दौलतनगर दि.01:- पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये
विकास कामांच्या माध्यमातून गावांचा कायापालट करण्याचे काम करत असून सत्तेच्या
माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लागत असल्याने विरोधी गटातील कार्यकर्ते हे आज
मोठया संख्यने शिवसेना पक्षामध्ये प्रवेश
करत आहेत. जे कार्यकर्ते शिवसेना पक्षामध्ये आज प्रवेश करत आहेत, त्यांचे शिवसेना
पक्षामध्ये स्वागत असून ज्या विश्वासाने आपण माझे नेतृत्वामध्ये शिवसेना
पक्षामध्ये प्रवेश करताय त्यानुसार मतदारसंघातील गावांच्या सर्वांगीण विकासाबरोबर
दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून कटीबध्द
आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री
तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.
ते दौलतनगर
ता.पाटण येथे शिवसेना पक्ष जाहिर प्रवेश कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी डॉ.दिलीपराव चव्हाण, ॲङमिलिंद
पाटील,विजय पवार,पंजाबराव देसाई,विलास गोडांबे,विशाल पवार,दत्तात्रय चोरगे,मनोज
पाटील,सदानंद साळुंखे, गणेश भिसे, उत्तरामराव मोळावडे,पांडूरंग शिरवाडकर,सुनिल
पवार,पांडूरंग नलवडे,बबनराव भिसे,प्रकाशराव जाधव,विजय देशमुख,विकास गिरी गोसावी
यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी
धामणी येथील रामनगर, लोकरेआळी, बादेवाडी व पुजारी मंडळ, कवरवाडी,
चोरगेवाडी, शेंडेवाडी, दऱ्यातील मोरेवाडी, महिंद, बनपूरी, कुसवडे पुनर्वसन झाकडे,
नाटोशी या 10 गावांतील पाटणकर गटातील 250 ते 300 कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात
जाहिर प्रवेश केला. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे
स्वागत करत विकासासाठी कटीबध्द असल्याचे आश्वासित केले.
यावेळी
ना.शंभूराज देसाई म्हणाले की,विधानसभेच्या निवडणुकीला आठ महिन्यांचा कालावधी पूर्ण
झाला.आपण पाटण विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही विकास कामांच्या मुद्यावर लढवली. मतदारसंघातील
सर्व सामान्य जनतेने, मतदारांनी विश्वास दाखवला.त्यामुळे पाटण मतदार संघातील
जनतेने नेहमीच चढत्या क्रमांकाच्या मताधिक्याने विजयी केले.कारण मतदारसंघातील
जनतेला दिलेल्या आश्वासने पूर्ण करण्याचे काम सत्तेच्या कालावधीत केले.
आमदार,राज्यमंत्री तसेच आता राज्याचा कॅबिनेट मंत्री व सातारा जिल्हयाचा
पालकमंत्री म्हणून जिल्हयामध्ये व राज्यामध्ये काम करताना सातत्याने आपलं लक्ष हे आपल्या मतदारसंघावर ठेवले. कारण
ज्या विश्वासाने जनतेने निवडूण दिले आहे, तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली,
त्या जनतेच्या मतदारांच्या विकास कामांबाबतीत, सार्वजनिक प्रश्नांसाठी तसेच
वैयक्तीक काही अपेक्षा आपल्याकडे आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून त्या पूर्ण करणे हे
आपलं कर्तव्य समजूनच मी सातत्याने कार्यरत आहे. राज्यामध्ये कितीही व्यस्त काम
असले तरी शनिवार रविवार मतदारसंघामध्ये जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न
सोडविण्यासाठी प्रयत्नशिल आहे. एम मनाशी खूणगाठ बांधली आहे,काही झाले तरी
मतदारसंघातील जनतेशी असलेली नाळ ही कधी तुटू द्यायची नाही. लोकांच्या अडी अडचणीला
उपयोगी पडले पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या आमदार,मंत्रीपदाच्या
सत्तेचा वापर केला पाहिजे असे सांगत ते पुढे म्हणाले की, आज तब्बल 10 गावांमधील
पाटणकर गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश होत आहेत. कारण शेवटी
लोकांनी पाहिले आहे की किती दिवस विरोधात राहयचं.मुळ विकासाच्या प्रवाहात येऊन
कामे मार्गी लावायची, यात कसलाही व्यक्तीगत स्वार्थ नाही, गावाचा प्रश्न सुटला
पाहिजे,गावातील विकासाची कामे मार्गी लागली पाहिजेत.गावाच्या गरजेचे महत्त्वपूर्ण
कामे राहिली असतील ती पूर्ण झाली पाहिजेत याच भावनेतून हे पक्षप्रवेश होत आहेत.
लोकप्रतिनिधी म्हणून कधीच गटातटाचे राजकारण केले नाही. विकासाच काम करण्यासाठी
आपल्याकडे सत्ता आहे.आज जर विकासाच काम केले तर भविष्यात मतदान करताना आपला विचार
होणार आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे निधनानंतर सत्ता खेचून आणायला 21 वर्षे
लागली. गेली चार पिढया देसाई कुटुंबाबरोबर निष्ठेने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या
कार्यकर्त्यांच्यामुळे हे यश मिळाले. सन 2024 विधानसभा निवडणुकीत जास्त मतांनी आपण
निवडूण यायच हे सगळया पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी,सामान्य जनतेने ठरवले आणि सन
2024 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये 35000 मताधिक्क्य घेऊन विक्रमी मतांनी विजयी
झालो,याच सर्व श्रेय हे सामान्य जनतेचं असल्याचे सांगत दिलेला विश्वास कायम ठेवण्याचे काम आपण
सत्तेच्या मध्यमातून करतोय. तस जे नव्याने शिवसेनेत पक्षप्रवेश करताय त्यांनी
सुध्दा विश्वासाची परंपरा कायम ठेवावी. पक्षप्रवेश करताना काही विकासाची कामांची
मागणी असेल किंवा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जो शब्द दिला आहे जे आश्वासन दिले
आहे तो माझा शब्द आहे असे समजून त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी माझ्यावर
राहिल,असे शेवटी त्यांनी सांगीतले.
.jpeg)
No comments:
Post a Comment