Monday 13 November 2023

पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या वाढदिवसानिमित्त १७ नोव्हेंबर रोजी दौलतनगर-मरळी येथे रंगणार ‘शंभूदौलत जल्लोष २०२३’ या भव्य संगीतरजनी कार्यक्रमातून महाराष्ट्राचे लाडके कलाकार येणार पाटणवासीयांच्या भेटीला!


 

पाटण तालुक्याचे भाग्यविधाते, महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, १७ नोव्हेंबर रोजी दौलतनगर-मरळी येथे सायंकाळी ६ वाजता ‘शंभूदौलत जल्लोष २०२३’ या भव्य संगीतरजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून महाराष्ट्राचे लाडके कलाकार पाटणवासीयांच्या भेटीला येणार आहेत. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या अभिष्टचिंतनाचे औचित्य साधत गाणी, नृत्य, पारंपरिक लावणी व विनोदी कार्यक्रमांच्या माध्यमातून अनोखी कलामैफल संपन्न होणार आहे. 

यावेळी ‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रमातील भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, तसेच सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, रोहित माने हे कलाकार आपल्या प्रहसनांमधून हास्यविनोदाचे कारंजे उडवणार आहेत. त्याचबरोबर प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, स्मिता शेवाळे, कृतिका गायकवाड आणि अभिनेता शुभंकर तावडे हे विशेष नृत्ये सादर करणार आहेत. यावेळी लावणी नृत्यांगना अर्चना जवळेकर, प्राची मुंबईकर, नमिता पाटील, अदिती जाधव या बहारदार व पारंपरिक लावणी पेश करतील, तर प्रसिद्ध गायक नंदेश उमप, रोहित राऊत व गायिका कविता राम यांच्या सुरेल आवाजात भावगीते व सिनेगीते ऐकायला मिळणार आहेत. यावेळी अभिजीत भदे, अजय अत्रे, विशाल गंद्राटवार, दर्शना जोग, तन्मय पवार, प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक या प्रसिद्ध वादकांचा चमू साथसंगत करणार आहे. मिमिक्री आर्टिस्ट योगेश सुपेकर यांचे सादरीकरण आणि प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री व ह्रषीकेश जोशी यांचे उत्साही सूत्रसंचालन हेही या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण आहे!

चला तर मंडळी, येताय ना- शंभूदौलत जल्लोष २०२३ या कार्यक्रमाला!

No comments:

Post a Comment