पाटण तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा एक भव्य स्मारक असावा अशी तालुक्यातील धनगर बांधवांची इच्छा होती. पाटण तालुक्यातील धनगर समाजाने अनेक दशकांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाची मागणी केली होती. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी धनगर समाजाला झुलवले, पोत्याने मते घेतली आणि गरीबांच्या जमिनी कवडीमोल किमतीत विकल्या गेल्या.
पण कर्तव्यदक्ष जननेते, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. शंभूराज देसाई साहेब यांनी धनगर समाजाच्या भावनांचा मान राखून हे ऐतिहासिक कार्य यशस्वी केले.
पाटण तालुक्यातील कराड–चिपळूण रोड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे भूमीपूजन पालकमंत्री ना.श्री. शंभूराज देसाई साहेब यांच्या हस्ते पार पडले. सोहळ्यात स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि धनगर समाजाचे मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित होते. बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, तसेच लक्ष्मण झोरे आणि लक्ष्मण येडगे यांचीही उपस्थिती होती.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले:
“धनगर समाजाच्या मागण्या अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्या. पूर्वी समाज झुलवला गेला, समाजाच्या मतांचा गैरवापर झाला, जमिनी कवडीमोल किमतीत लाटल्या गेल्या. पण आज हा दिवस ऐतिहासिक आहे. हा स्मारक केवळ वास्तू नाही, तर समाजाच्या आत्मगौरवाचं प्रतीक आहे. या संकुलातून समाजाला शिक्षण, संस्कृती आणि सामाजिक प्रगतीसाठी नवे व्यासपीठ मिळणार आहे.”
ते पुढे म्हणाले की, "हा प्रकल्प सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचा असून, भविष्यात पाटण तालुक्यातील समाजाचा विकास यामुळे गतीमान होईल.
माझे कट्टर समर्थक आणि निष्ठावंत असणाऱ्या श्री. भागोजी शेळके यांच्यावर समाजाने माझी साथ सोडण्यासाठी दबाव टाकला, प्रसंगी त्यांना वाळीत टाकण्याचे कृत्यही केले. तरीही श्री. भागोजी शेळके यांची माझ्यावर निष्ठा कायम राहिली. निष्ठा काय असते, हे त्यांनी समाजाला दाखवून दिले आहे." असे स्पष्ट करून पालकमंत्री श्री. शंभूराज देसाई साहेब यांनी आपले निष्ठावंत कार्यकर्ते भागोजी शेळके यांचा गौरव केला.
भूमीपूजनाच्या या ऐतिहासिक क्षणाने समाजातील अभिमान, उत्साह आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव झळकला. स्मारक व बहुउद्देशीय संकुलाच्या प्रत्यक्ष उभारणीला वेग मिळेल, आणि पाटण तालुक्यातील हा ऐतिहासिक प्रकल्प समाजाच्या विकासाला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
समस्त धनगर समाजाने नामदार शंभूराज देसाई यांचे शतश: आभार मानले !

No comments:
Post a Comment