअरमन मिलींद पाटील,शशिकांत निकम,कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे,राजेंद्र पाटील,सुधाकर देसाई,नितीन यादव,धनाजी गुजर,पंजाबराव देसाई,भरत साळूंखे,अभिजित पाटील,पांडूरंग शिरवाडकर,विजय शिंदे या प्रमुख पदाधिकाऱ्यासंह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते,जिल्हा परीषद,पंचायत समिती सदस्य,पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक,शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीनी व पालक यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना नामदार शंभूराज देसाई म्हणाले, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई व कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे आर्शिवाद आपल्या पाठीशी आहेत. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू मुलींच्या शिक्षणाकरीता एक शिष्यवृत्ती योजना सुरु करावी आणि या शिष्यवृत्ती योजनेचे वितरण कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यस्मरण कार्यक्रमात करावे अशी कल्पना सन २०१२ मध्ये मांडली. स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टमार्फत आपण ही शिष्यवृत्ती सुरु करण्याचा निर्णय घेतला. कै.सौ.ताईसाहेब यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांना अडचणीच्या काळात मोलाची साथ केली. हालाकीच्या परिस्थितीत कष्टातून दिवस काढून मुलांना घडविण्याचे त्यांनी कार्य केले. आज त्यांचा आदर्श डोळयासमोर ठेवणे गरजेचे असून बिकट परिस्थितीमध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिक्षण घेतल्याशिवाय आपण आपल कर्तृत्व सिध्द करु शकत नाही. त्यामुळे समाजातील गरीब कुटुंबातील मुली आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आल्याने या गरीब कुटुंबातील मुली शिक्षणापासून वंचित राहून नये हा या शिष्यवृत्ती देण्या मागचा उद्देश आहे. आतापर्यंत मतदारसंघातील १95 गरजू मुंलीना आपण ही शिष्यवृत्ती दिली आहे.या योजनेमुळे मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी प्रेरणा मिळत आहे.गत दोन वर्षामध्ये कोविडचा संसर्ग असल्याने शिष्यवृत्ती वितरणाचा कार्यक्रम झाला नाही. आज आपण या शिष्यवृत्तीचे वितरणाबरोबर विद्यार्थीनींना शालेय साहित्याचे वाटप करत आहे.तालुक्यामध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देत असून शैक्षणिक सुविधांचा चांगला लाभ घेणे गरजेचे आहे.त्यामुळे मुलींनीही चांगले शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे.त्यामुळे या कै.सौ. वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे शिष्यवृत्तीचे माध्यमातून भविष्यामध्ये चांगले शिक्षण घेऊन मुली स्वावलंबी होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगीतले. प्रास्ताविक व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे तर आभार बबनराव शिंदे यांनी मानले.

चौकट: पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या तालुक्यातील युवक युवतींचा झाला सत्कार.

पाटण तालुक्यातील युवक व युवतींना स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये अद्यावत असे स्टडी सेंटर उभारले असून या स्टडी सेंटरमध्ये अनेक विद्यार्थी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत आहेत.राज्य शासनाने नुकतीच गृह विभागामध्ये घेतलेल्या भरती प्रक्रियेमध्ये पाटण तालुक्यातील अनेक युवक युवती हया पात्र झाल्या असून यामध्ये शताब्दी स्मारकामधील स्टडी सेंटर मध्ये अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.तसेच मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी भूकंपग्रस्त दाखल्याच्या व्याख्येमध्ये बदल केल्याने याचाही लाभ या पोलीस भरतीमध्ये तालुक्यातील अनेक तरुण तरुणांना होऊन या भरती प्रक्रियेमध्ये पाटण तालुक्यातील युवक युवतीची संख्या जास्त आहे.दरम्यान पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या युवक युवतींचा ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते सत्कारही यावेळी करण्यात आला.

Thursday 18 May 2023

दौलतनगर,ता.पाटण येथे दि.२० मे रोजी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची 64 वी पुण्यतिथी. मंत्री ना.शंभूराज देसाई यांची राहणार प्रमुख उपस्थिती.

दौलतनगर दि.१८:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची 64 वी पुण्यतिथी शनिवार दि.२० मे, २०२3 रोजी सकाळी १०.०० वा. महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात येणार आहे.प्रतिवर्षाप्रमाणे कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथीनिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू मुलींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणेकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने सुरु असलेल्या शिष्यवृत्तीचे वितरण पालकमंत्री ना.शंभूराज  देसाई यांचे शुभहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी दि.२० मे रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने साजरा करण्यात येते. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटण मतदारसंघातील गरीब व गरजू मुलींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील 179 हुन अधिक मुलींना प्रत्येकी 5०० रुपयेप्रमाणे पदवी पर्यंतच्या शिक्षणाकरीता शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. गरजू कुटुंबातील मुलींना शिक्षणाकरीता हातभार लागावा याकरीता या शिष्यवृत्तीबरोबर वहया,शालेय गरजांच्या साहित्याचे वितरणही करण्यात येते. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची यंदाच्या वर्षीची 64 वी पुण्यतिथी शनिवार दि. २० मे २०२3 रोजी सकाळी १०.०० वाजता महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देर्स(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याचे शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.

Monday 8 May 2023

मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते शासन आपल्या दारी योजनेचा सातारा जिल्हयात शनिवारी दौलतनगर येथे शुभारंभ. शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत 25000 पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष मिळणार लाभ.

  दौलतनगर दि.08:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे संकल्पनेतून राज्य शासनाचेवतीने सध्या सर्वत्र शासन आपल्या दारी ही योजना राबविण्यात येत आहे.राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्हयात शासन आपल्या दारी या योजनेचा राज्यस्तरीय  शुभारंभ हा राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई व इतर सन्माननीय मंत्री महोदय यांचे प्रमुख उपस्थितीत शनिवार दि. 13 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता दौलतनगर,ता.पाटण येथे होणार असून याप्रसंगी शासन आपल्या दारी योजने अंतर्गत पाटण तालुक्यातील 25000  लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ देणारा मेळावा व जाहिर सभाही होणार असल्याची माहिती  राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

 प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे संकल्पनेतून राज्य शासनाचेवतीने सध्या सर्वत्र शासन आपल्या दारी ही योजना संपूर्ण राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.या योजनेमध्ये बळीराजाच्या उन्नतीसाठीच्या योजना,महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना,सीमांत शेतकरी गट बांधणी योजना,केंद्र पुरुस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना,पीक कर्ज योजना,मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना,पशुसंवर्धन योजना,मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम,प्रधानमंत्री स्वनिधी योजना,प्रधानमंत्री मुद्रा योजना,प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना,मुख्यमंत्री सहायता निधी योजना,सामाजिक न्यायामध्ये संजय गांधी निराधार योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती योजना,अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे योजना,अपंग मुदत कर्ज योजना,शैक्षणिक कर्ज योजना,सुक्ष्म वित्त पुरवठा योजना,थेट कर्ज योजना,पंडीत दिन दयाळ उपाध्याय घरकूल खरेदी करीता येाजना,प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण),बांधकाम कामगार योजना,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना,कलाकारांसाठी योजना,महिलांसाठीच्या योजना यामध्ये किशोरी सबला योजना,महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन जोती योजना,घरगुती कामगारांसाठी कामगार योजना,प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना,बेबी केअर किट योजना,मोफत शिलाई मशीन योजना,मच्छीमार बांधवांसाठी योजना यामध्ये किसना क्रेडीट कार्ड योजना,अवरुध्द पाण्यात मत्स्यसंवर्धन योजना,मासेमार संकट निधी निवारण योजना,मासेमार खरेदीच्या साधनांवर अर्थसहाय योजना,ऊस तोड कामगार नोंदणी,आदिवासी प्रवर्गामध्ये शिक्षणासाठी योजना,आदिवासी सबलीकरण योजना महा रोजगार मेळावा,महाआरोग्य शिबीर, चष्मे वाटप,दिव्यांगाना साहित्य वाटप,या विविध शासकीय विभागामधील योजनांचा शासन आपल्या दारी या योजनेमध्ये समावेश आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्हयात शासन आपल्या दारी या योजनेचा राज्यस्तरीय  शुभारंभ हा राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई व इतर सन्माननीय मंत्री महोदय यांचे प्रमुख उपस्थितीत होणार असून शासन  आपल्या दारी योजने अंतर्गत पात्र 25000  लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ देणारा मेळावा व जाहिर सभा शनिवार दि. 13 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता दौलतनगर,ता.पाटण येथे होणारअसून या विविध योजनांमधील वैयक्तिक व सामुहिक लाभार्थ्यांना लाभवस्तू व प्रमाणपत्र वाटप महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते शनिवार दि. 13 मे 2023 रोजी करण्यात येणार आहे.तरी  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे संकल्पनेतून राज्य शासनाचेवतीने राबविण्यात येत असलेल्या  शासन आपल्या दारी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन शनिवार दौलतनगर ता.पाटण येथे आयोजित मेळयास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शेवटी पत्रकांत केले आहे.

 चौकट: बेराजगार युवक युवतींसाठी महारोजगार मेळावा व मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे संकल्पनेतून राज्य शासनाचेवतीने सध्या सर्वत्र शासन आपल्या दारी या योजनेच्या सातारा जिल्हयातील शुभारंभप्रसंगी बेरोजगार युवक व युवतींसाठी पंडीत दिन दयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून या मेळाव्याकरीता नामांकित कंपन्यांचा सहभाग असून बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याने बेरोजगार युवक व युवतींनी याचा लाभ घ्यावा.तसेच मोफत सर्वरोग निदान शिबीराचेही आयोजन केले असून या आरोग्य शिबीरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची आवश्यक ती तपासणी करुन त्यांना वैद्यकीय औषधोपचार करण्यात येणार असल्याने याचाही लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा.