दौलतनगर दि.१८:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची 64 वी
पुण्यतिथी शनिवार दि.२० मे, २०२3 रोजी
सकाळी १०.०० वा. “ महाराष्ट्र दौलत ” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण
संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात येणार आहे.प्रतिवर्षाप्रमाणे कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे
पुण्यतिथीनिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू मुलींना
दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणेकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने
सुरु असलेल्या शिष्यवृत्तीचे वितरण पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते करण्यात येणार असल्याची
माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने प्रसिध्दीस
देण्यात आली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत म्हंटले आहे की,
महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा
पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी दि.२० मे रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी
उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने साजरा करण्यात येते. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई
यांच्या संकल्पनेतून कै.सौ.वत्सलादेवी
देसाई (ताईसाहेब)
यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटण
मतदारसंघातील गरीब व गरजू मुलींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरीता
कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील 179 हुन अधिक मुलींना
प्रत्येकी ५5०० रुपयेप्रमाणे
पदवी पर्यंतच्या शिक्षणाकरीता शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. गरजू कुटुंबातील मुलींना शिक्षणाकरीता हातभार लागावा
याकरीता या शिष्यवृत्तीबरोबर वहया,शालेय गरजांच्या साहित्याचे वितरणही करण्यात येते. कै.सौ.वत्सलादेवी
देसाई (ताईसाहेब)
यांची यंदाच्या वर्षीची 64 वी पुण्यतिथी शनिवार दि. २० मे २०२3 रोजी सकाळी १०.०० वाजता “
महाराष्ट्र दौलत ” लोकनेते
बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे
राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे
जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई
सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देर्स(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष
मा.रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याचे शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment