दौलतनगर दि.30:- महाराष्ट्र
शासनाच्या विविध शासकीय योजना गावपातळीवर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्याचे
मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचे संकल्पनेतून राज्य शासनाने शासन आपल्या दारी
हा उपक्रम सध्या सर्वत्र राबविण्यात येत असून या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ
नुकताच मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे शुभहस्ते दौलतनगर येथे पार पडला.
ग्रामीण भागातील विविध विकास कामांसाठी सध्या राज्य शासनाकडून भरीव अशी आर्थिक
तरतुद करण्यात येत असून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन
प्रयत्नशिल आहे.आज उद्घाटन झालेल्या आबदारवाडी गावच्या नविन ग्रामपंचायत
कार्यालयाचे इमारतीचे कामासाठी निधी मंजूर करण्यात आला.आज या इमारतीचा लोकार्पण
सोहळा होत असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी व पदाधिकारी यांनी
मागणी केलेल्या विकास कामांना प्राधान्याने निधी मंजूर करण्यात आला असून या पुढील
काळामध्ये आबदारवाडी गावातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी दिली.
ते
आबदारवाडी,ता.पाटण येथे राष्ट्रीय ग्रामस्वराज
अभियानतून मंजूर झालेल्या नविन
ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन व पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित
संचालक मंडळाचा सत्कार कार्यक्रप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जयवंतराव शेलार,विजय पवार,सुरेश पानस्कर,शशिकांत निकम,संग्राम
मोकाशी,पांडूरंग नलवडे,विजय जंबुरे,अशोक डिगे,सुनिल पानस्कर, सुनिल पवार,शिवशाही
सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे,उद्योजक के.आर.शिंदे,सागर नलवडे,भरत साळूंखे
यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी
बोलताना ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने राज्य शासनाच्या विविध योजना गाव पातळीवर
प्रभावीपणे राबविण्यासाठी जनजागृतीसह प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी शासना
आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ केला आहे.तसेच राज्य शासनाकडून ग्रामीण भागातील
विविध विकास कामांसाठी भरीव तरतुद करण्यात येत आहे.आपल्या पाटण विधानसभा
मतदारसंघाचा विचार करता राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मतदारसंघातील
डोंगरी व दुर्गम भागातील विविध नागरी सुविधांच्या कामांसाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला असल्याने ग्रामीण
भागाचा विकासाला हातभार लागत आहे.गावामध्ये विकासाची कामे राबविताना येथील स्थानिक
ग्रामस्थांचा लोकसहभाग ही महत्त्वाचा असून आबदारवाडी गावातील ग्रामस्थांनी
ग्रामपंचायत उभारणीसाठी श्रमदान केले ही बाब नक्कीच कौतुकास्पद असून इतरांना ती
आदर्शवत अशीच आहे.त्याचबरोबर ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना विश्वासात घेऊन
विशेषत: महिला भगिनींसाठी वेगळ वेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. पाटण विधानसभा
मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातील गावा-गावांतील प्रलंबित विकास कामे
मार्गी लावण्याचा नेहमीच प्रयत्न असून आबदारवाडी गावातील ग्रामस्थांनी ज्या-ज्या
विकास कामांना निधी मंजूर करण्याची मागणी केली त्या विकास कामांना आता पर्यंत निधी
मंजूर करण्यात आला असून गावामध्ये आतापर्यंत तीन कोटींच्या वर विकास कामे मार्गी
लागली आहेत.ग्रामपंचायत स्थापनेपासून गेली 55 वर्षे या
ग्रामपंचायतीवर आपली सत्ता असून संपूर्ण गाव हे पहिल्यापासून देसाई कुटुंबाबरोबर
राहिले आहे. त्यामुळे यापुढील काळातही आबदारवाडी
गावातील विविध विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी
दिली त्यामुळे या पुढील काळातही अशीच आपल्या आबदारवाडी गावातील ग्रामस्थांची एकी
कायम रहावी असे शेवटी सांगीतले.दरम्यान आबदारवाडी गावचे सरपंच व शिवशाही सरपंच
संघाचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी प्रास्ताविकपर भाषणांत गावातील विकास कामांची व
ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानाबाबतची माहिती दिली.दरम्यान नामदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते आबदारवाडी येथील दिपक नानासो शिंदे,
प्रकाश दादू शिंदे, अंकुश रामचंद्र शिंदे, हेमंत आनंदा गायकवाड, बापूराव यशवंत गायकवाड,
शिवाजी बाळू जाधव यांनी शिवसेना पक्षामध्ये जाहिर प्रवेश केलेल्यांचा शाल व श्रीफळ
देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment