Saturday, 13 September 2025

देसाई कारखान्याचेवतीने राज्य सरकारचे अभिनंदन. सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये एकमताने ठराव मंजूर.

 


 

दौलतनगर दि.13 : महायुती  सरकारने राज्यातील उपसा सिंचन सहकारी योजनांचे लाईट बील पूर्वीच्याच जुन्या दराने लागू केल्यामुळे उपसा सिंचन योजनेसाहित सहकारी संस्थांच्या मोठा फायदा झाला असल्याने राज्याचे पर्यटन मंत्री ना शंभूराज देसाई आणि राज्य सरकार यांचे अभिनंदन चा ठराव पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याच्या ५५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

              लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे 55 वी वार्षिक सभा दौलतनगर,ता.पाटण या ठिकाणी खेळीमेळीच्या वातारावणामध्ये संपन्न झाली. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई हे स्वतः व्हिडीओ कॉमफर्न्स द्वारे तर लोकनेते बाळसाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई,चि. जयराजदादा देसाई, शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख, डॉ.दिलीपराव चव्हाण, अशोकराव पाटील, व्हाईस चेअरमन पांडूरंग नलवडे, विजय पवार, बाळासाहेब पाटील, ॲङमिलिंद पाटील, ॲड. डी. पी. जाधव, ॲड. बाबुराव नांगरे, बबनराव शिंदे,शशिकांत निकम,प्रशांत पाटील,सुनिल पानस्कर,बशीर खोंदू,चंद्रकांत पाटील,कार्यकारी संचालक सुहास देसाई यांचेसह संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.

               यावेळी मंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,देशातील साखरेचे घासरलेले दर, उत्पादनातील घट आणि साखरेचा बाजारपेठेत असणारा विक्री दर यामुळे साखर राज्यातील कारखान्यापुढे पेच निर्माण झाला असला तरी या बाबी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी राज्य शासना पाठपुरावा सुरूच आहे,असे स्पष्ट करून मंत्री ना.देसाई पुढे म्हणाले,यापूर्वी ही राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना तब्बल दहा हजार कोटी इतका इन्कम टॅक्स भरावा लागणार होता.मात्र तत्कालीन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्य मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून देशाचे गृहमंत्री ना. अमित शहा यांच्या प्रयत्नातून राज्यातील साखर कारखान्यांना भरावा लागणारा दहा हजार कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स माफ करण्यात आला. मात्र त्यावेळी ही सहकारात दिगग्ज म्हणणाऱ्या राज्यातील अनेक नेत्यांनी राज्यापुढील हा प्रलंबित प्रश्न का सोडविला नाही ? असा सवाल उपस्थित करून राज्यातील सहकारी कारखानदारी क्षेत्रामध्ये येणारे कोणतेही प्रश्न केंद्र सरकारकडून तातडीने सोडविण्यासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासन प्रयत्नशील राहणार आहे.

               कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई म्हणाले की,देसाई कारखान्याचे विस्तारीकरण प्रकल्प दोन टप्प्यात यशस्वीपणे  पूर्ण केला. विस्तारीकरणा बरोबरच आधुनिकीकरण ही कमी खर्चात केले. परिणामी कारखान्याची गाळप क्षमता ही दुप्पट करण्यात आली. यामुळे देसाई कारखान्याचा खर्च वाचून वेळ आणि आर्थिक बचत ही झाली आहे. लवकरच ए आय तंत्रज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात जास्तीत जास्त  वाढ करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.तसेच ऊस विकास विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी खते,बियाणे व औषधे यांचा पुरवठा लवकर करणार असल्याचे सांगत शेतकरी हिताचे निर्णय आपण घेत असून कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांनी आपला पिकवलेला संपूर्ण ऊस देसाई कारखान्यास गळीतास देऊन सहकार्य करावे असे आवाहन  त्यांनी केले. कार्यक्रमा दरम्यान कारखाना सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा तसेच ऊस पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी तर आभार बबनराव शिंदे यांनी मानले.अहवाल वाचन वैभव जाधव यांनी केले.

चौकट :- कॅबिनेट मंत्री ना.शंभूराज देसाई यांचा अभिनंदनाचा ठराव.

        नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये पाटण‍ विधानसभा मतदारसंघातून देसाई कारखान्याचे मार्गदर्शक संचालक ना.शंभूराज देसाई हे सुमारे 35हजाराचे मताधिक्य घेऊन प्रचंड बहुमताने विजयी झाले. तसेच त्यांची राज्याचे कॅबिनेट मंत्रीपदी  निवड होऊन सातारा जिल्हयाचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची निवड झाली. त्याबद्दल मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अभिनंदनाचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते घेण्यात आला.

No comments:

Post a Comment