Tuesday, 14 November 2023

पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 57 वा वाढदिवस विविध उपक्रमांनी होणार साजरा.


 दौलतनगर दि.१4:-लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख,महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 57 वा वाढदिवस शुक्रवार दि.17 नोव्हेंबर,2023 रोजी दौलतनगर ता.पाटण येथे विविध उपक्रमांनी साजरा होणार असल्याची  माहिती पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समिती यांचेकडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली असून वाढदिवसानिमित्त नामदार शंभूराज देसाईंना शुभेच्छा देण्याकरीता येणाऱ्या हितचिंतक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  पुष्पहार अथवा हारतुरे न आणता तालुक्यातील गरीब कुटुंबातील मुलामुलींना वाढदिवसाची भेट देण्याकरीता वहया तसेच शालेय वस्तू आणाव्यात, सायंकाळी 06.00 वा दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेसाठी मराठी भव्य संगीत रजनी कार्यक्रम ‘शंभू दौलत जल्लोष 2023’ हा मराठी कलावंतांचा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजीत केला असून, पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेसाठी सर्व रोग निदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले आहे. या सर्व रोग निदान शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही  वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.

               पत्रकांत म्हंटले आहे की, नामदार शंभूराज देसाई यांचा 57वा वाढदिवस शुक्रवार दि.17 नोव्हेंबर,2023 रोजी दौलतनगर ता.पाटण येथे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत असून या दिवशी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन कारखाना कार्यस्थळ, दौलतनगर येथे करण्यात आला आहे. 57 व्या वाढदिवसानिमित्त सकाळी कुटुंबियांच्या वतीने औक्षण झालेनंतर सकाळी 09.00 ते 11.00 पर्यंत ते कारखाना कार्यस्थळावरील श्री गणेश मंदीरामध्ये गणेश दर्शन करुन मरळी  येथे ग्रामदैवत निनाईदेवीचे दर्शन झालेनंतर ग्रामपंचायत व ग्रामस्थ मरळी यांच्यावतीने सत्कार व अभिष्टचिंतन स्विकारणार आहेत.त्यानंतर कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या पुतळा, स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांची समाधी व पुर्णाकृती  पुतळयास व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अपर्ण व विनम्र अभिवादन केल्यानंतर हिंदुहदयसम्राट शिवसेना प्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांचे अकराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने त्यांना विनम्र अभिवादन करुन पुण्यस्मरण दिनानिमित्त गरीब कुटुंबातील महिलांना ब्लँकेट व चटईचे वाटप करण्यात येणार आहे.दौलतनगर येथील शिवदैालत बँकेच्या शाखेच्या 20 व्या वर्धापनदिन समारंभास उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर वाढदिवसानिमित्त आयोजित सर्वरोग निदान शिबीराचे उद्घाटन करुन त्यानंतर त्यांचे निवासस्थानी शिवविजय हॉल येथे आगमन झालेनंतर स.11.00 पासून दुपारी 04.00 वाजेपर्यंत नामदार शंभूराज देसाई हे वाढदिवसानिमित्त कार्येकर्ते,हितचिंतक व आम जनतेच्यावतीने निवासस्थानी शिवविजय हॉल येथे शुभेच्छा स्विकारणार आहेत.सायंकाळी 06.00 वा त्यांच्या वाढदिवसानिमित्त दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेसाठी भव्य संगीत रजनी कार्यक्रम ‘शंभू दौलत जल्लोष 2023’ हा मराठी कलावंतांचा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे. दरम्यान मंत्री ना. शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून दौलतनगर ता.पाटण येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या सर्व रोग निदान शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नियोजन समितीने केले आहे. दरम्यान नामदार शंभूराज देसाई हे या दिवशी दिवसभर शुभेच्छा स्विकारण्यासाठी दौलतनगर ता.पाटण येथे उपस्थित राहणार आहेत,याची हितचिंतकांनी नोंद घ्यावी तसेच शुभेच्छा देण्यासाठी हार-तुरे,पुष्पगुच्छ व पुष्पहार न आणता शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे पेन,वहया इ.शालेय साहित्य आणावे असे आवाहनही पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समितीच्या वतीने पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

चौकट: शालेय साहित्य भेट देत जास्तीत जास्त वहीतूला करण्याचे वाढदिवस नियोजन समितीचे आवाहन.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून हार,पुष्पहार व पुष्पगुच्छ न आणता शालेय साहित्य भेट स्वरुपात आणावे.तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व हितचिंत यांनी  जास्तीत जास्त संख्येने वहितूला करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला असून या वहयांचा उपयोग हा  शालेय विद्यार्थ्यांना होणार असल्याने भेट स्वरुपामध्ये जास्तीत जास्त वहीतूला करण्याचे आवाहन पालकमंत्री ना.शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

Monday, 13 November 2023

पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या वाढदिवसानिमित्त १७ नोव्हेंबर रोजी दौलतनगर-मरळी येथे रंगणार ‘शंभूदौलत जल्लोष २०२३’ या भव्य संगीतरजनी कार्यक्रमातून महाराष्ट्राचे लाडके कलाकार येणार पाटणवासीयांच्या भेटीला!


 

पाटण तालुक्याचे भाग्यविधाते, महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, १७ नोव्हेंबर रोजी दौलतनगर-मरळी येथे सायंकाळी ६ वाजता ‘शंभूदौलत जल्लोष २०२३’ या भव्य संगीतरजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून महाराष्ट्राचे लाडके कलाकार पाटणवासीयांच्या भेटीला येणार आहेत. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या अभिष्टचिंतनाचे औचित्य साधत गाणी, नृत्य, पारंपरिक लावणी व विनोदी कार्यक्रमांच्या माध्यमातून अनोखी कलामैफल संपन्न होणार आहे. 

यावेळी ‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रमातील भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, तसेच सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, रोहित माने हे कलाकार आपल्या प्रहसनांमधून हास्यविनोदाचे कारंजे उडवणार आहेत. त्याचबरोबर प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, स्मिता शेवाळे, कृतिका गायकवाड आणि अभिनेता शुभंकर तावडे हे विशेष नृत्ये सादर करणार आहेत. यावेळी लावणी नृत्यांगना अर्चना जवळेकर, प्राची मुंबईकर, नमिता पाटील, अदिती जाधव या बहारदार व पारंपरिक लावणी पेश करतील, तर प्रसिद्ध गायक नंदेश उमप, रोहित राऊत व गायिका कविता राम यांच्या सुरेल आवाजात भावगीते व सिनेगीते ऐकायला मिळणार आहेत. यावेळी अभिजीत भदे, अजय अत्रे, विशाल गंद्राटवार, दर्शना जोग, तन्मय पवार, प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक या प्रसिद्ध वादकांचा चमू साथसंगत करणार आहे. मिमिक्री आर्टिस्ट योगेश सुपेकर यांचे सादरीकरण आणि प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री व ह्रषीकेश जोशी यांचे उत्साही सूत्रसंचालन हेही या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण आहे!

चला तर मंडळी, येताय ना- शंभूदौलत जल्लोष २०२३ या कार्यक्रमाला!

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे 57 व्या वाढदिवसानिमित्त दौलतनगर,ता.पाटण येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन,तज्ञ डॉक्टरांमार्फत होणार आरोग्य तपासणी. पाटण मतदारसंघातील नागरीकांनी या शिबीरामध्ये सहभागी होण्याचे वाढदिवस नियोजन समितीचे आवाहन.


 


 दौलतनगर दि.13 :- राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे 57 व्या वाढदिवसानिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील नागरीकांच्या आरोग्याच्यादृष्टीने शारिरीक तपासणी करुन तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचेकडून योग्य तो सल्ला व आवश्यक ते औषधोपचार करुन आरोग्याची काळजी घेण्यासाठी गुरुवार दि. 17 नोव्हेंबर,2023 रोजी सकाळी 09.00 ते दुपारी 04.00 या वेळेमध्ये दौलतनगर,ता.पाटण येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समितीच्यावेतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

                      प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून दौलतनगर,ता.पाटण येथे तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व रोग निदान शिबीरामध्ये स्त्रीरोग तपासणी,बालरोग तपासणी,नेत्ररोग तपासणी व प्रमाणपत्र वितरण, अस्थिरोग तपासणी व अपंगत्व प्रमाणपत्र, कान,नाक,घसा तपासणी,त्वचारोग तपासणी, एन.सी.डी.विभाग,रक्तदाब,ब्लड शुगर,कॅन्सर तपासणी, महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना कार्ड नोंदणी,रक्तदान शिबीर,क्ष किरण तपासणी, इ.सी.जी. तपासणी, रक्त लघवी तपासणी या आरोग्यविषयक तपासण्या होणार आहेत. रुग्णाच्या आरोग्याची तज्ञ डॉक्टरांकडून आवश्यक ती तपासणी करण्यात येऊन त्याचा आजार बरा होण्यासाठी आवश्यक तो प्राथमिक औषधोपचार करुन डॉक्टरांकडून रुग्णांना आरोग्‍य विषयक योग्य तो सल्ला देण्यात येणार आहे. तसेच संबंधित रुग्णांना या ठिकाणी आवश्यकतेनुसार औषधांचे वाटप करण्यात येणार आहे.तरी या सर्व रोग निदान शिबीराचा लाभ पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पालकमंत्री ना.शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने प्रसिध्दीपत्रकाव्दारे केली आहे.

चौकट: युवकांनी रक्तदान करण्याचे आवाहन.           

गतवर्षी ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य असे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.ना.शंभूराज देसाई यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठया प्रमाणांत युवकांनी या रक्तदान शिबीरामध्ये रक्तदान करुन रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी मोठा हातभार लावला होता.यंदाच्या वर्षी ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन केले असून या सर्व रोग निदान शिबीरामध्ये मतदारसंघातील जास्तीत जास्त युवकांनी  रक्तदान करावे,असे आवाहन वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Saturday, 11 November 2023

ना.शंभूराज देसाई यांचे 57 व्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ,हारतुरे न आणता शालेय साहित्य,वहया आणा. पालकमंत्री नामदार शंभूराज देसाईं वाढदिवस नियोजन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन.

  


  दौलतनगर दि.11 :- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख,पाटण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तसेच सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचा वाढदिवस प्रतिवर्षी पाटण विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांव्दारे मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो.यंदा त्यांचा 57 वा वाढदिवस शुक्रवार दि.17 नोव्हेंबर,2023 रोजी दौलतनगर ता.पाटण येथे मोठया दिमाखात साजरा करण्याचे नियोजित आहे. वाढदिवस असो वा सत्कार समारंभ या कार्यक्रमामध्ये शाल,श्रीफळ,फेटा देवून सत्कार किंवा स्वागत करण्यापेक्षा सत्कार म्हणून शालेय साहित्य अथवा वहया दयाव्यात हा पायंडा स्वत: नामदार शंभूराज देसाईंनीच मतदारसंघात पाडला असून त्यांचे दि.17 नोव्हेंबर रोजीचे वाढदिवसानिमित्त भेट देताना पुष्पगुच्छ,हारतुरे न आणता मतदार संघातील गरीब कुटुंबातील मुलामुलींना शिक्षणासाठी हातभार लावणेकरीता भेट म्हणून वहया व शालेय सहित्यच दयावे असे आवाहन पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समिीच्यावतीने  प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

             पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समिती यांनी केलेल्या आवाहनामध्ये म्हंटले आहे की, प्रतिवर्षी साजऱ्या होणाऱ्या ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने हार तुरे आणून शुभेच्छा देण्यात येत होत्या.त्या दिवसापुरते  त्या हारतुऱ्यांचे महत्व होते परत हे सर्व हारतूरे एकत्रित करुन त्याची विल्हेवाट लावावी लागत असल्याने ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाला भेट देवून सदिच्छा देणाऱ्या व्यक्तींनी हारतूरे न आणता गरीब कुटुंबातील मुलामुलींना शिक्षणासाठी हातभार लागण्याच्या हेतूने वहया तसेच शालेय साहित्यच भेट दयावे  असे आवाहन ना.शंभूराज देसाई यांनी या अगोदरच केले आहे. त्यांचे या आवाहनाला मतदारसंघातील जनतेने  चांगला प्रतिसाद दिला. हाच पायंडा लग्नसमारंभ तसेच सत्कार समारंभाच्या निमित्ताने राबविला त्यासही जनतेने मोठया संख्येने प्रतिसाद दिला.प्रतिवर्षी ना.शंभूराज देसाई यांना भेट म्हणून मिळणाऱ्या वहया तसेच शालेय साहित्य हे मतदारसंघातील गरीब कुटुंबातील मुला-मुलींना शिक्षणासाठी हातभार म्हणून मतदारसंघात वाटप करण्यात येत असते. गत दहा वर्षापासून प्रतिवर्षी ना.शंभूराज देसाई यांचा वाढदिवस तसेच इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट स्वरुपात मिळणाऱ्या वहयांचा सदुपयोग पाटण मतदारसंघातील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी विद्यार्थींनीना देवून मदतीचा हातभार लावला आहे.त्यामुळे यंदाच्या वर्षीही ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसानिमित्त भेट देताना वहया तसेच शालेय साहित्य दयावे, असे आवाहन पालमंत्री नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने मतदारसंघातील सर्व  कार्यकर्ते,पदाधिकारी व हितचिंतक यांना केले आहे.


Tuesday, 7 November 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून विविध विकास कामांना 06 कोटी 56 लक्ष रुपयांचा निधी मंजूर. ग्रामीण रस्ते,मुस्लिम वस्तींमधील कामे,अंगणवाडी इमारती व साकवची कामे लागणार मार्गी.

 

दौलतनगर दि.08 -  महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रस्त्यांचे सुधारणा करण्याचे कामांना 3054 रस्ते व पूल दुरुस्ती गट ब व क अंतर्गत 02 कोटी रुपयांचा निधी तर अल्पसंख्यांक विभागांतर्गत मुस्लिमवस्तीमधील विकास कामांकरीता 01 कोटी तसेच जिल्हा वार्षिक आराखडयांतर्गत नविन अंगणवाडी इमारतींचे बांधकाम करण्यासाठी 78 लाख 75 हजार,सर्वसाधारण व विशेष घटक साकव योजने अंतर्गत 02 कोटी 77 लाख 73 हजार असा एकूण 06 कोटी 56 लाख 48 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

            प्रसिध्दी पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये गाव पोहोच असणाऱ्या ग्रामीण रस्त्यांची  अतिवृष्टीमुळे दुरावस्था झाली होती.त्यामुळे या रस्त्यांवरुन ये-जा करताना येथील नागरीकांची मोठी गैरसोय होत असल्याने या ग्रामीण रस्त्यांना निधीची आवश्यकता होती.तसेच मतदारसंघातील मुस्लिमवस्तीमधील विविध विकास कामांना निधीची आवश्यकता होती.तर जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये सर्वसाधारण साकव योजने अंतर्गत दळण वळणाचेदृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांवर साकव पूल मंजूर होण्यासाठी सन 2023-24 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये या साकव पूलांचा समावेश करण्यात येऊन ग्रामीण रस्ते, अल्पसंख्याक विभागाकडील कामे व साकवच्या कामांना निधी मंजूर होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार राज्य शासनाचे ग्रामविकास विभागाकडून  3054 रस्ते व पूल दुरुस्ती गट ब व क अंतर्गत 02 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून बामणेवाडी जिमनवाडी बागलवाडी भोकरवाडी जळव रस्ता ग्रामा 10 सुधारणा 50 लाख,लुगडेवाडी ते प्रजिमा 57 रस्ता सुधारणा   50 लाख,दुधडेवाडी मरळी रस्ता ग्रामा 246 ची सुधारणा 20 लाख,

रामिष्टेवाडी ते काळगाव रस्ता सुधारणा 30 लाख, वरचे केर ते खालचे केर रस्ता ग्रामा 385 सुधारणा 50 लाख या कामांचा तर राज्य शासनाचे अल्पसंख्यांक विभागांतर्गत मुस्लिमवस्तीमधील विकास कामांकरीता 01 कोटी निधी मंजूर झाला असून यामध्ये पाणेरी येथे कब्रस्तान संरक्षक भिंत व धावडवाडा अंतर्गत रस्ता सुधारणा  15 लाख,पेठशिवापूर येथे इदगाह मैदानाला संरक्षण भिंत 15 लाख,सातेवाडी नाटोशी मुस्लिमवस्ती कब्रस्तान संरक्षक भिंत 15 लाख,ढेबेवाडी मुस्लिमवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,चाफेर मुस्लिमवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,हेळवाक येथे कब्रस्तान संरक्षक भिंत 15 लाख,काढोली मुस्लिम समाज अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख या कामांचा समावेश असून त्याचा शासन निर्णयही पारित झाला असल्याची माहिती देत पुढे म्हंटले आहे की, सन 2023-24 चे जिल्हा वार्षिक आराखडयांतर्गत अंगणवाडी इमारतींची बांधकाम करण्यासाठी प्रत्येकी अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 11.25 लाख प्रमाणे डोंगळेवाडी खालची,लेंढोरी धनगरवाडा,कोरिवळे,शिबेवाडी वरची,तळीये पश्चिम,धनगरवस्ती वाजेगाव, शेळकेवस्ती मारुल तर्फ पाटण या ठिकाणी नविन अंगणवाडी इमारतींचे बांधकाम करण्यासाठी 78 लाख 75 हजार निधी मंजूर झाला असून सर्वसाधारण व विशेष घटक साकव योजनेअंतर्गत जांभेकरवाडी (मरळोशी) येथे ओढयावर साकव 38.29 लाख,धजगाव ते शिंदेवाडी रस्त्यावरील ओढयावर साकव 34.28 लाख,मरड ते मिसाळवाडी येथे ओढयावर साकव 53.25 लाख,शिद्रुकवाडी मुख्य रस्ता ते मुगडेवस्ती रस्त्यावर साकव 49.98 लाख,चाफळ येथे काटेवस्ती ते खिळेपट्टी ओढयावर साकव 51.95 लाख व तारळे बौध्दवस्ती रस्त्यावरील ओढयावर साकव 49.98 लाख ही साकव पूलांची कामे मंजूर झाली असून या कामांच्या लवकरच निविदा प्रक्रिया करुन निविदा निश्चित झाल्यानंतर तातडीने ही कामे हाती घेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी यांना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केल्या असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.


नामदार शंभूराज देसाई यांचे उपस्थितीमध्ये गुरुवार दि.10 नोव्हेंबर रोजी दौलतनगर येथे दिवाळी फराळाचे आयोजन.

 

दौलतनगर दि.08- प्रतिवर्षा प्रमाणे यंदा दिपावली सणाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेवतीने दिवाळी फराळ या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दि. 10नोव्हेंबर 2023 रोजी साय.05 ते 08 या वेळेमध्ये महाराष्ट्र दौलत,लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक,दौलतनगर,ता.पाटण येथे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमास सातारा जिल्हयातील लोकप्रतिनिधी, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी, सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांना निमंत्रण देण्यात आले आहे.दरम्यान दिवाळी फराळ कार्यक्रमाचे निमित्ताने स्वर निनाद कोल्हापूर निर्मित शब्द सुरांच्या झुल्यावर या संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.

 


इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी समाजात संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये करू नयेत. उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांच्याकडून आवाहन

 

(मुंबई, दि. ७ नोव्हेंबर २०२३) : इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी वारंवार स्पष्ट केली आहे. मराठा समाजाला कायमस्वरूपी व कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळवून देण्याच्या दृष्टीने राज्य शासन कटीबद्ध आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत ओबीसी समाजात संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये मंत्री व ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी करू नयेत, अशी स्पष्ट भूमिका उत्पादन शुल्क मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमिती सदस्य मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी मांडली.


आज मुंबई येथील पावनगड निवासस्थानी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेब म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबतच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या प्रत्येक बैठकीत मराठा समाजाला कायमस्वरूपी व कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळवून देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडून करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात येतो. प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्याच दिवशी उपसमितीची बैठक घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पीटिशन दाखल केली असून याबाबत राज्य शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्याकरिता सर्व पूर्वतयारी केली जात आहे. दिवाळी नंतर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती दिल्ली येथे जाऊन कायदेतज्ज्ञ व ज्येष्ठ विधिज्ञांची भेट घेणार आहे. न्यायालयात राज्य सरकारची बाजू प्रभावीपणे मांडून मराठा आरक्षण मिळण्याबाबत विधिज्ञांबरोबर दिल्लीतील भेटीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने गैरसमज करून घेऊ नये. ओबीसी आरक्षणाला तिळमात्रही धक्का लावला जाणार नाही, अशी भूमिका मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी मांडली. 


मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला आहे. राज्यात स्वातंत्र्यपूर्व काळात जी संस्थाने होती, त्या संस्थांनांकडून ज्या अभिलेखात ‘कुणबी’ जातीच्या नोंदी आढळून येतील असे कायदेशीर अभिलेख उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी गठीत न्या. शिंदे समितीची राज्यभर व्याप्ती वाढवण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांत या समितीमार्फत कामकाज सूरू असून जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठीचा विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ज्यांच्याकडे कुणबी पुरावे आहेत त्यांना नियमाने, कायद्याने कुणबी दाखले दिलेच पाहिजे. त्यामुळे कुणबी असण्याचे पुरावे असलेल्यांना त्यांच्याकडील पुराव्यांची पडताळणी करून कुणबी दाखले वितरित करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत आहे. तरीही मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात 'बॅकडोअर एन्ट्री' वगैरे वक्तव्ये मा. छगन भुजबळ यांनी करणे, हे आश्चर्यकारक आहे, असे सांगून मा. ना. शंभूराज देसाई साहेब म्हणाले की, आमचे सहकारी मंत्री मा. छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये करू नयेत. तसेच राज्यातील परिस्थिती खराब करण्याचा प्रयत्न केला जाऊ नये, असे आवाहन त्यांनी मंत्री भुजबळ यांना केले आहे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी मराठा आरक्षणाबाबत परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली आहे. सर्व सुरळीत होत असताना परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न मा. छगन भुजबळ यांनी करू नये. त्यांच्याकडून समाजात संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये पुन्हा होऊ नयेत, याकरिता आम्ही मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांशी चर्चा करू, असेही मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी स्पष्ट केले. 


मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान राज्यात ठिकठिकाणी झालेल्या हिंसक घटनांबाबत मा. ना. शंभूराज देसाई साहेब यावेळी म्हणाले की, मा. मनोज जरांगे-पाटील यांनी सुरुवातीपासून मराठा समाजाला शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. हिंसाचार करू नका, कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले होते. परंतु काही हिंसात्मक घटना घडल्या. त्याबाबत तपास पोलीस करत आहेत. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. निर्दोषींवर कोणतीही कारवाई होणार नाही. पोलीस यंत्रणेवर कोणीही दबाव आणू शकत नाही. मराठा समाजातील नेते, लोकप्रतिनिधींवरही हल्ले झाले, त्यांना गावात येण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र समाजाच्या भावना प्रक्षुब्ध आहेत, हे ध्यानात घेऊन याबाबत सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेतली. तरीही मा. छगन भुजबळ यांना वाटत असेल की, जाणीवपूर्वक ओबीसी नेत्यांना, लोकप्रतिनिधींनाच लक्ष्य केले जात आहे, तर त्यांनी त्यांच्याकडील माहिती मा. गृहमंत्री महोदयांना द्यावी. पोलीस नि:पक्षपातीपणे त्याबाबत तपास करतील, अशी भूमिका मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी मांडली.