Monday 8 May 2023

मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते शासन आपल्या दारी योजनेचा सातारा जिल्हयात शनिवारी दौलतनगर येथे शुभारंभ. शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत 25000 पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष मिळणार लाभ.


  दौलतनगर दि.08:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे संकल्पनेतून राज्य शासनाचेवतीने सध्या सर्वत्र शासन आपल्या दारी ही योजना राबविण्यात येत आहे.राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्हयात शासन आपल्या दारी या योजनेचा राज्यस्तरीय  शुभारंभ हा राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई व इतर सन्माननीय मंत्री महोदय यांचे प्रमुख उपस्थितीत शनिवार दि. 13 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता दौलतनगर,ता.पाटण येथे होणार असून याप्रसंगी शासन आपल्या दारी योजने अंतर्गत पाटण तालुक्यातील 25000  लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ देणारा मेळावा व जाहिर सभाही होणार असल्याची माहिती  राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

 प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे संकल्पनेतून राज्य शासनाचेवतीने सध्या सर्वत्र शासन आपल्या दारी ही योजना संपूर्ण राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.या योजनेमध्ये बळीराजाच्या उन्नतीसाठीच्या योजना,महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना,सीमांत शेतकरी गट बांधणी योजना,केंद्र पुरुस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना,पीक कर्ज योजना,मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना,पशुसंवर्धन योजना,मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम,प्रधानमंत्री स्वनिधी योजना,प्रधानमंत्री मुद्रा योजना,प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना,मुख्यमंत्री सहायता निधी योजना,सामाजिक न्यायामध्ये संजय गांधी निराधार योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती योजना,अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे योजना,अपंग मुदत कर्ज योजना,शैक्षणिक कर्ज योजना,सुक्ष्म वित्त पुरवठा योजना,थेट कर्ज योजना,पंडीत दिन दयाळ उपाध्याय घरकूल खरेदी करीता येाजना,प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण),बांधकाम कामगार योजना,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना,कलाकारांसाठी योजना,महिलांसाठीच्या योजना यामध्ये किशोरी सबला योजना,महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन जोती योजना,घरगुती कामगारांसाठी कामगार योजना,प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना,बेबी केअर किट योजना,मोफत शिलाई मशीन योजना,मच्छीमार बांधवांसाठी योजना यामध्ये किसना क्रेडीट कार्ड योजना,अवरुध्द पाण्यात मत्स्यसंवर्धन योजना,मासेमार संकट निधी निवारण योजना,मासेमार खरेदीच्या साधनांवर अर्थसहाय योजना,ऊस तोड कामगार नोंदणी,आदिवासी प्रवर्गामध्ये शिक्षणासाठी योजना,आदिवासी सबलीकरण योजना महा रोजगार मेळावा,महाआरोग्य शिबीर, चष्मे वाटप,दिव्यांगाना साहित्य वाटप,या विविध शासकीय विभागामधील योजनांचा शासन आपल्या दारी या योजनेमध्ये समावेश आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्हयात शासन आपल्या दारी या योजनेचा राज्यस्तरीय  शुभारंभ हा राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई व इतर सन्माननीय मंत्री महोदय यांचे प्रमुख उपस्थितीत होणार असून शासन  आपल्या दारी योजने अंतर्गत पात्र 25000  लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ देणारा मेळावा व जाहिर सभा शनिवार दि. 13 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता दौलतनगर,ता.पाटण येथे होणारअसून या विविध योजनांमधील वैयक्तिक व सामुहिक लाभार्थ्यांना लाभवस्तू व प्रमाणपत्र वाटप महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते शनिवार दि. 13 मे 2023 रोजी करण्यात येणार आहे.तरी  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे संकल्पनेतून राज्य शासनाचेवतीने राबविण्यात येत असलेल्या  शासन आपल्या दारी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन शनिवार दौलतनगर ता.पाटण येथे आयोजित मेळयास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शेवटी पत्रकांत केले आहे.

 चौकट: बेराजगार युवक युवतींसाठी महारोजगार मेळावा व मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे संकल्पनेतून राज्य शासनाचेवतीने सध्या सर्वत्र शासन आपल्या दारी या योजनेच्या सातारा जिल्हयातील शुभारंभप्रसंगी बेरोजगार युवक व युवतींसाठी पंडीत दिन दयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून या मेळाव्याकरीता नामांकित कंपन्यांचा सहभाग असून बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याने बेरोजगार युवक व युवतींनी याचा लाभ घ्यावा.तसेच मोफत सर्वरोग निदान शिबीराचेही आयोजन केले असून या आरोग्य शिबीरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची आवश्यक ती तपासणी करुन त्यांना वैद्यकीय औषधोपचार करण्यात येणार असल्याने याचाही लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा.


No comments:

Post a Comment