दौलतनगर दि.08 - महाराष्ट्र
राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा
मतदारसंघातील ग्रामीण रस्त्यांचे सुधारणा करण्याचे कामांना 3054 रस्ते व पूल
दुरुस्ती गट ब व क अंतर्गत 02 कोटी रुपयांचा निधी तर अल्पसंख्यांक विभागांतर्गत
मुस्लिमवस्तीमधील विकास कामांकरीता 01 कोटी तसेच जिल्हा वार्षिक आराखडयांतर्गत नविन
अंगणवाडी इमारतींचे बांधकाम करण्यासाठी 78 लाख 75 हजार,सर्वसाधारण व विशेष घटक
साकव योजने अंतर्गत 02 कोटी 77 लाख 73 हजार असा एकूण 06 कोटी 56 लाख 48 हजार
रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे
कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.
प्रसिध्दी पत्रकांत पुढे म्हंटले आहे
की, पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये गाव पोहोच असणाऱ्या ग्रामीण
रस्त्यांची अतिवृष्टीमुळे दुरावस्था झाली
होती.त्यामुळे या रस्त्यांवरुन ये-जा करताना येथील नागरीकांची मोठी गैरसोय होत
असल्याने या ग्रामीण रस्त्यांना निधीची आवश्यकता होती.तसेच मतदारसंघातील
मुस्लिमवस्तीमधील विविध विकास कामांना निधीची आवश्यकता होती.तर जिल्हा वार्षिक
आराखडयामध्ये सर्वसाधारण साकव योजने अंतर्गत दळण वळणाचेदृष्टीने महत्त्वाच्या
असलेल्या रस्त्यांवर साकव पूल मंजूर होण्यासाठी सन 2023-24 च्या जिल्हा वार्षिक
आराखडयामध्ये या साकव पूलांचा समावेश करण्यात येऊन ग्रामीण रस्ते, अल्पसंख्याक
विभागाकडील कामे व साकवच्या कामांना निधी मंजूर होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा
सुरु होता. त्यानुसार राज्य शासनाचे ग्रामविकास विभागाकडून 3054 रस्ते व पूल दुरुस्ती गट ब व क अंतर्गत 02
कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून बामणेवाडी जिमनवाडी बागलवाडी भोकरवाडी जळव रस्ता
ग्रामा 10 सुधारणा 50 लाख,लुगडेवाडी ते प्रजिमा 57 रस्ता सुधारणा 50 लाख,दुधडेवाडी मरळी रस्ता ग्रामा 246 ची सुधारणा
20 लाख,
रामिष्टेवाडी ते
काळगाव रस्ता सुधारणा 30 लाख, वरचे केर ते खालचे केर रस्ता ग्रामा 385 सुधारणा 50
लाख या कामांचा तर राज्य शासनाचे अल्पसंख्यांक विभागांतर्गत मुस्लिमवस्तीमधील
विकास कामांकरीता 01 कोटी निधी मंजूर झाला असून यामध्ये पाणेरी येथे कब्रस्तान
संरक्षक भिंत व धावडवाडा अंतर्गत रस्ता सुधारणा
15 लाख,पेठशिवापूर येथे इदगाह मैदानाला संरक्षण भिंत 15 लाख,सातेवाडी नाटोशी
मुस्लिमवस्ती कब्रस्तान संरक्षक भिंत 15 लाख,ढेबेवाडी मुस्लिमवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा
15 लाख,चाफेर मुस्लिमवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,हेळवाक येथे कब्रस्तान संरक्षक
भिंत 15 लाख,काढोली मुस्लिम समाज अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख या कामांचा समावेश असून
त्याचा शासन निर्णयही पारित झाला असल्याची माहिती देत पुढे म्हंटले आहे की, सन
2023-24 चे जिल्हा वार्षिक आराखडयांतर्गत अंगणवाडी इमारतींची बांधकाम करण्यासाठी प्रत्येकी
अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 11.25 लाख प्रमाणे डोंगळेवाडी खालची,लेंढोरी
धनगरवाडा,कोरिवळे,शिबेवाडी वरची,तळीये पश्चिम,धनगरवस्ती वाजेगाव, शेळकेवस्ती मारुल
तर्फ पाटण या ठिकाणी नविन अंगणवाडी इमारतींचे बांधकाम करण्यासाठी 78 लाख 75 हजार निधी
मंजूर झाला असून सर्वसाधारण व विशेष घटक साकव योजनेअंतर्गत जांभेकरवाडी (मरळोशी)
येथे ओढयावर साकव 38.29 लाख,धजगाव ते शिंदेवाडी रस्त्यावरील ओढयावर साकव 34.28
लाख,मरड ते मिसाळवाडी येथे ओढयावर साकव 53.25 लाख,शिद्रुकवाडी मुख्य रस्ता ते मुगडेवस्ती
रस्त्यावर साकव 49.98 लाख,चाफळ येथे काटेवस्ती ते खिळेपट्टी ओढयावर साकव 51.95 लाख
व तारळे बौध्दवस्ती रस्त्यावरील ओढयावर साकव 49.98 लाख ही साकव पूलांची कामे मंजूर
झाली असून या कामांच्या लवकरच निविदा प्रक्रिया करुन निविदा निश्चित झाल्यानंतर
तातडीने ही कामे हाती घेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी यांना पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांनी केल्या असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment