Monday, 29 September 2025

पाटण नगरपंचायतीचे घनकचरा संकलन व वाहतूक कामासाठी निधी देणार- ना.शंभूराज देसाई. दौलतनगर ता.पाटण येथे घनकचरा संकलन व ग्रामीण स्वच्छता आढावा बैठक संपन्न.

 

 

दौलतनगर दि.28 : पाटण नगरपंचायतीमध्ये घनकचरा संकलन सुविधा सुरळीत नसल्याने या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या रहिवाशांचे घरी साठविण्यात आलेल्या कचऱ्याचे संकलन करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा संदर्भात गत काही दिवसांमध्ये गंभीर प्रश्न निर्माण होऊन या साठलेल्या कचऱ्याचे दुर्गंधीमुळे येथील नागरी वसाहतीमध्ये नागरीकांचा आरोग्याचा निर्माण झालेला प्रश्न लक्षात घेऊन पाटण नगरपंचायतीचे कचरा संकलनासह येथील स्वच्छतेच्या आवश्यक असलेल्या कामासाठी कोयना भूकंप  पुनर्वसन निधी मधून तात्काळ  पंचवीस लक्ष रुपयांचा निधी देत असून,  कोयना भूकंप  पुनर्वसन निधी समितीककडे घनकचरा संकलन व वाहतूक कामासाठीचा प्रस्ताव तात्काळ सादर करा  अशा सुचना  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधीत अधिका-यांना दिल्या.

              दौलतनगर ता.पाटण येथे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली पाटण विधानसभा मतदारसंघातील कचरा संकलन व ग्रामीण स्वच्छता आढावा बैठकी झाली. या बैठकीला  उपविभागीय अधिकारी सोपान टोंपे,तहसिलदार अनंत गुरव,गट विकास अधिकारी सरिता पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील मुख्याधिकारी संतोष मोरे,यांचेसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

           प्रसिध्दीपत्रकांत ना. देसाई यांनी पुढे म्हंटले आहे की, पाटण नगरपंचायती अंतर्गत घनकचरा,नालेसफाई इत्यादीच्या समस्या सातत्याने जाणवत आहेत.ठिक ठिकाणी कचऱ्याचे ढिग साठून राहत असल्याने येथील स्थानिक नागरिकांचा  आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. नगरपंचायतीकडील कचरा गोळया करणारी गाडी आली नसल्याने नागरिकांच्यात असंतोष निर्माण झाला होतो. परिणामी या कचऱ्यांचेमुळे मोठया प्रमाणांत शहरामध्ये अस्वच्छता निर्माण झाल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपुर्वी पाटण शहारातील नागरीकांनी कचरा गोळा करत गोळा केलेला कचरा  हा कचरा डेपोत वाहतूकीसाठी रस्ता नसल्याने नगरपंचायत इमारतीचे आवारामध्ये टाकण्यासारखा प्रकार घडला होता. पाटण येथे नागरी वसाहत दिवसें दिवस वाढत चालली असून नगरपंचायतीकडून नियमित कचरा गोळा करताना अनेक अडचणी निर्माण होत असल्याने येथील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान पाटण नगरपंचायती अंतर्गत कचरा संकलन व स्वच्छते संदर्भात संबंधित अधिकारी यांचेकडून आवश्यक ती माहिती घेत पाटण नगरपंचायती अंतर्गत कचरा संकलन व स्वच्छतेच्या कामासाठी कोयना भूकंप  पुनर्वसन निधी मधून निधी देणार असल्याचे सांगत ना.शंभूराज देसाई म्हणाले कोयना भूकंप  पुनर्वसन निधी समितीककडे घनकचरा संकलन व वाहतूक कामासाठीचा प्रस्ताव तात्काळ सादर करा  अशा सुचना  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधीत अधिका-यांना दिल्या. दैनंदिन निवासी इमारती, घरांमध्ये वेग-वेगळया स्वरुपाचा कचरा साठत असतो. तो दररोज संकलन करुन त्याची विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे असल्याने पाटण नगरपंचायती अंतर्गत असलेल्या हा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने निधी मंजूर करण्याची कार्यवाही संबंधित विभागाकडून करण्यात येऊन निधी उपलब्ध झाल्यानंतर या कामांतर्गत प्रस्तावित असलेली कामे तातडीने हाती घेण्याचा सूचना ही यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

          पाटण विधानसभा मतदार संघातील मोठ्या ग्रामपंचायतींच्या कचरा संकलन करण्याबाबत व त्याची योग्य विल्हेवाट लावणेबाबत गत बैठकीत सुचना केल्या होत्या त्यामध्ये काही सुधारणा झाली नसून अजूनही रस्त्याच्या शेजारी कचरा टाकला जात आहे. कचरा टाकणा-यावर नजर ठेवण्यासाठी भरारी पथक तयार करा. भरारी पथकाला कचरा टाकणारा सापडल्यानंतर पोलीस विभागाच्या मदतीने संबंधीतांवर गुन्हा दाखल अशा सक्त सुचना यावेळी त्यांनी संबंधीत अधिका-यांना केल्या.

Saturday, 13 September 2025

देसाई कारखान्याचेवतीने राज्य सरकारचे अभिनंदन. सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये एकमताने ठराव मंजूर.

 


 

दौलतनगर दि.13 : महायुती  सरकारने राज्यातील उपसा सिंचन सहकारी योजनांचे लाईट बील पूर्वीच्याच जुन्या दराने लागू केल्यामुळे उपसा सिंचन योजनेसाहित सहकारी संस्थांच्या मोठा फायदा झाला असल्याने राज्याचे पर्यटन मंत्री ना शंभूराज देसाई आणि राज्य सरकार यांचे अभिनंदन चा ठराव पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याच्या ५५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

              लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे 55 वी वार्षिक सभा दौलतनगर,ता.पाटण या ठिकाणी खेळीमेळीच्या वातारावणामध्ये संपन्न झाली. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई हे स्वतः व्हिडीओ कॉमफर्न्स द्वारे तर लोकनेते बाळसाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई,चि. जयराजदादा देसाई, शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख, डॉ.दिलीपराव चव्हाण, अशोकराव पाटील, व्हाईस चेअरमन पांडूरंग नलवडे, विजय पवार, बाळासाहेब पाटील, ॲङमिलिंद पाटील, ॲड. डी. पी. जाधव, ॲड. बाबुराव नांगरे, बबनराव शिंदे,शशिकांत निकम,प्रशांत पाटील,सुनिल पानस्कर,बशीर खोंदू,चंद्रकांत पाटील,कार्यकारी संचालक सुहास देसाई यांचेसह संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.

               यावेळी मंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,देशातील साखरेचे घासरलेले दर, उत्पादनातील घट आणि साखरेचा बाजारपेठेत असणारा विक्री दर यामुळे साखर राज्यातील कारखान्यापुढे पेच निर्माण झाला असला तरी या बाबी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी राज्य शासना पाठपुरावा सुरूच आहे,असे स्पष्ट करून मंत्री ना.देसाई पुढे म्हणाले,यापूर्वी ही राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना तब्बल दहा हजार कोटी इतका इन्कम टॅक्स भरावा लागणार होता.मात्र तत्कालीन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्य मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून देशाचे गृहमंत्री ना. अमित शहा यांच्या प्रयत्नातून राज्यातील साखर कारखान्यांना भरावा लागणारा दहा हजार कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स माफ करण्यात आला. मात्र त्यावेळी ही सहकारात दिगग्ज म्हणणाऱ्या राज्यातील अनेक नेत्यांनी राज्यापुढील हा प्रलंबित प्रश्न का सोडविला नाही ? असा सवाल उपस्थित करून राज्यातील सहकारी कारखानदारी क्षेत्रामध्ये येणारे कोणतेही प्रश्न केंद्र सरकारकडून तातडीने सोडविण्यासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासन प्रयत्नशील राहणार आहे.

               कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई म्हणाले की,देसाई कारखान्याचे विस्तारीकरण प्रकल्प दोन टप्प्यात यशस्वीपणे  पूर्ण केला. विस्तारीकरणा बरोबरच आधुनिकीकरण ही कमी खर्चात केले. परिणामी कारखान्याची गाळप क्षमता ही दुप्पट करण्यात आली. यामुळे देसाई कारखान्याचा खर्च वाचून वेळ आणि आर्थिक बचत ही झाली आहे. लवकरच ए आय तंत्रज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात जास्तीत जास्त  वाढ करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.तसेच ऊस विकास विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी खते,बियाणे व औषधे यांचा पुरवठा लवकर करणार असल्याचे सांगत शेतकरी हिताचे निर्णय आपण घेत असून कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांनी आपला पिकवलेला संपूर्ण ऊस देसाई कारखान्यास गळीतास देऊन सहकार्य करावे असे आवाहन  त्यांनी केले. कार्यक्रमा दरम्यान कारखाना सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा तसेच ऊस पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी तर आभार बबनराव शिंदे यांनी मानले.अहवाल वाचन वैभव जाधव यांनी केले.

चौकट :- कॅबिनेट मंत्री ना.शंभूराज देसाई यांचा अभिनंदनाचा ठराव.

        नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये पाटण‍ विधानसभा मतदारसंघातून देसाई कारखान्याचे मार्गदर्शक संचालक ना.शंभूराज देसाई हे सुमारे 35हजाराचे मताधिक्य घेऊन प्रचंड बहुमताने विजयी झाले. तसेच त्यांची राज्याचे कॅबिनेट मंत्रीपदी  निवड होऊन सातारा जिल्हयाचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची निवड झाली. त्याबद्दल मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अभिनंदनाचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते घेण्यात आला.

Monday, 1 September 2025

दशकांच्या प्रतीक्षेनंतर धनगर समाजाला न्याय : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पाटण तालुक्यात अहिल्यादेवी होळकर स्मारक उभारणीस प्रारंभ ! यापूर्वी झुलवले गेले, फसवले गेले… पण आज होळकर स्मारकातून अखेर धनगर समाजाला पालकमंत्री श्री. शंभूराज देसाई यांनी दिला न्याय!


पाटण तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा एक भव्य स्मारक असावा अशी तालुक्यातील धनगर बांधवांची इच्छा होती. पाटण तालुक्यातील धनगर समाजाने अनेक दशकांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाची मागणी केली होती. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी धनगर समाजाला झुलवले, पोत्याने मते घेतली आणि गरीबांच्या जमिनी कवडीमोल किमतीत विकल्या गेल्या. 

पण कर्तव्यदक्ष जननेते, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. शंभूराज देसाई साहेब यांनी धनगर समाजाच्या भावनांचा मान राखून हे ऐतिहासिक कार्य यशस्वी केले.


पाटण तालुक्यातील कराड–चिपळूण रोड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे भूमीपूजन पालकमंत्री ना.श्री. शंभूराज देसाई साहेब यांच्या हस्ते पार पडले. सोहळ्यात स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि धनगर समाजाचे मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित होते. बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, तसेच लक्ष्मण झोरे आणि लक्ष्मण येडगे यांचीही उपस्थिती होती.


पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले:

“धनगर समाजाच्या मागण्या अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्या. पूर्वी समाज झुलवला गेला, समाजाच्या मतांचा गैरवापर झाला, जमिनी कवडीमोल किमतीत लाटल्या गेल्या. पण आज हा दिवस ऐतिहासिक आहे. हा स्मारक केवळ वास्तू नाही, तर समाजाच्या आत्मगौरवाचं प्रतीक आहे. या संकुलातून समाजाला शिक्षण, संस्कृती आणि सामाजिक प्रगतीसाठी नवे व्यासपीठ मिळणार आहे.”

ते पुढे म्हणाले की, "हा प्रकल्प सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचा असून, भविष्यात पाटण तालुक्यातील समाजाचा विकास यामुळे गतीमान होईल.

माझे कट्टर समर्थक आणि निष्ठावंत असणाऱ्या श्री. भागोजी शेळके यांच्यावर समाजाने माझी साथ सोडण्यासाठी दबाव टाकला, प्रसंगी त्यांना वाळीत टाकण्याचे कृत्यही केले. तरीही श्री. भागोजी शेळके यांची माझ्यावर निष्ठा कायम राहिली. निष्ठा काय असते, हे त्यांनी समाजाला दाखवून दिले आहे." असे स्पष्ट करून पालकमंत्री श्री. शंभूराज देसाई साहेब यांनी आपले निष्ठावंत कार्यकर्ते भागोजी शेळके यांचा गौरव केला.


भूमीपूजनाच्या या ऐतिहासिक क्षणाने समाजातील अभिमान, उत्साह आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव झळकला. स्मारक व बहुउद्देशीय संकुलाच्या प्रत्यक्ष उभारणीला वेग मिळेल, आणि पाटण तालुक्यातील हा ऐतिहासिक प्रकल्प समाजाच्या विकासाला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


समस्त धनगर समाजाने नामदार शंभूराज देसाई यांचे शतश: आभार मानले !

मतदारसंघातील गावांच्या सर्वांगीण विकासाबरोबर आश्वासनांची पुर्तता करण्यासाठी कटीबध्द-ना.शंभूराज देसाई. धामणी,कवरवाडी,कुसवडे झाकडे,बनपूरी,नाटोशी या गावांमध्ये पाटणकर गटाला मोठे खिंडार, तब्बल 10 गावातील पाटणकर गटातील कार्यकर्त्यांनी केला शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश.

 

 


दौलतनगर दि.01:- पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामांच्या माध्यमातून गावांचा कायापालट करण्याचे काम करत असून सत्तेच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लागत असल्याने विरोधी गटातील कार्यकर्ते हे आज मोठया  संख्यने शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. जे कार्यकर्ते शिवसेना पक्षामध्ये आज प्रवेश करत आहेत, त्यांचे शिवसेना पक्षामध्ये स्वागत असून ज्या विश्वासाने आपण माझे नेतृत्वामध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करताय त्यानुसार मतदारसंघातील गावांच्या सर्वांगीण विकासाबरोबर दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून कटीबध्द आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.

        ते दौलतनगर ता.पाटण येथे शिवसेना पक्ष जाहिर प्रवेश कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  डॉ.दिलीपराव चव्हाण, ॲङमिलिंद पाटील,विजय पवार,पंजाबराव देसाई,विलास गोडांबे,विशाल पवार,दत्तात्रय चोरगे,मनोज पाटील,सदानंद साळुंखे, गणेश भिसे, उत्तरामराव मोळावडे,पांडूरंग शिरवाडकर,सुनिल पवार,पांडूरंग नलवडे,बबनराव‍ भिसे,प्रकाशराव जाधव,विजय देशमुख,विकास गिरी गोसावी यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी  धामणी येथील रामनगर, लोकरेआळी, बादेवाडी व पुजारी मंडळ, कवरवाडी, चोरगेवाडी, शेंडेवाडी, दऱ्यातील मोरेवाडी, महिंद, बनपूरी, कुसवडे पुनर्वसन झाकडे, नाटोशी या 10 गावांतील पाटणकर गटातील 250 ते 300 कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी  शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत विकासासाठी कटीबध्द असल्याचे आश्वासित केले.

               यावेळी ना.शंभूराज देसाई म्हणाले की,विधानसभेच्या निवडणुकीला आठ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला.आपण पाटण विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही विकास कामांच्या मुद्यावर लढवली. मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेने, मतदारांनी विश्वास दाखवला.त्यामुळे पाटण मतदार संघातील जनतेने नेहमीच चढत्या क्रमांकाच्या मताधिक्याने विजयी केले.कारण मतदारसंघातील जनतेला दिलेल्या आश्वासने पूर्ण करण्याचे काम सत्तेच्या कालावधीत केले. आमदार,राज्यमंत्री तसेच आता राज्याचा कॅबिनेट मंत्री व सातारा जिल्हयाचा पालकमंत्री  म्हणून  जिल्हयामध्ये व राज्यामध्ये काम करताना सातत्याने  आपलं लक्ष हे आपल्या मतदारसंघावर ठेवले. कारण ज्या विश्वासाने जनतेने निवडूण दिले आहे, तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी  दिली,  त्या जनतेच्या मतदारांच्या विकास कामांबाबतीत, सार्वजनिक प्रश्नांसाठी तसेच वैयक्तीक काही अपेक्षा आपल्याकडे आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून त्या पूर्ण करणे हे आपलं कर्तव्य समजूनच मी सातत्याने कार्यरत आहे. राज्यामध्ये कितीही व्यस्त काम असले तरी शनिवार रविवार मतदारसंघामध्ये जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशिल आहे. एम मनाशी खूणगाठ बांधली आहे,काही झाले तरी मतदारसंघातील जनतेशी असलेली नाळ ही कधी तुटू द्यायची नाही. लोकांच्या अडी अडचणीला उपयोगी पडले पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या आमदार,मंत्रीपदाच्या सत्तेचा वापर केला पाहिजे असे सांगत ते पुढे म्हणाले की, आज तब्बल 10 गावांमधील पाटणकर गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश होत आहेत. कारण शेवटी लोकांनी पाहिले आहे की किती दिवस विरोधात राहयचं.मुळ विकासाच्या प्रवाहात येऊन कामे मार्गी लावायची, यात कसलाही व्यक्तीगत स्वार्थ नाही, गावाचा प्रश्न सुटला पाहिजे,गावातील विकासाची कामे मार्गी लागली पाहिजेत.गावाच्या गरजेचे महत्त्वपूर्ण कामे राहिली असतील ती पूर्ण झाली पाहिजेत याच भावनेतून हे पक्षप्रवेश होत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून कधीच गटातटाचे राजकारण केले नाही. विकासाच काम करण्यासाठी आपल्याकडे सत्ता आहे.आज जर विकासाच काम केले तर भविष्यात मतदान करताना आपला विचार होणार आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे निधनानंतर सत्ता खेचून आणायला 21 वर्षे लागली. गेली चार पिढया देसाई कुटुंबाबरोबर निष्ठेने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यामुळे हे यश मिळाले. सन 2024 विधानसभा निवडणुकीत जास्त मतांनी आपण निवडूण यायच हे सगळया पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी,सामान्य जनतेने ठरवले आणि सन 2024 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये 35000 मताधिक्क्य घेऊन विक्रमी मतांनी विजयी झालो,याच सर्व श्रेय हे सामान्य जनतेचं असल्याचे सांगत  दिलेला विश्वास कायम ठेवण्याचे काम आपण सत्तेच्या मध्यमातून करतोय. तस जे नव्याने शिवसेनेत पक्षप्रवेश करताय त्यांनी सुध्दा विश्वासाची परंपरा कायम ठेवावी. पक्षप्रवेश करताना काही विकासाची कामांची मागणी असेल किंवा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जो शब्द दिला आहे जे आश्वासन दिले आहे तो माझा शब्द आहे असे समजून त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी माझ्यावर राहिल,असे शेवटी त्यांनी सांगीतले.