Saturday, 18 May 2019

दि.२० मे रोजी दौलतनगरला कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा ६० वा पुण्यतिथी कार्यक्रम. पुण्यतिथीनिमित्त मुलींना शिष्यवृत्तीचे वितरण.




दौलतनगर दि.1८:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा ६० वा पुण्यतिथी कार्यक्रम रविवार दि. २० मे, २०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता “ महाराष्ट्र दौलत ” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर, ता. पाटण येथे आयोजीत करण्यात आला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू मुलींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणेकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने सुरु असलेल्या शिष्यवृत्तीचे वितरण लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते व सुप्रसिध्द चित्रकार दादासाहेब सुतार,कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून त्यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी दि. २० मे रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने साजरा करण्यात येतो. आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटण मतदारसंघातील गरीब व गरजू मुलींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. यंदाचे हे दहावे वर्ष असून आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील १२४ मुलींना प्रत्येकी ५००० रुपयेप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या ६० व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त यंदाच्या वर्षी नव्याने २२ मुलींना व मागील ५६ मुली असे एकूण ७८ मुलींना प्रत्येकी ५५०० रुपयेप्रमाणे कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्तीचे वितरण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. तसेच गरीब आणि गरजू कुटुंबातील मुलींना शिक्षणाकरीता हातभार लागावा याकरीता या शिष्यवृत्तीबरोबर वहया,शालेय गरजांच्या साहित्याचे वितरणही लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने करण्यात येते. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे यंदाच्या वर्षीच्या पुण्यस्मरण कार्यक्रम रविवार दि. २० मे २०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते व सुप्रसिध्द चित्रकार दादासाहेब सुतार,कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे संपन्न होणार आहे.या कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने पत्रकांत करण्यात आले आहे.

Thursday, 16 May 2019

टंचाई निवारण्याकरीता पाटण तालुक्यात ३१ नपापु योजनांच्या दुरुस्तीच्या कामांना 90.96 लाखांचा निधी मंजुर टंचाई आराखडयातील कामांना जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश.आमदार शंभूराज देसाईंचा पाठपुरावा यशस्वी.


                  
                           


दौलतनगर दि.16:-पाटण विधानसभा मतदारसंघात टंचाईच्या पार्श्वभूमिवर टंचाई निवारण्याकरीता जिल्हाधिकारी सातारा यांचेकडे सादर केलेल्या टंचाई आराखडयातील एकूण ३१ नळ पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीचे व १५ विंधन विहीरी (बोअर) मारण्याचे लेखी आदेश जिल्हाधिकारी सातारा यांनी दि.12 मे,2019 रोजी दिले आहेत. या कामांकरीता सुमारे 90 लाख 96 हजार रुपयांचा निधी मंजुर केला असल्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांचेकडून देण्यात आले आहेत.पाटण तालुक्यातील टंचाई परिस्थिती निवारण्याकरीता मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांचा सातत्याचा पाठपुरावा यशस्वी झाला असून ३१ नळ पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीचे व १५ विंधन विहीरी (बोअर) मारण्याची कामे लवकरात लवकर सुरु करावीत असे आदेश जिल्हाधिकारी,सातारा व आमदार शंभूराज देसाईंनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
                     सातारा जिल्हयामध्ये पिण्याच्या पाण्याची उद्भवलेली तीव्र टंचाई निवारणार्थ शासनामार्फत विविध उपाययोजना हाती घेणेत आल्या असून यामध्ये टंचाई काळात नादुरुस्त झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करणे, आवश्यक  त्याठिकाणी विंधन विहीरी (बोअर) मारणे, विहीरी खोल करुन पेयजल स्त्रोत बळकटीकरण करणे या कामांचा त्यामध्ये समावेश आहे. पाटण विधानसभा मतदारसंघात नादुरुस्त झालेल्या ३१ नळ पाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहीरी (बोअर) तसेच विहीरी खोल करुन पेयजल स्त्रोत बळकटीकरण करणे या कामांचा आराखडा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंचे मार्गदर्शनाखाली प्रातांधिकारी,तहसिलदार,गटविकास अधिकारी व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी तयार करुन जिल्हाधिकारी,सातारा यांचेकडे मान्यतेकरीता पाठविला होता.लोकसभा निवडणूकीची आचारंसहिता असले कारणाने या कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश प्राप्त झाले नव्हते, परंतू शासनाने टंचाईची परिस्थिती पहाता पाणी टंचाईसंदर्भात लोकसभेची आचारसंहिता शिथील करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे केल्यानंतर पाणी टंचाईच्या पार्श्वभूमिवर पाणी टंचाई आराखडयांना मंजुरी देणे तसेच मुलभूत गरजांची कामे सुरु करणे याकरीता शिथीलता देण्यात आलेनंतर आमदार शंभूराज देसाईंनी जिल्हाधिकारी, सातारा श्रीमती श्वेता सिंगल यांची भेट घेवून पाणी टंचाई आराखडयातील कामांना मंजुरी देण्याचे आदेश दयावेत अशी आग्रही मागणी केल्यानंतर पाटण विधानसभा मतदारसंघातील नादुरुस्त झालेल्या ३१ नळ पाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करणे तसेच आवश्यक  त्या 15 ठिकाणी विंधन विहीरी (बोअर) मारणे या कामांना मंजुरी दिली असल्याचे आदेश दिले आहेत.यामध्ये विशेष दुरुस्ती  नळ पाणी पुरवठा योजनांची कामांमध्ये मेंढेघर कोंढावळे  04.39 लाख, मेंढेघर कदमवाडी 03.72 लाख, रिसवड नाव 02.03 लाख, कुसरुंड पवारवस्ती 02.05 लाख, सलतेवाडी बिबी 02.55 लाख, ठोमसे 02.99 लाख, कामरगाव 02.26 लाख,पाठवडे बाटेवाडी 04.43 लाख,पाठवडे बौध्दवस्ती 02.62 लाख, झाकडे बौध्दवस्ती 0.48 हजार, ढोकावळे नाव 02.07 लाख, आंब्रुळे  01.69 लाख, पाचगणी 02.39 लाख, गुरेघर 04.93 लाख, वायचळवाडी 03.75 लाख,चाळकेवाडी 0.63 हजार, जळव 01.83 लाख,मस्करवाडी 01.71 लाख, धनावडेवाडी निगडे 01.21 लाख, करपेवाडी काळगाव 07.82 लाख, सुपुगडेवाडी 2.30 लाख,भरुगडेवाडी मंद्रुळकोळे 1.89 लाख,चाफेर मुस्लिमवस्ती 1.64 लाख, शिंदेवाडी 8.51 लाख,गणेवाडी ठोमसे 4.66 लाख, शिद्रुकवाडी धावडे 0.70 हजार तर विहिर खोल करणे, गाळ काढणे व आडवी बोअर घेणे अंतर्गत सोनवडे 01.97 लाख, मुठ्ठलवाडी 01.66 लाख, बोडकेवाडी 0.97 हजार, बहुले 01.06 लाख, चाहुरवाडी नाणेगाव 01.48 लाख या कामांना मंजूरी देण्यात आली आहे.तर विंधन विहिर डेरवण,कुंभारगाव माटेकरवाडी,मालोशी पाडेकरवाडी,मोरगिरी,सळवे कदमवस्ती,सळवे सदुवर्पेवाडी, तामिणे गावठाण,तामिणे बौध्दवस्ती,तामिणे जि.प.शाळा,काळगाव लोटलेवाडी,काठी टेक,वाघजाईवाडी, विहे धुमाळवस्ती, तळीये पश्चिम सुतारवाडी,पाणेरी यमकरवस्ती या गांवाचा समावेश आहे.पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन सदरच्या कामांची तातडीने निविदा प्रक्रिया करण्यात येऊन लवकरच सदरची कामे हाती घेण्यात यावीत असे जिल्हाधिकारी, सातारा व आमदार शंभूराज देसाईंकडून संबधितांना सुचित करण्यात आले असून अजुनही पाटण मतदारसंघात ८ ठिकाणी नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती व १७ गांवामध्ये विंधन विहीरी (बोअर) मारणेकरीता मंजुरी मिळणे गरजेचे असून दुसऱ्या टप्प्यात याही कामांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी,सातारा यांचेकडे सादर करण्यात आला असून यासही लवकरच मंजुरीचे आदेश प्राप्त होतील असे आमदार शंभूराज देसाईंकडून सांगण्यात आले आहे.
चौकट:- धरणाच्या पाण्यांचे योग्य नियोजन केल्याने टंचाईची दाहकता कमी- आमदार देसाई.
            पाटण तालुक्यातील कोयना, मोरणा, तारळी, उत्तरमांड, वांग मराठवाडी व महिंद या धरणातील पाणीसाठयाचे योग्य नियोजन केल्यामुळेच तालुक्यातील जनतेला पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याची टंचाई काळातही योग्य सोय होवू शकली. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळेच तालुक्यात टंचाईची दाहकता कमी प्रमाणात जाणवली असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.

Wednesday, 8 May 2019

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमिवर कोयना धरणातील पाणी राज्याबाहेर देवू नये.आमदार शंभूराज देसाईंची मुख्यमंत्री,जलसंपदा मंत्री यांचेकडे लेखी मागणी.


                            
        
              

दौलतनगर दि.०८:- महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये आज तारखेला गतवर्षीच्या तुलनेत 10 टीएमसी इतके पाणी कमी असून या पार्श्वभुमिवर तसेच यंदाच्या वर्षीचा पावसाळा सुरु होण्याकरीता एक ते सव्वा महिना अवकाश असल्याने उपलब्ध पाणीसाठा पावसाळयापर्यंत पुरणार का नाही याबाबत सर्वांनाच साशंकता वाटत असून शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांकरीता उपलब्ध पाण्याची पाणीटंचाई काळात गरज असल्याने पाणी टंचाईच्या पार्श्वभूमिवर कोयना धरणातील पाणी राज्याबाहेर देवू नये अशी आग्रही मागणी पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांना लेखी पत्राव्दारे केली आहे.
                        मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांना दिलेल्या लेखी पत्रामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये आज तारखेला एकूण 34.89 टीएमसी इतकाच पाणी साठा शिल्लक आहे.यातील 17.64 टीएमसी इतके पाणी हे वीजनिर्मितीकरीता राखीव असून उर्वरीत 17.00 टीएमसी मधील अंदाजे 6.00 टीएमसी पाणीसाठा हा मृत साठा असून केवळ 10.00 टीएमसी पाणीसाठा हा उपयुक्त आहे, गतवर्षीचे तुलनेत हा पाणीसाठा अंदाजे 10.00 टीएमसी ने कमी असून कोयना धरणातील सध्याच्या उपलब्ध पाणीसाठयाची ही परिस्थिती आहे. कर्नाटक राज्याच्या मागणीनुसार त्यांना यावर्षीच्या हंगामामध्ये आवश्यक असणारे पाणी यापुर्वीच देण्यात आले आहे.यंदाच्या वर्षीचा पावसाळा सुरु होण्याकरीता एक ते सव्वा महिना अवकाश असल्याने उपलब्ध पाणीसाठा पावसाळयापर्यंत पुरणार का नाही याबाबत सर्वांनाच साशंकता वाटत आहे. कोयना धरण पाटण तालुक्यात असले तरी पाटण तालुक्यातही यंदाच्या वर्षी पाणी टंचाईंने तीव्र स्वरुप धारण केले आहे.पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागाकरीता टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.तर नदीकाठी वसलेल्या गांवाना कोयना नदीतूनच पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे.तसेच शेतीसाठीही तालुक्यातील शेतकरी हे कोयना नदीतूनच उपसा करीत असल्याने कोयना धरणातील पाण्याची पाटण तालुक्यातील जनतेला आणि शेतकऱ्यांना प्राधान्यांने गरज भासत आहे.दरम्यान धरणामध्ये 10.00 टीएमसी एवढेच पाणी शिल्लक असल्याने उपलब्ध असणारा पाणी साठा राखून ठेवणे याकरीता पाटबंधारे विभागाला कसरत करावी लागत आहे.एैन टंचाईच्या काळात शेतीसाठी वापरात येणाऱ्या पाण्यावर तसेच पिण्याच्या पाण्यावर निर्बंध आल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या चांगल्या आलेल्या पिकांचे पाण्याअभावी नुकसान होवू शकते व पिण्याच्या पाण्याकरीता नागरिकांना मोठया प्रमाणात वणवण करावी लागेल. या सर्व बांबीचा गांभीर्याने विचार करुन कर्नाटक राज्याला कोयना धरणातून यापुर्वी सोडण्यात आलेल्या पाण्याव्यतिरिक्त जादाचे वाढीव पाणी न सोडणेबाबत आपणांकडून संबधितांना आदेश करावेत अशी आग्रही विनंती आमदार शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांना लेखी पत्रामध्ये केली आहे.

आचारसंहिता शिथील होताच पाटणच्या आमदारांनी सुरु केला कामांचा आढावा. पाणीटंचाईची बैठक घेवून तात्काळ उपाययोजना करण्याच्या केल्या सुचना.



दौलतनगर दि.०८:- लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता असलेमुळे अनेक मुलभूत गरजा असणारी विविध विकासकामे मोठया प्रमाणात प्रलंबीत राहिली होती.यामध्ये महत्वाचे पाणी टंचाईच्या काळात करावयाच्या उपाययोजना प्रलंबीत राहिल्यामुळे डोंगरी व दुर्गम अशा पाटण मतदारसंघातील डोंगरपठारावरील गांवाना पाणी टंचाई भासत होती.विकासकामांमध्ये कायम तत्पर असणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी  लोकसभेची आचारसंहिता शिथील होताच प्राधान्याने मतदारसंघातील पाणी टंचाईचा तहसिल कार्यालय पाटण येथे आढावा घेवून पाणी टंचाईसंदर्भात आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना तात्काळ कराव्यात अशा सक्त सुचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
                         आमदार शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालय येथे पाटण तालुक्यात जाणवणाऱ्या पाणी टंचाई संदर्भात आढावा व करावयाच्या उपाययोजना संदर्भात बैठक आयोजीत करण्यात आली होती. याप्रंसगी बैठकीस प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील,पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,नायब तहसिलदार लोंढे,कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता गायकवाड, उपअभियंता गरुड,पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता आरळेकर,पाणी पुरवठा विभागाचे सर्व शाखा अभियंता, विस्तार अधिकारी यांची बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.
                       प्रांरभी आमदार शंभूराज देसाईंनी माहे डिसेंबर मध्ये करण्यात आलेल्या पाणी टंचाई आराखडयातून किती कामे मंजुर झाली व लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे किती कामे मंजुर होणे प्रलंबीत राहिली आहेत याची सविस्तर माहिती पाणी पुरवठा अधिकारी यांचेकडून घेतली. यामध्ये पाटण तालुक्यातील डोंगरपठारावरील वाडयांना टंचाई काळात टँकरने पाणी पुरविण्याची संख्या आता पाच ते सहा एवढीच राहिली आहे परंतू डोंगरपठारावरील गावामध्ये तसेच वाडयावस्त्यांवर विंधन विहीरी काढून देण्याची तसेच नादुरुस्त झालेल्या नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्त करुन देण्याची मोठया प्रमाणात मागणी आहे.माहे जुन पर्यंतच पाणी टंचाई आराखडा आपण माहे डिसेंबरमध्येच तयार करुन दिला असून त्यातील बहूतांशी कामे मंजुरही झाली आहेत उर्वरीत पुरवणी आराखडयातील कामांना आचारसंहिता असल्याने मंजुरी मिळाली नाही.आचारसंहिता आता शिथील झाली असून पुरवणी आराखडयातील कामांना तात्काळ मंजुरी घेवून पाणी टंचाईच्या आवश्यक त्या उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असून टंचाई आराखडयातील किती कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी,सातारा यांचेकडे मंजुरीकरीता सादर करण्यात आले आहेत व किती प्रस्ताव सादर करणे बाकीचे आहेत त्याची माहिती गटविकास अधिकारी व पाणी पुरवठा उपअभियंता यांनी तात्काळ दयावी. पाणी टंचाईच्या संदर्भात दोनच दिवसापुर्वी मी जिल्हाधिकारी, सातारा यांची भेट घेतली असून पाणी टंचाईचे प्रस्ताव सादर होताच त्यास मंजुरी देण्यात येईल असे त्यांनी मला स्पष्ट सांगितले आहे. पाणी टंचाईमुक्तीकरीता लागणारा निधी आणण्यास मी कुठेही कमी पडणार नाही परंतू पाणी टंचाईच्या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांनी अजिबात हयगय करु नये अशा सूचनाही आमदार शंभूराज देसाई यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
                दरम्यान आचारसंहितेपुर्वी ६ गांवामध्ये विंधन विहीरी काढण्याचे काम पुर्ण झाले आहे तर ९ कामांना मंजुरी देण्यात आली आहे ३ विंधन विहीरीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. तात्पुरुती नळ पाणी पुरवठा योजना १ काम पुर्ण, १ मंजुर व दोन कामांचे प्रस्ताव सादर, नळ पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीमध्ये १ सुरु ३ प्रगतीपथावर व १९ कामांना मंजुरी मिळणे आवश्यक‍ आहे तसेच विहीर खोलीकरण करणेमध्ये ४ कामांना मंजुरी मिळणे आवश्यक असल्याचा गोषवारा आमदार शंभूराज देसाईंनी संबधित अधिकारी यांचेकडून घेवून येत्या दोनच दिवसात मंजुर करावयाची कामे घेवून जिल्हाधिकारी, सातारा यांची पुन्हा भेट घेवून या कामांना मंजुरी घेण्यात येईल असे आमदार देसाईंनी सांगून कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता यांचेकडून कोयना धरणातील सध्याच्या पाणीसाठयासंदर्भात सविस्तर माहिती घेवून सध्या कोयना धरणात पाणीसाठा कमी आहे. नदीच्या दोन्ही बाजुच्या गांवाना पावसाळा येण्यापुर्वी शेतीकरीता दोन टप्प्यात पाणी देण्याची गरज आहे तर पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरु राहणेकरीता नदीमध्ये पाणी असणे गरजेचे आहे.धरणातील पाणी बाहेर जाण्यापुर्वी आपल्या मतदारसंघातील वस्तूस्थिती शासनाकडे सादर करावी व पहिले प्राधान्य सातारा जिल्हयाला दयावे असेही त्यांनी यावेळी सांगून कोयना धरणातील सध्याची पाणी परिस्थिती पहाता कोयनेचे पाणी राज्याबाहेर देवू नये अशी मागणी मी राज्याचे मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांचेकडे करणार असल्याचेही यावेळी बोलताना सांगितले. तसेच महिंद धरणातील पाणी जानुगडेवाडी, मंद्रुळकोळेपर्यंत येत नाही सोडलेले पाणी या गांवापर्यंत येईल अशीही तरतूद करावी अशा सुचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
चौकट:- आचारसंहिता शिथील झालीय कामाला लागा- आमदार देसाई.
आचारसंहिता होती तरी तालुक्यातील पाणी टंचाईसंदर्भात माझा संबधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा होता.त्यामुळे बहूतांशी गांवाच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली आता आचारसंहिता शिथील झालीय उर्वरीत राहिलेल्या कामांना गती देण्याकरीता पाणी टंचाई झाली की बांधकाम विभागाचाही आढावा घेणार असून आता कामाला लागा अशा सुचना आमदार शंभूराज देसाईंनी मतदारसंघातील अधिकाऱ्यांना दिल्या.

Tuesday, 30 April 2019

पाटणला आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण संपन्न. आमदार शंभूराज देसाईंनी जनतेला दिल्या महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा.



         
दौलतनगर दि.२८:- देशातील प्रगतशील राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची ओळख असून विकासाच्या केंद्रीकरणातून महाराष्ट्र राज्य सर्वच क्षेत्रात आज आघाडीवर आहे. दि. ०१ मे हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस असून आज महाराष्ट्र राज्य निर्मितीचा ५९ वा वर्धापनदिन मोठया उत्साहात संपुर्ण महाराष्ट्र राज्यात संपन्न होत आहे. ज्या १०५ हुतात्मांमुळे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्या १०५ हुतात्मांना विनम्र अभिवादन करुन महाराष्ट्र राज्य निर्मितीचा मंगल कलश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्यात आणला त्यामध्ये पाटण तालुक्याचे सुपुत्र स्व.लोकनेते बाळासाहेब देसाई हे त्यामध्ये अग्रभागी होते. १०५ हुतात्म्यांना तसेच महाराष्ट्र राज्याची निर्मिती करणाऱ्यां या सर्वांच्या स्मृतींना उजाळा देणे,त्यांच्या कार्याचा गौरव करणे हे महाराष्ट्र राज्यातील जनतेचे,नागरिकांचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी केले.
                       महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या ५९ व्या वर्धापनदिनानिमित्त दि.०१ मे रोजीचे ध्वजारोहण पाटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून उत्कृष्ट संसदपटू आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते पाटण तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात पार पडले यावेळी महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना ते बोलत होते. याप्रंसगी पाटण उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले, पाटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे यांच्यासह स्वातंत्रसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबिय, माजी सैनिक, पाटण मतदारसंघातील विविध संस्थांचे पदाधिकारी, तालुकास्तरीय सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
                   महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,ज्या १०५ हुताम्यांच्या योगदानामुळे आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य असून पाटण मतदारसंघाचा प्रथम नागरिक म्हणून मी प्रथमत: पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने या १०५ हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करतो. गेली ५९ वर्षे राज्य शासन महाराष्ट्र राज्यातील जनतेकरीता लोककल्याण योजना राबवित आहे.आपले महाराष्ट्र राज्य देशातील प्रगतीशील राज्य व्हावे,राज्यातील जनतेच्या अपेक्षा पुर्ण व्हाव्यात याकरीता राज्य शासनाकडून कसोसीने प्रयत्न सुरु असून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी गेली चार वर्षे चांगले योगदान देवून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.आज आपले महाराष्ट्र राज्य विविध क्षेत्रामध्ये प्रगतीची विविध शिखरे पादाक्रांत करीत आहे. याचा अभिमान वाटतो.मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर प्रयत्नातून राज्याच्या विविध भागामध्ये आमुलाग्र बदल होत आहेत.शासनाच्या विविध योजना सामान्य घटकांपर्यंत पोहचविण्याकरीता शासनामार्फत अनेक प्रयत्न केले जात आहेत. आपल्या मतदारसंघांचा आमदार  या नात्याने राज्याच्या विविध योजना मतदारसंघात प्रभावीपणे राबविण्याकरीता मी गेली चार वर्षे कसोशीने प्रयत्न केला असून हा प्रयत्न भविष्यातही असाच सुरु राहणार आहे. सामान्या घटकांचा विकास करणे ही आपली जबाबदारी असून विकासाचे उदीष्ठ पुर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे यामध्ये तालुकास्तरीय सर्व जनतेने, शासकीय अधिकारी यांनी मोठे योगदान दिले आहे ते पुढेही दयावे असे आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी आवाहन करीत पाटण मतदारसंघातील तमाम जनतेला त्यांनी महाराष्ट्र व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित स्वातंत्रसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबिय, माजी सैनिक यांचे आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.



Tuesday, 23 April 2019

दौलतनगरच्या श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची दशकपुर्ती उत्साहात साजरी. लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. भव्यदिव्य दिंडी व रिंगण सोहळयाने दौलतनगरला भक्तीमय वातावरण






         
               महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे प्रतिवर्षी साजऱ्या होणाऱ्या तीनदिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची यंदाच्या वर्षी मोठया उत्साहात दशकपुर्ती साजरी करण्यात आली.पारायण सोहळयाच्या शेवठच्या दिवशी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा ३६ वा पुण्यस्मरण सोहळा मोठया उत्साहात पार पडला.पुण्यतिथीदिवशी तीन दिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाच्या निमित्ताने भव्य दिव्य दिंडी सोहळयाने श्री.ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात येवून कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयावर आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण व पुतळयावर पुष्पवृष्टी करुन पारायण सोहळयातील भाविक भक्तांच्या उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांना विन्रम अभिवादन करण्यात आले.भव्यदिव्य दिंडी व रिंगण सोहळयाने दौलतनगरला सकाळपासून भक्तीमय वातावरण होते.
             दौलतनगर ता.पाटण येथील दौलत औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या भव्य प्रांगणात लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त गत नऊ वर्षापासून सुरु असलेल्या श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे यंदाचे दहावे वर्ष होते.या पारायण सोहळयामध्ये ३७७ महिला तसेच ३६७ पुरुषांसह ७४४ वाचक सहभागी झाले होते.तसेच तालुक्या बाहेरीलही भाविक भक्त या सोहळयामध्ये मोठया संख्येने सहभागी होते.तर वारकरी साप्रंदयातील विविध मान्यवरांची प्रवचने,कीर्तने तसेच गावोगावच्या भजनांचे जागराचे कार्यक्रम यानिमित्ताने आयोजीत करण्यात आले होते.या संपुर्ण पारायण सोहळयामध्ये आमदार शंभूराज देसाई,श्रीमती विजयादेवी देसाई मॉसाहेब,रविराज देसाई, सौ.स्मितादेवी देसाई, सौ.अस्मितादेवी देसाई,यशराज देसाई, ईश्वरी देसाई,जयराज देसाई,आदित्यराज देसाई,प्रकाश देसाई यांचा विशेष सहभाग होता.तर ह.भ.प.जयवंतराव शेलार महाराज, ह.भ.प.अनिल पाटील महाराज, ह.भ.प.जगन्नाथ ठोंबरे महाराज यांच्यासह त्यांचे सहकारी यांचाही सहभाग होता.
          तीन दिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वर ग्रंथाचे वाचन पुर्ण झालेनंतर लोकनेते यांचे पुण्यतिथी दिवशी फुलाने सजविलेल्या पालखीत श्री.ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमा ठेवून टाळ मृदुंगाच्या तालावर,डोक्यावर कलश,तुळशी वृंदावन घेतलेल्या सुहासिनी ढोल वाद्यांसमवेत श्री.विठ्ठल नामाचा तसेच ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली यांचे गजरात आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयघोषात माऊलीच्या मंडपातून निघालेल्या भव्य दिंडीला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे मेघडंबरी येथून सुरुवात करण्यात आली.पारायण सोहळयाची भव्य दिंडी ही कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर आलेनंतर आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते पुतळयासमोर प्रथमत: ध्वजारोहण करण्यात येवून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळयावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच २१ तोफांची सलामी देण्यात आली तर पुतळयासमोर अभंग व आरती करुन लोकनेते यांचा ३६ वा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर पुतळ्यासमोर भव्य असा रंगलेला रिंगण सोहळा हे दृष्य अत्यंत मनमोहक होते. चौथ्या दिवशी काल्याच्या किर्तनाने उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद देवून या अखंड हरीनाम भव्य सोहळ्याची सांगता करण्यात आली. दरम्यान या पारायण सोहळयामध्ये सलग १० वर्षे वाचक म्हणून सहभागी झालेल्या एकूण ३० भाविकांचा व वाचक महिलांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला. पुण्यतिथी दिवशी दौलतनगरला प्रती पंढरपुर अवतरले होते. गत नऊ वर्षापासून ह.भ.प.पुडंलिक महाराज कापसे आळंदीकर हे या पारायण सोहळ्यामध्ये व्यासपीठ चालक म्हणून आपली सेवा बजावीत आहेत. यंदाचा सोहळयातही त्यांनी व्यासपीठ चालक म्हणून सेवा बजावली तर हा पारायण सोहळा यशस्वी करण्याकरीता आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ.प.जयवंतराव शेलार महाराज,ह.भ.प.अनिल पाटील महाराज,ह.भ.प.जगन्नाथ ठोंबरे महाराज यांच्यासह त्यांचे सहकारी यांचेसोबत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील अधिकारी कर्मचारी यांनी कष्ट घेतले. या सर्वांचे आभार आमदार शंभूराज देसाईंनी मानले.या सोहळ्यास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
चौकट- रिंगणसोहळ्याने भाविक भक्त भारावले.
         लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी निमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुतळ्यास अभिवादन केलेनंतर पुतळ्यासमोर प्रतिवर्षी साजरा करण्यात येणारा रिंगण सोहळा हा या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असते, या रिंगण सोहळ्यामध्ये अबाल वृध्दासंह लहानथोर सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. पंढरपुरच्या वारीमध्ये ज्याप्रमाणे रिंगण सोहळा आयोजित केला जातो. त्याचप्रमाणे या ठिकाणीही रिंगण सोहळा आयोजित करण्यात येतो याचे नेतृत्व स्वत: आमदार शंभूराज देसाई करतात. यंदाच्या रिंगण सोहळ्यास भाविक भक्तांची मोठी गर्दी होती. हा रिंगण सोहळा पाहून उपस्थित भाविक भक्त भारावून गेले.

Saturday, 20 April 2019

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त पाटण तालुक्यात प्रतिपंढरीचे रुप. दौलतनगरला श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास उत्साहात प्रारंभ.



               महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,पाटण तालुक्यातील जनतेचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख, पाटण तालुक्याचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह व पाटण तालुका वारकरी संघ यांचे सौजन्याने दौलतनगर, ता. पाटण येथील दौलत औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे भव्य प्रांगणात मागील नऊ वर्षाप्रमाणे यंदा दहाव्या वर्षी लोकनेते बाळासाहेब देसाई नगरीमध्ये भव्य प्रमाणांत श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचा प्रारंभ शनिवार दि.२० एप्रिल,२०१९ रोजी हजारो भाविक भक्तांच्या उदंड प्रतिसादाने भक्तीमय वातावरणात ह.भ.प.जयवंतराव शेलार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रंजना जयवंतराव शेलार यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करुन तसेच उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई व त्यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई यांचे शुभहस्ते श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करुन करण्यात आला.
             दौलतनगर ता.पाटण येथे सन २०१० या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून भव्य प्रमाणांत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येत असून गत नऊ वर्षात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास पाटण तसेच शेजारील तालुक्यातील भाविकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता लोकनेते बाळासाहेब देसाई यांची प्रतिवर्षीची पुण्यतिथी हि दि. २० ते २३ एप्रिल अशी तीन दिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयानेच साजरी करण्यात येत आहे. दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात भव्य मंडपात सुरु झालेल्या पारायण सोहळयामध्ये ३७७ महिला तसेच ३६७ पुरुषांसह ७४४ वाचक सहभागी झाले आहेत.
               महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाच्या निमित्ताने तालुक्यातील तसेच शेजारील तालुक्यातील किर्तनकार,प्रवनचनकारांना तालुकास्तरीय व्यासपिठ निर्माण झालेले असून प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी पाटण तालुक्यातील दौलतनगरला लोकनेते बाळासाहेब देसाई नगरीमध्ये पारायण सोहळयामुळे प्रति पंढरीचे रुप अवतरले असल्याचे चित्र दिसत आहे. गतवर्षी प्रमाणे यंदाच्याही वर्षी वाचकांनी पारायण सोहळयास चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रतिवर्षावर्षाप्रमाणे व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प.पुंडलिक महाराज कापसे, आळंदीकर हे उपस्थित असून शनिवार दि. २० एप्रिल २०१९ रोजी हभप सचिन महाराज कदम,आळंदी यांचे प्रवचन,हभप संजय महाराज कावळे,आळंदी यांचे किर्तन,रविवार दि. २१ एप्रिल, २०१९ रोजी हभप दादा महाराज तुळसणकर यांचे प्रवचन तर हभप महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचे किर्तन आणि सोमवार दि.२२ एप्रिल,२०१९ रोजी हभप मधुकर महाराज दिक्षीत,मसूर यांचे प्रवचन तर हभप ॲङ जयवंत महाराज बोधले, पंढरपूर यांचे किर्तन होणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३६ व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त मंगळवार दि. २३ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ७.३० ते ८.३० वा.आमदार शंभूराज देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.स्मितादेवी देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा व पुतळयावर पुष्पवृष्टी आणि विनम्र अभिवादन व नंतर रिंगण सोहळा होणार असून त्यानंतर सकाळी १० ते १२ वा.पर्यंत हभप वेदांतचार्य श्रीकृष्णानंद शास्त्रीजी,गोकूळ शिरगाव,वृंदावनधाम करवीर कोल्हापूर यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह, दौलतनगर यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर पारायणाची सांगता करण्यात येणार आहे.
                 या पारायण सोहळयाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचे विचाराने या तालुक्यात आपण कार्य करीत आहोत. त्यांनी व स्व.आबासाहेब यांनी घालून दिलेला आदर्श पुढे नेण्याकरीता आपले सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जन्मशताब्दी निमित्त सुरु झालेला हा पारायण सोहळा अखंडीत गेली ९ वर्षे सुरु आहे.या पारायणाच्या निमित्ताने पाटण तालुक्यातील जनतेच्या वतीने प्रत्येक वर्षी लोकनेतेसाहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन होत आहे.प्रतिवर्षी या पारायण सोहळयास पाटण तालुक्यासह इतर तालुक्यातील भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो हे पाहून आपल्या हातून चांगले काम पारायणाच्या निमित्ताने होत आहे म्हणून मी स्वत:ला खुप भाग्यवान समजतो,लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण सर्वांनी निश्चय केलेप्रमाणे लोकनेते साहेबांच्या कर्मभूमित त्यांचे कार्य नव्या पिढीला समजावे याकरीता आपण शासनाच्या वतीने महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक उभारले आहे.या शताब्दी स्मारकाचे उदघाटन नुकतेच जानेवारी महिन्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांचे हस्ते संपन्न झाले असून हे शताब्दी स्मारक संगळयांना पाहणेकरीता खुले करण्यात आले आहे.वर्षातून एकदा आपण सर्व भाविक मंडळी पारायणाच्या निमित्ताने येथे येता.वाचनातून आपल्याला लोकनेते साहेब यांचे कार्य ज्ञात होत आहेच परंतू लोकनेते साहेबांचे प्रत्यक्ष कार्य या शताब्दी स्मारकांच्या माध्यमातून उलघडत असून पारायणातून थोडासा वेळ काढून येथे आलेल्या व येणाऱ्या भाविकांनी या शताब्दी स्मारकाची नक्की पहाणी करावी असे सांगून त्यांनी पारायण सोहळयामध्ये काही त्रुटी आढळल्यास भाविकांनी नक्की सांगाव्यात त्यात सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न राहील असेही ते म्हणाले. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, जयराज देसाई, आदित्यराज देसाई,कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,ह.भ.प. पुंडलिक महाराज कापसे आळंदीकर,ह.भ.प.अनिल महाराज पापर्डेकर,ह.भ.प.जगन्नाथ महाराज ठोंबरे व कारखान्याचे सर्व संचालक मंडळ तसेच सर्व पंचायत समिती,जिल्हा परिषद सदस्य,विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी व लोकनेते प्रेमी जनतेची मोठया प्रमाणांत उपस्थिती होती. प्रारंभी आमदार शंभूराज देसाई यांनी यंदाच्या दहाव्या वर्षी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास उपस्थित असणाऱ्या वाचकांचे शाब्दिक स्वागत केले व या पारायण सोहळयास प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार ही मानले.