Thursday, 18 May 2023

दौलतनगर,ता.पाटण येथे दि.२० मे रोजी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची 64 वी पुण्यतिथी. मंत्री ना.शंभूराज देसाई यांची राहणार प्रमुख उपस्थिती.

दौलतनगर दि.१८:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची 64 वी पुण्यतिथी शनिवार दि.२० मे, २०२3 रोजी सकाळी १०.०० वा. “ महाराष्ट्र दौलत ” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात येणार आहे.प्रतिवर्षाप्रमाणे कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथीनिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू मुलींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणेकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने सुरु असलेल्या शिष्यवृत्तीचे वितरण पालकमंत्री ना.शंभूराज  देसाई यांचे शुभहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी दि.२० मे रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने साजरा करण्यात येते. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटण मतदारसंघातील गरीब व गरजू मुलींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील 179 हुन अधिक मुलींना प्रत्येकी ५5०० रुपयेप्रमाणे पदवी पर्यंतच्या शिक्षणाकरीता शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. गरजू कुटुंबातील मुलींना शिक्षणाकरीता हातभार लागावा याकरीता या शिष्यवृत्तीबरोबर वहया,शालेय गरजांच्या साहित्याचे वितरणही करण्यात येते. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची यंदाच्या वर्षीची 64 वी पुण्यतिथी शनिवार दि. २० मे २०२3 रोजी सकाळी १०.०० वाजता “ महाराष्ट्र दौलत ” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देर्स(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याचे शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.

Monday, 8 May 2023

मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते शासन आपल्या दारी योजनेचा सातारा जिल्हयात शनिवारी दौलतनगर येथे शुभारंभ. शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत 25000 पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष मिळणार लाभ.

  दौलतनगर दि.08:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे संकल्पनेतून राज्य शासनाचेवतीने सध्या सर्वत्र शासन आपल्या दारी ही योजना राबविण्यात येत आहे.राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्हयात शासन आपल्या दारी या योजनेचा राज्यस्तरीय  शुभारंभ हा राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई व इतर सन्माननीय मंत्री महोदय यांचे प्रमुख उपस्थितीत शनिवार दि. 13 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता दौलतनगर,ता.पाटण येथे होणार असून याप्रसंगी शासन आपल्या दारी योजने अंतर्गत पाटण तालुक्यातील 25000  लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ देणारा मेळावा व जाहिर सभाही होणार असल्याची माहिती  राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

 प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे संकल्पनेतून राज्य शासनाचेवतीने सध्या सर्वत्र शासन आपल्या दारी ही योजना संपूर्ण राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.या योजनेमध्ये बळीराजाच्या उन्नतीसाठीच्या योजना,महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना,सीमांत शेतकरी गट बांधणी योजना,केंद्र पुरुस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना,पीक कर्ज योजना,मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना,पशुसंवर्धन योजना,मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम,प्रधानमंत्री स्वनिधी योजना,प्रधानमंत्री मुद्रा योजना,प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना,मुख्यमंत्री सहायता निधी योजना,सामाजिक न्यायामध्ये संजय गांधी निराधार योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती योजना,अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे योजना,अपंग मुदत कर्ज योजना,शैक्षणिक कर्ज योजना,सुक्ष्म वित्त पुरवठा योजना,थेट कर्ज योजना,पंडीत दिन दयाळ उपाध्याय घरकूल खरेदी करीता येाजना,प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण),बांधकाम कामगार योजना,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना,कलाकारांसाठी योजना,महिलांसाठीच्या योजना यामध्ये किशोरी सबला योजना,महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन जोती योजना,घरगुती कामगारांसाठी कामगार योजना,प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना,बेबी केअर किट योजना,मोफत शिलाई मशीन योजना,मच्छीमार बांधवांसाठी योजना यामध्ये किसना क्रेडीट कार्ड योजना,अवरुध्द पाण्यात मत्स्यसंवर्धन योजना,मासेमार संकट निधी निवारण योजना,मासेमार खरेदीच्या साधनांवर अर्थसहाय योजना,ऊस तोड कामगार नोंदणी,आदिवासी प्रवर्गामध्ये शिक्षणासाठी योजना,आदिवासी सबलीकरण योजना महा रोजगार मेळावा,महाआरोग्य शिबीर, चष्मे वाटप,दिव्यांगाना साहित्य वाटप,या विविध शासकीय विभागामधील योजनांचा शासन आपल्या दारी या योजनेमध्ये समावेश आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्हयात शासन आपल्या दारी या योजनेचा राज्यस्तरीय  शुभारंभ हा राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई व इतर सन्माननीय मंत्री महोदय यांचे प्रमुख उपस्थितीत होणार असून शासन  आपल्या दारी योजने अंतर्गत पात्र 25000  लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ देणारा मेळावा व जाहिर सभा शनिवार दि. 13 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता दौलतनगर,ता.पाटण येथे होणारअसून या विविध योजनांमधील वैयक्तिक व सामुहिक लाभार्थ्यांना लाभवस्तू व प्रमाणपत्र वाटप महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते शनिवार दि. 13 मे 2023 रोजी करण्यात येणार आहे.तरी  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे संकल्पनेतून राज्य शासनाचेवतीने राबविण्यात येत असलेल्या  शासन आपल्या दारी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन शनिवार दौलतनगर ता.पाटण येथे आयोजित मेळयास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शेवटी पत्रकांत केले आहे.

 चौकट: बेराजगार युवक युवतींसाठी महारोजगार मेळावा व मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे संकल्पनेतून राज्य शासनाचेवतीने सध्या सर्वत्र शासन आपल्या दारी या योजनेच्या सातारा जिल्हयातील शुभारंभप्रसंगी बेरोजगार युवक व युवतींसाठी पंडीत दिन दयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून या मेळाव्याकरीता नामांकित कंपन्यांचा सहभाग असून बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याने बेरोजगार युवक व युवतींनी याचा लाभ घ्यावा.तसेच मोफत सर्वरोग निदान शिबीराचेही आयोजन केले असून या आरोग्य शिबीरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची आवश्यक ती तपासणी करुन त्यांना वैद्यकीय औषधोपचार करण्यात येणार असल्याने याचाही लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा.

Sunday, 23 April 2023

दौलतनगर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात साजरा. लोकनेते बाळासाहेब देसाई यांना 40 व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. भव्यदिव्य दिंडी व रिंगण सोहळयाने दौलतनगरला भक्तीमय वातावरण

  दौलतनगर दि.२३:-महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथीनिमित्त पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे प्रतिवर्षी साजऱ्या होणाऱ्या तीन दिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा यंदाच्या वर्षी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी दिवशी तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाच्या निमित्ताने भव्य दिव्य दिंडी सोहळयाने श्री.ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते साहेब यांचे पुर्णाकृती पुतळा परिसरात महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन पुर्णाकृती पुतळयावर व स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधीस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करत पारायण सोहळयातील भाविक भक्तांच्या उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांना विन्रम अभिवादन करण्यात आले.भव्यदिव्य दिंडी व रिंगण सोहळयाने दौलतनगरला सकाळपासून भक्तीमय वातावरण होते.

              दौलतनगर ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 40 व्या पुण्यतिथीनिमित्त गत तेरा वर्षापासून सुरु असलेल्या श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे यंदाचे चौदावे वर्ष होते.या पारायण सोहळयामध्ये 758 वाचक सहभागी झाले होते.तसेच तालुक्या बाहेरीलही भाविक भक्त या सोहळयामध्ये मोठया संख्येने सहभागी होते.तर वारकरी साप्रंदयातील विविध मान्यवरांची प्रवचने,कीर्तने तसेच गावोगावच्या भजनांचे जागराचे कार्यक्रम यानिमित्ताने आयोजीत करण्यात आले होते.या संपुर्ण पारायण सोहळयामध्ये पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई,श्रीमती विजयादेवी देसाई मॉसाहेब,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, सौ.स्मितादेवी देसाई, सौ.अस्मितादेवी देसाई,कु. ईश्वरी देसाई,चि.जयराज देसाई,चि.आदित्यराज देसाई यांचा विशेष सहभाग होता.तर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी,जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख,उपविभागीय अधिकारी सुनील गाडे,तहसिलदार रमेश पाटील यांचेसह विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी निमित्त आयोजित पारायण सोहळा यशस्वी करण्यासाठी ह.भ.प.जयवंतराव शेलार महाराज, ह.भ.प.अनिल पाटील महाराज पापर्डेकर, ह.भ.प.जगन्नाथ ठोंबरे महाराज ह.भ.प.दगडू माळी, नाना देसाई पापर्डेकर, ह.भ.प.अनिल पाटील, ह.भ.प.दत्तू कदम,भरत पाटील,बंडा कुंभार,संजय शिर्के,राहूल लोहार,सुरेश शिंदे,गणेश भिसे,अमित लोहार,सुभाष देसाई यांच्यासह त्यांचे सहकारी यांचाही सहभाग होता.तर लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्याचा प्रत्यक्ष साक्षिदार असलेले ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी उपस्थितांना लोकनेते साहेबांच्या कार्याबाबत विविध अनुभव सांगीतले.

              तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर ग्रंथाचे वाचन पुर्ण झालेनंतर लोकनेते यांचे पुण्यतिथी दिवशी फुलाने सजविलेल्या पालखीत श्री ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमा ठेवून टाळ मृदुंगाच्या तालावर,डोक्यावर कलश,तुळशी वृंदावन घेतलेल्या सुहासिनी ढोल वाद्यांसमवेत श्री विठ्ठल नामाचा तसेच ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली यांचे गजरात आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयघोषात माऊलीच्या मंडपातून निघालेल्या भव्य दिंडीला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारकापासून सुरुवात करण्यात आली.पारायण सोहळयाची भव्य दिंडी ही कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर आलेनंतर नामदार शंभूराज देसाई यांचे हस्ते पुतळयासमोर प्रथमत: ध्वजारोहण करण्यात येवून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळयावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच २१ तोफांची सलामी देण्यात आली. तर पुतळयासमोर अभंग व आरती करुन लोकनेते यांचा 40 वा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर पुतळ्यासमोर भव्य असा रंगलेला रिंगण सोहळा हे दृष्य अत्यंत मनमोहक होते. चौथ्या दिवशी काल्याच्या किर्तनाने उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद देवून या अखंड हरीनाम भव्य सोहळ्याची सांगता करण्यात आली. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी दिवशी दौलतनगरला प्रती पंढरपुर अवतरले होते. गत तेरा वर्षापासून ह.भ.प.पुडंलिक महाराज कापसे आळंदीकर हे या पारायण सोहळ्यामध्ये व्यासपीठ चालक म्हणून आपली सेवा बजावीत आहेत. यंदाचा सोहळयातही त्यांनी व्यासपीठ चालक म्हणून सेवा बजावली तर हा पारायण सोहळा यशस्वी करण्याकरीता मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ.प.जयवंतराव शेलार महाराज,ह.भ.प.अनिल पाटील महाराज,ह.भ.प.जगन्नाथ ठोंबरे महाराज यांच्यासह त्यांचे सहकारी यांचेसोबत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील अधिकारी कर्मचारी तसेच शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी कष्ट घेतले. या सर्वांचे आभार नामदार शंभूराज देसाईंनी मानले.या सोहळ्यास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

चौकट- रिंगण सोहळा ठरला भाविकांसाठी आकर्षण.

            लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी निमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुतळ्यास अभिवादन केलेनंतर पुतळ्यासमोर प्रतिवर्षी साजरा करण्यात येणारा रिंगण सोहळा हा या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असते, या रिंगण सोहळ्यामध्ये अबाल वृध्दासंह लहानथोर सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. यंदाच्या वर्षी लोकनेते साहेब यांचे पुण्यतिथी  सोहळयानिमित्त रिंगण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या रिंगण सोहळयामध्ये ना.शंभूराज देसाई यांचे सह सौ.स्मितादेवी देसाई, रविराज देसाई, सौ.अस्मितादेवी देसाई, मा.यशराज देसाई, ईश्वरी देसाई,चि.जयराज देसाई, चि.आदित्यराज देसाई यांचे उपस्थितीमुळे हा रिंगण सोहळा उपस्थित सर्व भक्त,भाविकांसाठी आकर्षण ठरले.तसेच हा रिंगण सोहळा पाहून उपस्थित भाविक भक्त भारावून गेले.

चौकट-लोकनेते साहेब यांचे पुर्णाकृती पुतळा व स्व.शिवाजीराव देसाई यांचे समाधी स्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करत केले अभिवादन.

महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री यांचा शनिवार दि. 23 रोजी  पुण्यतिथी सोहळा पार पडला.या पुण्यतिथी सोहळयामध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून लोकनेते साहेब यांचे पुर्णाकृती पुतळा व समाधी स्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन करण्यात आले होते.त्यानुसार आज पुण्यतिथी दिनानिमित्त त्यांचे पुर्णाकृती पुतळा व  स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधीस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येऊन लोकनेते साहेब यांचे 40 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.