दौलतनगर दि.28 : पाटण नगरपंचायतीमध्ये घनकचरा संकलन सुविधा सुरळीत
नसल्याने या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या रहिवाशांचे घरी साठविण्यात आलेल्या
कचऱ्याचे संकलन करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा संदर्भात गत काही दिवसांमध्ये गंभीर
प्रश्न निर्माण होऊन या साठलेल्या कचऱ्याचे दुर्गंधीमुळे येथील नागरी वसाहतीमध्ये
नागरीकांचा आरोग्याचा निर्माण झालेला प्रश्न लक्षात घेऊन पाटण नगरपंचायतीचे कचरा
संकलनासह येथील स्वच्छतेच्या आवश्यक असलेल्या कामासाठी कोयना भूकंप पुनर्वसन निधी मधून तात्काळ पंचवीस लक्ष रुपयांचा निधी देत असून, कोयना भूकंप
पुनर्वसन निधी समितीककडे घनकचरा संकलन व वाहतूक कामासाठीचा
प्रस्ताव तात्काळ सादर करा अशा सुचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधीत
अधिका-यांना दिल्या.
दौलतनगर ता.पाटण
येथे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली पाटण विधानसभा
मतदारसंघातील कचरा संकलन व ग्रामीण स्वच्छता आढावा बैठकी झाली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी सोपान टोंपे,तहसिलदार अनंत
गुरव,गट विकास अधिकारी सरिता पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील मुख्याधिकारी
संतोष मोरे,यांचेसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रसिध्दीपत्रकांत
ना. देसाई यांनी पुढे म्हंटले आहे की, पाटण नगरपंचायती अंतर्गत घनकचरा,नालेसफाई
इत्यादीच्या समस्या सातत्याने जाणवत आहेत.ठिक ठिकाणी कचऱ्याचे ढिग साठून राहत
असल्याने येथील स्थानिक नागरिकांचा
आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. नगरपंचायतीकडील कचरा गोळया करणारी
गाडी आली नसल्याने नागरिकांच्यात असंतोष निर्माण झाला होतो. परिणामी या कचऱ्यांचेमुळे
मोठया प्रमाणांत शहरामध्ये अस्वच्छता निर्माण झाल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची
शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपुर्वी पाटण शहारातील नागरीकांनी कचरा गोळा
करत गोळा केलेला कचरा हा कचरा डेपोत
वाहतूकीसाठी रस्ता नसल्याने नगरपंचायत इमारतीचे आवारामध्ये टाकण्यासारखा प्रकार
घडला होता. पाटण येथे नागरी वसाहत दिवसें दिवस वाढत चालली असून नगरपंचायतीकडून
नियमित कचरा गोळा करताना अनेक अडचणी निर्माण होत असल्याने येथील नागरीकांना नाहक त्रास
सहन करावा लागत आहे. दरम्यान पाटण नगरपंचायती अंतर्गत कचरा संकलन व स्वच्छते
संदर्भात संबंधित अधिकारी यांचेकडून आवश्यक ती माहिती घेत पाटण नगरपंचायती अंतर्गत
कचरा संकलन व स्वच्छतेच्या कामासाठी कोयना भूकंप
पुनर्वसन निधी मधून निधी देणार असल्याचे सांगत ना.शंभूराज देसाई म्हणाले कोयना
भूकंप पुनर्वसन निधी समितीककडे घनकचरा संकलन व वाहतूक कामासाठीचा प्रस्ताव तात्काळ सादर
करा अशा सुचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधीत
अधिका-यांना दिल्या. दैनंदिन निवासी इमारती, घरांमध्ये वेग-वेगळया स्वरुपाचा कचरा
साठत असतो. तो दररोज संकलन करुन त्याची विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे असल्याने
पाटण नगरपंचायती अंतर्गत असलेल्या हा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने निधी मंजूर
करण्याची कार्यवाही संबंधित विभागाकडून करण्यात येऊन निधी उपलब्ध झाल्यानंतर या
कामांतर्गत प्रस्तावित असलेली कामे तातडीने हाती घेण्याचा सूचना ही यावेळी त्यांनी
अधिकाऱ्यांना केल्या.
पाटण विधानसभा मतदार संघातील
मोठ्या ग्रामपंचायतींच्या कचरा संकलन करण्याबाबत व त्याची योग्य विल्हेवाट
लावणेबाबत गत बैठकीत सुचना केल्या होत्या त्यामध्ये काही सुधारणा झाली नसून अजूनही
रस्त्याच्या शेजारी कचरा टाकला जात आहे. कचरा टाकणा-यावर नजर ठेवण्यासाठी भरारी
पथक तयार करा. भरारी पथकाला कचरा टाकणारा सापडल्यानंतर पोलीस विभागाच्या मदतीने संबंधीतांवर
गुन्हा दाखल अशा सक्त सुचना यावेळी त्यांनी संबंधीत अधिका-यांना केल्या.

No comments:
Post a Comment