दौलतनगर दि.31:- पाटण विधानसभा मतदारसंघातील ढेबेवाडी विभागातील डोंगर पठारावरील गावांची मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या सणबूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व अधिकारी,कर्मचारी यांचे निवासी इमारतीचे बांधकामाकरीता निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरीव निधी मंजूर होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सणबूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्य इमारत व अधिकारी,कर्मचारी निवास स्थान इमारतीचे बांधकाम करण्यासाठी निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण तालुका हा डोंगरी व दुर्गम भागामध्ये वसलेला असून तालुक्यातील नागरीकांना वेळेत व चांगल्या आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन या ठिकाणी 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करुन या रुग्णालयाच्या कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली असून लवकरच पाटण येथील उपजिल्हा रुग्णालयाचे इमारतीचे बांधकाम करण्याचे कामांस सुरुवात होणार आहे.तसेच ढेबेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन होऊन या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले.दरम्यान ढेबेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे सणबूर या ठिकाणी मंजूर केले होते. परंतु या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राकरीता इमारत नव्हती. ढेबेवाडी विभागातील सणबूर हे गाव या विभागातील डोंगर पठारावरील गावांचे मध्यवर्ती असे ठिकाण असून या ठिकाणी या विभागातील डोंगर पठारावरील नागरीकांची मोठया प्रमाणांत ये-जा असते.परंतु सणबूर या मध्यवर्ती ठिकाणी विभागातील नागरीकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत नसल्याने येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होती.दरम्यान सणबूरसह या विभागातील डोंगर पठारावरील ग्रामस्थांची आरोग्याच्या दृष्टीने होणारी गैरसोय लक्षात घेऊन पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे सणबूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत व अधिकारी,कर्मचारी निवासाचे इमारतीचे बांधकाम करण्यासाठी भरीव निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी केलेली होती. या विभागातील ग्रामस्थांच्या सातत्याने होत असलेल्या मागणीचा विचार करुन पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सणबूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत व अधिकारी,कर्मचारी निवास इमारतीचे बांधकामासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत तातडीने निधी मंजूर होण्यासाठी पत्रव्यवहार करत सातत्याने यासाठी पाठपुरावा सुरु होता.त्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सणबूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत व अधिकारी कर्मचारी निवासस्थान इमारतीचे बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे.यामध्ये सणबूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य इमारतीचे बांधकाम,अधिकारी व कर्मचारी यांचे निवासी इमारत,पाणी पुरवठा,फर्निचर,इलेक्ट्रिक काम,रेन हार्वेस्टींग,अग्निशामक यंत्रणा,बाग-बगीचा सुशोभिकरण व जमिन सपाटीकरण,सौलर सिस्टीम,संरक्षक भिंत यासह सुसज्ज अशी मुख्य इमारत व अधिकारी,कर्मचारी निवासीचे इमारतीचे बांधकाम होणार आहे.सणबूर येथे नव्याने होणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व अधिकारी व कर्मचारी निवासी इमारतीमुळे या विभागातील नागरिकांची आरोग्याची चांगली सुविधा पुरविण्यास मदत होणार असल्याने सणबूरसह या विभागातील ग्रामस्थांनी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे आभार मानले असल्यासचे शेवटी पत्रकांत नमूद केले आहे.
Wednesday 31 May 2023
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून सणबूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीसाठी निधी मंजूर.राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत सणबूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत व अधिकारी कर्मचारी निवासाचे बांधकामसाठी निधीची तरतूद.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment